Posts

Showing posts from March, 2023

एक मुलाखत कधीच न होणारी

एक मुलाखत कधीच होऊ न शकणारी मुलाखतकार सुनील देशपांडे. नमस्कार डॉ. हेडगेवार. नमस्कार. मी: आपण वेळ दिल्याबद्दल आभार. डॉ: आपण अधिक वेळ न घालवता मुद्द्यावर येऊ या का? मी:  हो निश्चितच. माझा पहिला प्रश्न आहे आपण ही नवीन संस्था स्थापन करून काय साधल आहे.? डॉ:  काहीच नाही. अत्ता तर सुरवात आहे, ध्येय साध्य करायचं आहे. मी: काय ध्येय आहे आपल्या संस्थेचे? डॉ: सांगतो. पण प्रथम नाव सांगतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. व ध्येय आहे संपूर्ण हिंदू समाज संघटित करून ही भारतभूमी स्वतंत्र करणे. मी: मग इतर सर्व संस्था काय करीत आहेत? स्वातंत्र्यासाठी तर प्रयत्नशील आहेत. डॉ: माझा क्रम समजून घ्या. हिंदू समाज संघटित करून. हा इतर कोणाचाही नाही. मी: पण यामुळे काय फरक पडणार? उलट स्वातंत्र्याला उशीरच होईल. डॉ:  असं घडेलही. पण हे काही फक्त सत्तांतर नाही तर या मध्ये स्व आहे व हा स्व म्हणजे येथील सनातन,  नित्य नूतन संस्कृती, हिंदू संस्कृती व ती जपणारा पुत्रवत हिंदू समाज. हा समाज ज्या निष्प्राण अवस्थेत आहे तो इंग्रज गेल्यावर कोणत्या मुल्यांवर हा देश उभा करणार, वैभवशाली बनवणार? मी: ठीक आहे. पण एक बोचरा प्र...

शिवराज्याभिषेक व गागाभट्ट

आपण शिवराज्याभिषेक हा हिंदू साम्राज्य उत्सव का व कसा? हे पहात आहोत. अखंड ३५० वर्षे हिंदू समाजाला हा दिवस प्रेरणा व उत्साह देत आहे व महत्वाचे म्हणजे हिंदू समाजाची स्वयमेव मृग्रेंदता ही भावना जागी ठेवत आहे. एकेका उदाहरणामधून आपण हा अर्थबोध करून घेत आहोत. आज भेटू या गागाभट्ट यांना. काशीहून राजगडावर आले,हजारो मैलांचा प्रवास करून आले. बिन बुलाए मेहमान म्हणून आले व येथेच लिहिले गेले कि शिवराज्याभिषेक हा सामान्य सोहळा नसून संपूर्ण भारत वर्षाची ही आर्त गरज आहे. कारण गागाभट्ट एकटे आले नाहीत, तर त्यांच्या बरोबर हिंदुत्वाचे, राष्ट्रीयत्वाचे भूत, वर्तमान व भविष्य चालत आले होते, अता हिंदू राजा हवा ही आर्त मागणी चालत आली , भग्न पावलेली मंदीरे, त्याचे चिरे चालत येत होते, असुरक्षित स्त्रीची वेदना चालत येत होती, एका मागास तत्वज्ञानावर आधारित क्रुर पंथाच्या विकृत वर्तनाने भांबावून गेलेला सर्वसमावेशक हिंदू विचार चालत येत होता, संपूर्ण देश चालत येत होता. म्हणून हा राज्याभिषेक संपूर्ण देशाचा उत्सव होता. गागाभट्टानां राजगडावरून निमंत्रण गेले नव्हते. ते स्वतःहून आले होते. राजाला राज्याभिषेक करून घे ही विनंती...

शिवराज्याभिषेक व राज्य व्यवहार कोष

शिवराज्याभिषेक सोहळा हा एक हिंदू साम्राज्य उत्सव होता म्हणून त्या दिवसाला समस्त भारतीय समाजात एक चैतन्य लहरी निर्माण होते. हे कसे? याचा अजून एक पैलू या ठिकाणी उलगडून पाहू या. शिवराज्याभिषेकाच्या आधीही शिवाजी महाराजांचा राज्य कारभार चालूच होता.व तो प्रामुख्याने फारसी शब्दांवर चालत होता. पण राज्याभिषेका निमित्ताने राज्याचे व राजाचे सार्वभौमत्व, वैशिष्ट्य, स्वत्वाची ओळख हे सर्वच येते व त्यातच शिवराज्याभिषेक या सोहळ्याची अखिल भारतीय ओळख होते व त्या दिवसाचे महान पण जाणवते. राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराज यांनी नवीन राज्य व्यवहार कोष तयार करून घेतला. पण एवढेच याचे महत्त्व नाही, तर हा राज्य व्यवहार कोष संस्कृत भाषेत आहे. जर शिवाजी महाराजांच्या मनात हे मराठी राज्य असते तर हा कोष तत्कालीन मराठीतही बनू शकला असता. पण तसे घडायचे नव्हते. हा कोष बनवण्याची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य यांच्यावर सोपवली व त्यांनी ती जबाबदारी धुंडीराज म्हणून विद्वानांच्या मदतीने पूर्ण केली. १३८० फारसी, उर्दू शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द दिलेला बृहद् ग्रंथ अस्तित्वात आला. संस्कृत भाषेची अक्षम्य हेळसांड झाल्यामु...

शिवराज्याभिषेक व काशी विश्वनाथ

शिवराज्याभिषेक व काशी विश्वनाथ शिवराज्याभिषेक सोहळा हा फक्त सत्तेसाठी नव्हे तर संपूर्ण देशाचा व संस्कृतीचा महिमा वाढावा म्हणून केलेला एक राष्ट्र जागरणाचा उपक्रमच होता. मी उभे करीत असलेले हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य आहे हा विश्वास भारतभर पसरलेल्या हिंदू समाजाला व आग्र्याहून राजगडापर्यंत सर्व गावोगावच्या हिंदू लोकांनी आमचा राजा म्हणून जे सहकार्य शिवाजी महाराजांना केले, त्या नात्याचा उच्चरवात केलेला हुंकार म्हणजे शिवराज्याभिषेक. म्हणून हा राष्ट्रीय सोहळा. म्हणून हा हिंदू साम्राज्य उत्सव. सन १६६६ साली शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करून घेतली व १६६९ साली औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदीराला भ्रष्ट केले. त्यानंतरची शिवाजी महाराजांची कृती आम्हाला सांगते कि शिवाजी महाराज संपूर्ण हिंदू समाजाचा विचार करत होते न कि फक्त महाराष्ट्र वा मराठी माणसांचा. मी आपला सेवकच आहे म्हणत त्यांनी तक्रार काय केली तर जिझिया कर रद्द करा. हिंदुंवरील अन्याया विरूद्ध तक्रार केली आहे. डोळ्यासमोर संपूर्ण हिंदू समाज आहे. म्हणून शिवराज्याभिषेक हा अनन्यसाधारण महत्वाचा आहे व राष्ट्रीयत्वाचा अर्थ उलगडणारा आहे. शिवाजी महा...

भारताची आत्मचेतना जागवणारा राज्याभिषेक

    शिवराज्याभिषेक म्हणजेच खरं तर हिंदू साम्राज्य दिन आहे. पराभवाची एक दीर्घ परंपरा मोडून काढून हिंदू विजयाकांक्षी स्वभावाला स्वयमेव मृगेंद्रता याची आठवण करून देण्यासाठी आजपासून ३५० वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी घडवलेला कार्यक्रम म्हणजे शिवराज्याभिषेक. विजयाचा जल्लोष करण्याची सवय मोडलेल्या हिंदू समाजात विजयी चैतन्य जागवण्यासाठी घडवून आणलेला चैतन्य जागरण कार्यक्रम म्हणजे शिवराज्याभिषेक. वडिलोपार्जित गादीवर वडिलांच्या नंतर वारसाहक्काने बसण्याचा एक तांत्रिक उपक्रम म्हणून राज्याभिषेक नव्हता. तर हिंदू सरदार असतील, फार तर मांडलिक असतील पण स्वघोषित राजा असू शकेल? शक्यच नाही असे उत्तर खोटे ठरवून दाखवण्यासाठी केलेला त्या सहस्त्रकातील सर्वात रोमांचकारी उपक्रम म्हणून या शिवराज्याभिषेकाचा आठव करावयाचा आहे. म्हणून एका अर्थाने हा हिंदू साम्राज्य उत्सव आहे. म्हणून हा संपूर्ण भारत वर्षाने साजरा करण्याचा दिवस व ३५० वे वर्ष आहे. यात फक्त गडकोट किल्ले किती जिंकले याचा हिशोब नाही तर हिशोब ठेवायचा आहे शिवाजी महाराजांच्या उद्दिष्टांचा. जी उद्दिष्टे या शिवराज्याभिषेकात व्यक्त होतात. म्हणून शिवाजी म...

कथा एका पैठणीची खिळवून ठेवणारी चित्रकथा

कालच *गोष्ट एका पैठणीची* हा चित्रपट प्लॅनेट मराठी वर पाहिला. व न राहून रसग्रहण करण्यासाठी बोट शिवशिवू लागली. साधीशी बांधेसूद कथा पण इतकी थेट, परिणामकारक, व मूल्यांचा आदर करीत ललित आनंद देणारी की महादेव शास्त्री जोशी यांच्या जातकुळीची आठवण करून देणारी. इतक्या सकस, बांधेसूद कथेवरील चित्रपट सुंदर बनणारच असा विश्वास सिनेमा सार्थ ठरवतो. फाॅल पिको करायला एक पैठणी एका गरीब घरात प्रवेश करते, थोड्याशा इच्छेने, वासनेने, मूल्याचे किंचित भान सुटते व दोन तासाची तगमग जन्म घेते. अनुभव मूल्यांचे महत्व समजावून देतो अशी कथा. पण त्या पैठणी मिळवण्याच्या प्रयत्नात चार दाहक अनुभव घेऊन अमूल्य अशा तत्त्वांचे मूल्य अधोरेखित करत हा चित्रपट सुंदर आशयघन कथेला नितांत सुंदर चित्र बनवतो. छोट्या छोट्या भूमिकांमधील मोहन जोशी, गिरीजा ओक, मिलींद गुणाजी, केतकर व सर्वच कलाकार कथेला सौष्ठव देतात. प्रशस्त वाडे, देखणा निसर्ग व छोटी छोटी उपकथानक कथेला रोचक बनवतात. थेट संवाद तर कधीकधी अंगावर शिरशिरी आणतात. या पैठणीची किंमत सव्वा लाख नाही तर या साहेबाच माझ्या पोटातल पोर पाडल, ती किंमत आहे या पैठणीची. वानगी दाखल हा एक संवाद ही त...

जलीलचे औरंगजेब प्रेम

पुर्वीचे काॅंग्रेसचे अध्यक्ष अली यांनी गांधी व टरबूज विक्या मुसलमान यात श्रेष्ठ कोण? याचे उत्तर मुसलमान हे दिले होते. जलील औरंगजेबासाठी उपोषण करीत आहेत. दोघेही बरोबरच आहेत. कारण इस्लाम हेच शिकवतो. श्रध्दावान व अश्रध्दावान म्हणजे मुस्लिम सोडून सर्व, यात श्रध्दावान हाच श्रेष्ठ. म्हणून औरंगजेब हाच श्रेष्ठ. प्रश्न हिंदुंनी समजून घेण्याचा आहे कि इस्लाम व हिंदू यांचा DNA एक नाही व मुसलमानांना इस्लाम शिवाय अस्तित्व नाही. म्हणून औरंगाबाद नामांतर ही लिटमस टेस्ट आहे, देशभक्ती व इस्लाम इनाम मधील. इस्लाम औरंगजेबाबरोबर व राष्ट्रभक्त छत्रपती संभाजी महाराजांबरोबर. सुनील देशपांडे ९४२०४९५१३२.