Posts

Showing posts from September, 2025

लटकणारे चेहरे

लटकणारे चेहरे  सिएनआर राव यांना रसायन शास्त्र योगदानासाठी भारत रत्न मिळाले आहे. पण त्यांच्या विषयातील योगदाना व्यतिरिक्त ते अन्य गोष्टींसाठी माहिती नाहीत. असेच बरेच जण असतात. पण एका क्षेत्रातील तज्ञता प्राप्त माणूस अचानक सर्व क्षेत्रीय विद्वान जाहीर झाला की भिती वाटू लागते.  मग लक्षातही येते की अरेच्या एखाद्या विषयातील तज्ञतेने हा माणूस सध्याच्या प्रसिध्दी युगात, जमिनी पाया सोडून वहावत जात आहे. सरकार विरोधातील आशादायी चेहरा म्हणून स्वतःचा चेहरा वापरु द्यायला तयार होतो. आपला विषय, आपले कार्य सोडून सर्व निसरड्या विषयांवर भाष्य वा कृति करु लागतो. कठपुतली खेळवणा-याला गोंडस बाहुली मिळते. तो वापरतो. व एके दिवशी त्याची गरज संपल्यावर टाकून देतो. नाम महात्म्य संपल्यावर त्या एकाकी जिवाला एकाकीपणाची कारणमिमांसा ही झेपत नाही. मी असा Large than life कसा झालो हे कळत नाही व एकटा का पडतो हे समजत नाही. एकीकडे स्वत: च्या विषयाला वाहिलेल्या व्यक्ती स्मरणात रहातात. कधी भैरप्पा, कधी गजाभाऊ मेहेंदळे. कारण ते स्वस्त बनत नाहीत. जगत असताना किंवा मरताना. नाही तर सोनम वांचुकांची काही कमी नाही.

हिंदू वैश्विक चिंतन जागरण दिवस

Image
आत्मविस्मृतीमुळे हिंदू समाजाला, हिंदू धर्माला, हिंदू तत्वज्ञानाला, हिंदूराष्ट्राला, ( भारताला), आपले ध्येय विस्मरण झाले होते. याच्या स्मरणाचे प्रयत्न चालू होते. समाजात, राष्ट्रात, तत्वज्ञानात व धर्मतत्व रचनेत याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले होते. पण अर्वाचीन भारतात त्याची सुस्पष्ट मांडणी ११ सप्टेंबर १८९३ शिकागो धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केली. म्हणून हा दिवस हिंदू वैश्विक चिंतन दिवस ठरला आहे. जगाला आज हिंदू धर्म, हिंदू तत्वज्ञान, हिंदू नर नारी व भारत देश यांच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत. जगाच्या मूळ समस्येचे उत्तर हवे आहे. जे की भारताने, धर्माने, तत्वज्ञानाने , हिंदू नर नारींनी व्यवहाराने त्या समस्येच्या मुळाशी जाऊन उत्तरही शोधले होते. जगाला सांगितले ही होते. विश्व समुदाय प्रवाही असल्याने त्याला या चिंतनाचे सातत्याने स्मरण करुन द्यावे लागते. वेदकालापासून, भगवत गीते मधून, श्री महिम्न स्तोत्रातून, पसायदानातून चालत आलेले हे पाथेय, अत्यंत आधुनिक शब्दात स्वामी विवेकानंद यांनी शिकागो धर्म परिषदेमध्ये ११ सप्टेंबर रोजी मांडले आहे. म्हणून या दिवसाचे व हिंदू वैश्विक चिंतनाचे स्मरण...