Posts

Showing posts from September, 2021

यशस्वी कार्यपध्दतीचा धांदोळा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ*   *यशाची कारणमिमांसा.* संघ यशस्वी झाला कि नाही, हा अता चर्चेचा विषय राहिला नसून संघ यशस्वी का व कसा झाला? याचा विचार करणे आवश्यक आहे. याचे कारण असे आहे की जसे खेळात एखादा खेळाडू यशस्वी झाला कि त्याने अभ्यास करायचा असतो तो मला यश का मिळाले? या गोष्टीचा. ही विकेट कशी मिळाली, हा पाॅईंट कसा मिळाला व. तसेच ध्येयपूर्तीकडे प्रवास करणार्या संघालाही विजयाच्या कारणांची मिमांसा करणे आवश्यक आहे. त्रयस्तांना, विरोधकांना आवश्यकता असेल अथवा नसेल पण संघ स्वयंसेवकांसाठी मात्र विजयाची मिमांसा अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जगातील एकमेव असे संघटन आहे की त्याचा हेतूच संघटनेसाठी संघटना हा होता. देशासमोरचे प्रश्न समजण्यासाठी, सोडवणे तर दूरच फक्त समजण्यासाठी सुध्दा समाज संघटित असणे आवश्यक होते. हे संघाचे म्हणजे संघ संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांचे मत होते. देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न होता पण मुळात त्यासाठी खरा प्रश्न होता, देश परतंत्र का झाला? याचे उत्तर होते कारण समाज संघटित नव्हता. पण समाज संघटित नव्हता म्हणजे काय होते? तर संपूर्ण समाज एका दिशेने विचार...

पारतंत्र्याची कारणमिमांसा व उत्तर. डॉ हेडगेवार

Image
लेखांक १८* अखेर सर्व परीस्थितीचे आकलन झाल्यावर काय करायचं व का करायचं याचे मंथन सुरू झाले. देश पारतंत्र्यात पडला याचा दोष इतरांच्या माथी मारण्याची चूक न करता, आमचं अपयश आमचा दोष ह्याचा स्वीकार केला.व नंतर हा माझा समाज स्वयंप्रेरणेने, एकसमयावच्छेदे करून, सार्वत्रिक, एकच एक कृती करेल अशी तयारी केली पाहिजे हे डॉ हेडगेवार यांनी समजून घेतले.या समाजाला आत्मश्लाघेच्या दोषाने घेरलेले आहे. त्यामुळे समाजाचा आत्मसन्मान जागा करून दोषमुक्त करण्याची आवश्यकता आहे हे जाणले. तसेच विजयाकांक्षी होण्यासाठी ध्येयवाद आवश्यक असतो. व हिंदू समाजाला तर आत्मग्लानीचा रोग लागलेला होता. हा रोग येण्याचे मुख्य कारण राष्ट्र या संकल्पनेवर झालेला आघात. राष्ट्र ही संकल्पनाच वादग्रस्त बनल्यामुळे हिंदू समाज हतबुद्ध झाला व स्वातंत्र्याच्या त्याच्या प्रेरणाच नष्ट झाल्या. त्यामुळे राष्ट्र संक्लपना सुस्पष्ट करणे, या आधारावर हिंदू समाज संघटित करणे, कार्यकर्त्यांची फळी उभी करून स्वयंप्रेरणेने कार्य करण्यास प्रवृत्त करणे, व एकाचवेळी संपूर्ण देश कृती करेल असे ते संघटन असेल, व हे सर्व ज्यातून साध्य होईल अशी कार्यपद्धती ...

कार्यपद्धतीचे सुतोवाच

Image
लेखांक १९* कारणमिमांसा करून झाल्यावर त्यावरील उपाययोजना निश्चित केली व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सुचलेली उपाय योजना अमलात आणण्यासाठी आवश्यक अशी कार्यपद्धती उभी केली. सर्व स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणार्या नेतृत्वामध्ये डॉ हेडगेवार यांचे वेगळेपण हे या कार्यपद्धतीमुळे आहे. बाकी सर्वांनी उपाय सुचविले पण डॉ हेडगेवार यांनी त्यासाठी  कार्यपद्धती सुचविली व नुसती सुचविली नाही तर प्रत्य‌क्षात उतरवून दाखविली.  ध्येयवाद, ध्येयवाद व्यवहारात येण्यासाठी कार्यकर्ता व कार्यपद्धती, व ती कार्यपद्धती स्वतः ने व्यवहारात आणणे ह्या सर्व पायय्रा डॉ हेडगेवार यांनी स्वतः अमलात आणून दाखवल्या. व म्हणून डॉ हेडगेवार हे २० व २१ या दोनही शतकांवर मोहर उमटवून उभे आहेत. हे दगडगोटे व घाणीने भरलेले मैदान स्वतः डॉक्टर हेडगेवार यांनी स्वतः साफ करण्यास सुरुवात केली. हा संस्कार. प्रथम पुरुषी एकवचनी काम करण्याचा. मोहीते वाडा संघस्थान. प्रथमतः ह्या समाजाला कार्यप्रवण करायचे असेल तर त्याला स्वतः च्या स्वत्वाची जाणीव निर्माण केली पाहिजे. उत्तुंग ध्येय समोर असले पाहिजे. या समाजाला आत्मश्लाघेतून बाहेर काढण्य...

स्वातंत्र्यासाठी कार्यपध्दती रा.स्व. संघ

Image
लेखांक २०* बालपणापासून देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या डॉ हेडगेवार यांचे विविधांगी चिंतन वयाच्या ३६ व्या वर्षी पुर्णत्वास गेले व या चिंतनाला प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी जी कार्यपद्धती त्यांनी स्वीकारली तिचा जन्म १९२५ विजयादशमीला झाला.   *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.* हे नामकरण ही नंतर झाले. ही संस्था चालू झाल्यावर अनेक वर्षांनी संस्था बनली. अनेक वैशिष्ट्यांचे पेटंट घेतलेल्या संघाचे हे पहीले वैशिष्ट्य होते कि जन्मापासून ही संस्था सहज स्वाभाविक विकसित झाली. Nothing formal. लहान मूल नाव घेऊन जन्माला येत नाही. तशीच स्वाभाविक प्रक्रिया घडली संघ जन्माची. शाखा नावाने परिचित अशी कार्यपद्धती. पंधरा वर्षे ही कार्यपद्धती डॉ हेडगेवार यांनी स्वतः च्या हातानी रूजवली व संपूर्ण जग या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपध्दती कडे कौतुकाने, आश्चर्याने, विस्फारीत नजरेने पहात आहे, तर काही जण असूयेनेसुध्दा पहात आहेत. सामान्य हिंदू स्वयंप्रेरणेने समाजासाठी कार्यप्रवण झाला पाहिजे. हे उद्दिष्ट. जन्माला आली रोजची एक तासाची शाखा. निस्वार्थ बुध्दीने रोज एक तास समाजासाठी काढा. शाखेच्या बहुआयामी स्वरू...

पारतंत्र्य का? हेडगेवार चिकित्सा

Image
लेखांक १७* जगाच्या नकाशावर भारत व इंग्लंड हे कोणी आकार उकाराने पाहिले तर त्याची बोटे आश्चर्याने तोंडात गेल्याशिवाय रहाणार नाहीत. महाकाय भारत व टिचकीभर इंग्लंड. पण या देशाने भारतासारख्या खंडप्राय देशावर १५० वर्षे राज्य केले. मुंगीने हत्तीची शिकार केली. हे कसे घडले. याचे चिंतन डॉ हेडगेवार यांनी सुरू केले. आमच्या हून शूर होते, आमच्याहून ज्ञानी होते, आमच्याहून समाज ज्ञान म्हणून प्रगल्भ होते? यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी येत नव्हते. तरीही इंग्रज यशस्वी ठरले. कारण देशभक्त शिस्तबध्द समाज, विजीगिषु बेडरवृत्ती, व बरोबर उलट आम्ही. संपूर्ण देश म्हणून विचार नाही, हिंदू म्हणून संपूर्ण समाज एक नाही, व म्हणून भेदभाव, फाटाफुट, आपल काय परक काय यातील फरक कळत नाही, समान मित्र शत्रू भाव नाही. शिस्त विरूद्ध बेशिस्त १८५७. महान त्याग पण शिस्तीचा अभाव. त्यावेळी लोकमान्य टिळक म्हटले होते कि सर्व भारतीय एका दिशेला तोंड करून थुंकले तर त्या पुरात इंग्रज वाहून जातील पण दुर्दैवाने आम्ही एका दिशेला तोंड करणार नाही व एकाच वेळी थुंकणारपण नाही. ही होती समाजाची स्थिती. कुंठीत समाज याचे जगातील स...

डॉ हेडगेवार यांचे चिंतन

Image
लेखांक १६* डॉ हेडगेवार हे स्वातंत्र्य सैनिक होते, क्रांतीकारक होते पण थोडे वेगळे होते. सर्वार्थाने भारतासमोर सामान्य असलेल्या इंग्रजांना भारतात यश कसे मिळाले हा प्रश्न त्यांना सतत पडत राहिला व त्याचे उत्तर व त्यावरील उपाय शोधणं ही निरंतर प्रक्रिया त्यांच्या मनात चालू होती, हे त्यांचं वेगळेपण होते.  *व्यापार मिषाने आले* असे वर्णन इंग्रजांचे केले जायचे. पण डॉ हेडगेवार ठामपणाने म्हणाले कि नाही ते व्यापाराचे सोंग घेवून आले नव्हते तर खरोखर व्यापारासाठीच आले होते. पण आमचा समाज व देश अशा दुर्रावस्थेत होता कि अनपेक्षितपणे त्यांच्या हाती देशावर राज्य करण्याचे घबाड लागले. ही भूमिका निश्चित झाली व स्वातंत्र्याच्या प्रयत्नांची त्यांच्यासाठी दिशाच बदलून गेली. रोगाचे निदान झाले व वेगळ्याच शस्त्रक्रियेची गरज जाणवू लागली. क्रियाशील अस्वस्थतेत चिंतन व त्यातून मार्गाची निश्चिती झाली. लोकमान्य टिळक दैवत होतेच पण अशी दैवते समोर असूनही देव्हारे बनवणं त्यांना शक्य नव्हते. मान्य नव्हते. आशीर्वाद मात्र सर्वांचेच घेणार होते. चिंतन स्वतःचे, मार्ग स्वतःच ठरविला, प्रवासी पण सुरवातीला एकांडाच होता....

डॉ हेडगेवार स्मरण.

Image
लेखांक १५* डॉ हेडगेवार जन्मजात देशभक्त होते पण कोणालाही देशभक्त ही पदवी देण्याच्या विरूध्द होते. देशभक्त असणे हा नियम तर देशभक्त नसणे हा अपवाद असतो. अशा धारणेतून त्यांच्या आयुष्यातील सर्व कृती आहेत. डॉ हेडगेवार बालपणापासून स्वातंत्र्यासाठी कृतीशील होते. शाळेत खाऊचा पुडा फेकून देण्यापासून, इंग्रज अधिकाऱ्यांसमोर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना वंदे मातरम् म्हणायला लावून, जत्रेत सरकार विरोधात भाषण करून, घरापासून सीताबर्डी किल्ल्यापर्यंत बोगदा खणण्याचा प्रयत्न करून त्यांनी आपला स्वीकृत मार्ग सर्वांना दाखविला व त्याचे परीणामही भोगले. कलकत्त्यात डाॅक्टरी शिकण्यासाठी गेले पण क्रांतिकारकांच्या अनुशीलन समितीचे सदस्य बनले, उग्र दिसणारे डाॅक्टर स्फोटकही दिसू लागले. मेडीकल बील आंदोलन करून मोडून काढले. गुप्तहेर पकडून त्यालाच खबर्या बनविले व बरोबर डाॅक्टरही झाले. तिसर्या टप्प्यात जंगल सत्याग्रह केला, तुरुंगात गेले. क्रांतीकारक अनामिकाचे गुप्तपणे अंत्यसंस्कार केले, कट केले, कटाचे साहित्य बेमालूमपणे नष्टही केला. टिळकांना भेटले, नागपूर काॅंग्रेस अधिवेशनात स्वयंसेवक दलाचे प्रमुख होते, त्या अ...

१९,२०,२१ शतकांमधील आश्चर्य

Image
लेखांक १४* स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे होत आहेत. हिंदूत्वाचा द्वेष, हिंदुत्वाविषयी अपराधीपण, राष्ट्र संक्लपने विषयी सरकार व म्हणून समाजातील धुसरं धारणा व या सर्वाचा परीणाम म्हणून सहभागाने उन्नती हे तत्व विस्मृतीत गेलेल्या सुरवातीच्या काळापासून ते माझा देश माझी जबाबदारी अशा जबाबदार समाजात परीवर्तित झालेला देश हे कल्याणकारी चित्र जे दिसतं आहे त्याचे निर्माते म्हणजे  *डॉ केशव बळीराम हेडगेवार.* सन १८८९ साली जन्म व १९४० साली मृत्यू, असे ऊणेपुरे ५० वर्षाचे आयुष्य लाभलेले डॉ हेडगेवार यांनी विसाव्या व एकविसाव्या शतकावर पूर्ण प्रभाव टाकला.  राजा शालिवाहन पाडव्याच्या शुभदिनी जन्म हा जणू नियतीचा संकेतच हिंदू समाजासाठी म्हणजे भारतीय समाजासाठी होता. शककर्ते शालिवाहन यांनी मातीच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून युध्द केले व नवीन कालगणनाच सुरू झाली. डॉ हेडगेवार यांनी मृतप्राय हिंदू समाजामध्ये, पराक्रम, स्वयंप्रेरणेचे अमृत सिंचन केले व आज दोन शतके त्यांचे विचार व कृती हे सर्व जगाला मार्गदर्शन तरी करीत आहेत किंवा खुणावत आहेत. म्हणून समजावून घेऊ डॉ हेडगेवार यांचे जीवन व कार्य. सुनील...

संपूर्ण शतकावर प्रभाव.

Image
लेखांक १३* स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या खडतर प्रयत्नांसाठी मी सिध्द झालो आहे व त्यासाठी मी विवाह बंधनात न आडकण्याचा निर्णय घेतला आहे. असे आपल्या चुलत्यांना कळवून ती प्रतिज्ञा प्रत्यक्षात आणणार्या महापुरूषाचे नाव डॉ. केशव बळीराम हेडगेवार. वरील प्रतिज्ञेचे नायक म्हणून ते या लेखमालेचे महानायक नाहीत. कारण असे जीवन जगलेले अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर आहेत. परंतू या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षाच्या काळावर व या पुढील शतकावर सुध्दा त्यांच्या उक्ती व कृतीचा सर्वाधिक प्रभाव राहिला आहे व राहणार आहे. म्हणून या लेखमालेतील सर्वाधिक जागेचे ते मानकरी आहेत. हेडगेवार यांच्या प्रतिज्ञेचे दोन भाग आहेत. एक विवाह करणार नाही की जो तुलनेने सोपा आहे. पण आयुष्यभर मी स्वातंत्र्यासाठी खडतर मार्गाने प्रवास करणार आहे म्हणून पायात संसाराची बेडी नको हा भाग कर्म कठीण होता. पण त्याहूनही अवघड म्हणजे ती प्रतिज्ञा तुच्छ वाटावी एवढी अवघड पायवाट त्यांनी स्विकारली, ते जगले, व वैशिष्ट्य म्हणजे ती पाऊलवाट लाखोंना जगायला शिकवली. त्या  हेडगेवार शिक्षितांनी या ७५ वर्षांवर डॉ हेडगेवार उवाच असे ठसठशीत...

सावरकर चिंतनाचा प्रभाव

Image
लेखांक १२* स्वामी विवेकानंद यांचे शिकागो भाषण हे भारताच्या वैश्विक मार्गदर्शन करण्याच्या क्षमतेचे फक्त बीज भाषण होते पण ते स्वातंत्र्य लढ्याची उर्मी ठरली तसेच स्वातंत्र्योत्तर भारताचे ध्येय ठरले. म्हणून प्रत्येक भारतीयांसाठी ते भाषण हे अर्वाचीन काळातील गीता बनली आहे. पण तसेच स्मरण स्वातंत्र्य वीर सावरकर यांचेही केले पाहिजे. आजच्या भारतीय गौरवात ज्या दोन प्रमुख गोष्टींचा समावेश आहे त्याची पार्श्वभूमी सावरकर चिंतनात आहे. प्रथमतः आमची विदेशनिती ही अव्यवहारीक ध्येयवादावर नव्हे तर निखळ राष्ट्रीय स्वार्थावर अधिष्ठित पाहिजे हे त्यांनी सांगितले व आपण अनुभवत आहोत कि स्वप्नाळू भाबडेपणाने आपण काय गमावले होते व इस्राएल मैत्री व सर्वच राष्ट्र प्रथम निर्णय यांने कसे आंतरराष्ट्रीय स्थान मिळवत आहोत. श्रेय द्यावे कि नाही हे आमच्या मनाच्या मोठेपणा किंवा कद्रू पणाकडे आहे पण इतिहास साक्षी आहे कि आजचे आंतरराष्ट्रीय स्थान हे त्या द्रष्ट्याच्या महान चिंतनातून प्रकटलेले आहे. तसेच सुरक्षित सीमा व लष्करी सामर्थ्य हेच जगाला समजते हे त्यांनी जगातील समस्त देशांचा अभ्यास करून मांडलं व त्याचा तिरस्कार कर...

राष्ट्राचे वैश्विक चिंतन

Image
लेखांक ११* विवेकानंद यांचे शिकागो धर्मसभेतील भाषण एवढे महत्वाचं का आहे कि ज्याचे स्मरण स्वतंत्र भारताच्या ७५ वर्षांसाठी आवश्यक आहे. विवेकानंद हे कोणाच्याही कवेत माऊ न शकणारे व्यक्तिमत्व आहे. तसेच प्रत्येकाला प्रेरणा देण्याची क्षमता ही स्वामीजींमध्ये आहे. त्यामुळे स्वामीजी 'मला समजले तसे' या स्वरूपात प्रत्येकाकडून समोर मांडले जाणार आहेत. माझ्यासमोरील स्वामीजींचे जीवित कार्य कोणते? ११ सप्टेंबर. ज्या दिवशी स्वामीजींनी भारताचे वैश्विक चिंतन जगासमोर ठेवले व भारतमाता ही जन्माता का आहे हे सर्व जगाला समजावून सांगितले. जगासमोर वैश्विक एकात्मतेसाठी ख्रिश्चॅनिटी, इस्लाम व नवजात बालक अवस्थेतील कम्युनिझम असे तीन पर्याय होते. पण तिन्हीतही एकच साम्य होते की सर्व जगाने माझा मार्ग स्विकारला की वैश्विक एकात्मता होईल. ज्याच्या मर्यादा जगाला समजल्या होत्या. अशावेळी भारतभूमी मध्ये सिध्द झालेले हिंदू तत्वज्ञान हे वैश्विक तत्वज्ञान आहे व त्यायोगे संपूर्ण जग शांतीमय सहजीवन जगू शकते हे स्वामीजींनी मांडले. इतरांचे अस्तित्व फक्त सहन करणे नाही तर त्याचा आदर करणे ही हिंदुत्वाच्या सहजीवनाची पूर्...

राष्ट्र संक्लपनेची मांडणी.

Image
लेखांक १०* जे संपूर्ण आयुष्यभर स्वातंत्र्य लढ्यात होते अशा महापुरुषांच्या गुणवत्ता व त्यांचे योगदान यांचं स्मरण केले तरीही या राष्ट्राच्या महानतेचा, येथील विश्व वंदनीय संस्कृतीचा, येथील सनातन काळापासून चालत आलेल्या सातत्यपूर्ण समाज जीवनाचा जेवढा अभ्यासपूर्ण संस्कार समाजात संक्रमित करणे आवश्यक होते, ते होऊ शकले नव्हते. अशा वेळी हे असिधारा व्रत ज्यांनी खांद्यावर उचलले त्यांच स्मरण अत्यावश्यक आहे. कारण त्यांनी जे मूलभूत काम केले त्या डोलार्यावर या ७५ वर्षांतील सुखद परीवर्तन उभे आहे. यात प्रामुख्याने समावेश होतो योगी अरविंद यांचा. अलीपूर कटातील एक आरोपी असलेले स्वातंत्र्यसैनिक अरविंद पाॅंडीचेरीला गेले व भारतीय संस्कृती, सनातन संस्कृतीमधील समृध्द वारसा व या संस्कृतीचे वैश्विक तत्वज्ञान, संपूर्ण मानवजातीला गवसणी घालणारे आध्यात्म, व त्या आधारे स्वतंत्र भारताची विश्व सौहार्दतेतील भूमिका अधोरेखित केली. आजची आमची वैश्विक भूमिका ही त्या भक्कम तत्वज्ञानावर उभी आहे. १५ ऑगस्ट रोजी झालेली फाळणी ही वज्रलेप नाही हे या महापुरुषाने १९४७ च्या निबीड अंधकारातही आम्हाला सांगितले होते. फाळणी अनैसर...

राष्ट्र संक्लपनेचे चिंतन

Image
लेखांक ९* स्वातंत्र्य संग्रामाची लगबग, धावपळ, अन्य विचार नाही, अशा स्थितीमध्ये सुरवातीचे नेतृत्व होते. अत्यंत विद्वान, तल्लख बुध्दीचे, बहुआयामी प्रतिभेचे सर्व नेते हे स्वातंत्र्यासाठी सर्वस्व झुगारून देऊन उभे होते. यातील एक गणमान्य प्रकांड ज्ञानी, तरीही सामान्य जनतेने आपला मानलेला नेता म्हणजे लोकमान्य टिळक. गणिती होते, संस्कृत पंडीत होते, पत्रकार होते, वकिल होते, वेदाभ्यासक होते व कृतिशील राजकारणी, समाजकारणी होते. पण टिळक व या सर्वांना तत्कालीन ध्येयाने जखडून ठेवले होते. दिशादर्शन केले पण स्वातंत्र्य लढा सोडून अन्य विषयांना १००% न्याय देणे या नेतृत्वाला शक्य नव्हते. व त्यामुळे समाजाच्या स्वत्वाची, समाजाला सातत्याने स्मरण देण्याची आवश्यकता होती. ती रचना समाजात शिल्लक राहिली नाही. त्यामुळे बुध्दीभेदाच्या इंग्रजी कुटील खेळासमोर संपूर्ण स्वातंत्र्य चळवळ हतबुद्ध झाली. लो टिळक यांनी बद्रीप्रसाद टुलधरीया यांच्या दैशिक शास्त्र या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेतील दीर्घ स्वरूपाचे राष्ट्र संक्लपनेचे चिंतन सोडता अन्य कुठेही राष्ट्र, त्याचे जैविक स्वरूप, त्याची सांस्कृतिक ओळख ही चर्चेत व लढ्याच्य...

राष्ट्रीय ओळख विसरलो

Image
लेखांक ८* स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रेरणास्रोत वंदे मातरम् हे गीत होते. भारत माता की जय हीच घोषणा होती. इंग्रज घालवा ही उर्मि होती व या विषयी नेतृत्वापासून समाजापर्यंत कुणाच्याही मनात संशय नव्हता.  ही आमची जमीन आहे या बद्दल संशय नव्हता. ह्या भारतभूमी बाहेर श्रद्धास्थाने नव्हती व आम्ही विजयी वीर आहोत हा विश्वास होता. इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून म्हणजे हिंदूंकडून जिंकला हा इतिहास देशाला माहिती होता. तो पर्यंत या राष्ट्रीय चळवळीला विकृत पराभूत मानसिकतेने ग्रासलं नव्हतं. पण धूर्त इंग्रजांच्या  राष्ट्र व राष्ट्रीय समाज ह्या संकल्पना प्रश्नांकित करण्याच्या खेळीला यश येऊ लागले. आर्य गुणवाचक शब्द वंशवाचक बनला, मग एतद्देशीय हिंदू हे पण उपरेच हा भाव जागवला गेला. आत्मश्लाघेने समाज लज्जित बनेल हा प्रयत्न झाला. व  १९०६ सालची फाळणी मोडून काढणारा समाज, १९४७ पर्यंत स्वत्वहीन व पराभूत समाज बनला. हिंदू भाव नष्ट केल्यावर या समाजाची ओळखच काय राहीली?  लखनौ करार, खिलापतीचे लोढणे घेऊन विजयासाठी नाही तर फक्त सत्तांतरासाठी हा विश्वगुरू हिंदू समाज लाचारीचा कटोरा घेऊन उभा राहिला. व ...