पुस्तक, ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, शोध निबंध अशा पुस्तकाचे परिक्षण
An Illustrated Primer Christianity Islam. Hindu Religions With Special Reference to Bharat असे दणदणीत पण अभ्यासपूर्ण पुस्तकाचा परिचय करून देणे आवश्यक आहे. वर शिर्षकात म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक आहे पण त्याहून अधिक तो अभ्यासपूर्ण लिहिलेला ग्रंथ आहे. पण हे वर्णन ही पुस्तकाला पूर्ण न्याय देणारे नाही. कारण डाटा बेस पुस्तक असले तरी माहितीचे विश्लेषण अशा प्रकारे केले आहे की वाचकाला नवीन अर्थच सापडतो. पुस्तक इंग्रजी व हिंदी मध्ये छापलेले आहे तरी मूळ लेखन इंग्रजी भाषेत आहे. पूर्ण २४० पानी असून ८ प्रकरणांमध्ये व १९ उप प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. खरोखरच पायाभूत व रकाने, नकाशे, टेबल्स या आधारे चित्ररूप व वेधक बनले आहे. हे पुस्तक माझ्या मते हिंदू समाज घटकासाठी लिहिलेले आहे व येथे हिंदू म्हणजे सनातनी, बौध्द, जैन, शिख हे सर्व मिळून आहेत. कारण हे पुस्तक वाचताना, अरेच्च्या, हे असे आहे, आरे बापरे, हे माहिती नव्हते, वाटल नव्हत एवढ भयंकर असेल, खरंच वाटत नाही, आकडेवारी तर भितीदायक आहे, आपलं भवितव्य काय असेल अजून १०० वर्षांनी अशा भावना फक्त हिंदू घटकांकडून येणार आहेत. मुस्लिम आ...