राष्ट्रीय एकात्मतेसाठी जागृक प्रयत्न.
लेखांत ६०* राष्ट्रीय भाव, एकात्मतेचा भाव आज आपल्या देशात अनुभवाला येत आहे, तो अचानक उद्भवलेल्या पावसासारखा नसून तो या शतकातील सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. इंग्रज जाण्यासाठी व देश ताठ उभा राहण्यासाठी राष्ट्रीय भाव जागरण ही पूर्व अट ठरवून सुरू केलेल्या मागील शतकातील कामाच हे स्वाभाविक फलित आहे. ज्या पुर्वांचलाचा आपण विचार करीत आहोत त्यात सुरवातीचे भैय्याजी काणे यांच्या सारख्यांचे एकांडे प्रयत्न, विवेकानंद केंद्राचे संस्थात्मक प्रयत्न, या बरोबरीने संपूर्ण समाजाचे अस्तेवाईक संबंध यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये हा माझा देश आहे या भावनेवर जी विघटन वादाची जी राख जमली होती, ती उडू लागली व या एकात्मतेच्या प्रयत्नात स्थानिक जनतेचा सहभाग वाढू लागला. My home is India. असे प्रकल्प सुरू झाले. यात परत महाराष्ट्रचा पुढाकार होता. पुर्वांचल येथील मुले उर्वरित भारतात घरोघर शिक्षणासाठी राहू लागली, शिकू लागली, स्थानिक घरं व पालक मिळाले, संघाची शाखा मिळाली. इथून तिथून भारत एक हा भाव मिळाला. देशाविरुद्ध हा भाव जाऊन देशासाठी हा भाव जागा झाला. अशा घरांमध्ये एक घर प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांचेही होते. अ...