Posts

Showing posts from August, 2023

अस करा, तस करा.

सगळेच जण म्हणत होते अस करा, तसं करा हे करा, ते करा. असही म्हणायचे हे आधी करा, जास्त घाईच आहे, साधीच नाही, मोठी माणस पण, म्हणत होती लवकर करा. सर्वांना कळत होतं, थोरा मोठ्यांना तर नीट कळत होतं, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे . पण कस व काय करायचं? प्रश्न गहन होता, माणस द्या, सोपी गोष्ट तेवढीच नव्हती. थोरा मोठ्यांनी पण माणसच मागितली. एक अमृतस्य पुत्र आला, त्यालाही कळल हे करायचंय, ते करायचंय, पण याला अजून काही तरी कळलं  माणस मागून कशी मिळणार? कोड सुटल, मार्ग सापडला  मी तयार करीन म्हटला, नवयुगाचा शालिवाहन गवसला, तो शांत होता, कार्यमग्न होता, पण अस्वस्थता कायम होती हे करा, ते करा, अस करा तसं करा. गेली ४०/५० वर्षे वाहून, कुठं तरी काही तरी घडले कस घडल विचारलं तर माणसानं केले, उत्तर आलं. दक्षिण टोकाला विवेकानंद स्मारक, तर पूर्वांचलात शाळा सुरू झाली, माणूस उभा राहिला, कामाला एकनाथ मिळाला. मग असच सुरू राहील हे करा ते करा ह्या ऐवजी हे झालं,ते झालं. कुणी केल, माणसांनी केलं. समजल हो अयोध्या केली, आणि मिनाक्षीपुरम सुध्दा, सेवा केली, ३७० सुध्दा घालवलं. पण कुणी केलं. माणसांनी केलं पण ही माण...