Posts

Showing posts from December, 2024

सिमोलंघनाचे आवताण

सिमोलंघनाचे आवताण  भारताचे दोन शेजारी देश हे सतत भारताला सिमोलंघनासाठी आवताण देत असतात. सध्या बांगलादेशाला हे आवताण देण्याची फारच खुमखुमी आली आहे. भारतात, हे म्हणण्याचे कारण की हिंदू सण, समारंभ, उत्सव हेच भारताचे राष्ट्रीय कार्यक्रम असतात व असले पाहिजेत, दसरा, विजयादशमी या दिवशी सिमोलंघन करण्याची प्रथा आहे. गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा आहे, विजिगिषुता दाखवण्याची प्रथा आह. , प्रभू रामचंद्रांनी रावण वध करून सिमोलंघन केले ते विजयादशमी दिवशीच. त्यामुळे शेकडो, हजारो वर्षांच्या या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे सिमोलंघन करणे हा भाषिक अलंकार बनला आहे व त्याची विजयादशमीशी असलेली नाळ गळून पडली आहे व गरज पडेल त्यावेळी सीमा ओलांडून सिमोलंघन साजरे करणे भारताचे नशीब बनले आहे. उरी सर्जिकल स्ट्राईकसाठी पाकिस्तानने आमंत्रित केले होते. भारताने ते आवताण स्विकारले होते. सध्या बांगला देश हे आमंत्रण देत आहे. खूपच खुमखुमी आली आहे. सर्व सभ्य जगाची मान  लाजेने खाली गेली आहे. मानवतेची लक्तरे ज्या पध्दतीने केली गेली आहेत त्याचा विनाश करण्याची वेळ आली आहे.  पण हे भारताला सिमोलंघनासाठी आवताण का आहे...