Posts

Showing posts from November, 2026

बांगला देशातील सावळा गोंधळ

Image
*बांगला देशातील सावळा गोंधळ*  बांगलादेशातील सध्याचा गोंधळ व त्या आधी झालेली so called क्रांती ही कोणत्याही इस्लामी देशासाठीची अपरिहार्यता आहे हे एव्हाना सर्व विचारवंतांच्या लक्षात आले असेल अशी आशा करु या.  सामान्यपणे विदेशातील विचारवंतांच्या victim stories वरुन बांगला देशात जे घडले ये Deep state, अमेरिका, बाजारपेठेचे कारस्थान, north east तोडण्यासाठीचा कट यावर बेतलेल्या भारतीय गचाळ विचारवंतांच्या भाकड कथा व आंतरराष्ट्रीय खेळ आम्हाला कसा कळू लागला आहे व म्हणून आम्ही कसे आंतरराष्ट्रीय षडयंत्र समजून सांगत आहोत अशा भ्रमातील उजवे विचारवंत यांच्या काल्पनिक पतंगाच्या दो-या अता कापल्या गेल्या असाव्यात. जिथे मुस्लिम बहुल म्हणून इस्लामिक सत्ता असतात अथवा ताकदी असतात तेथे इस्लाम सोडून कोणतेही कारण राजकीय अस्थिरता, दंगा धोपा, विकृत वर्तन यासाठी असू शकत नाही व बांगलादेशातही नव्हते. विकृत इस्लामी वर्तन राज्यकर्त्यांकडून कमी पडू लागले की कोणत्याही नावाने ही आंदोलने उभी राहतात व इस्लाम प्रणीत कट्टरता आणून थांबतात.  बांगला देशात शेख हसीना सरकार कमी कट्टर वाटल्याने खदखद सुरु झाल...

कल्याणकारी राज्य व लोकशाही

Image
*कल्याणकारी राज्य व लोकशाही*  कल्याणकारी राज्य व लोकशाही ही एकत्र कशी नांदणार? कल्याणकारी राज्य हे खरोखरच कोणत्याही देशासाठी, समाजासाठी योग्य आहे का? कल्याणकारी राज्यासाठी सर्वात उपयुक्त व्यवस्था हुकूमशाही असणार नाही का? कर्तृत्वाचा तिरस्कार हा कल्याणकारी राज्याचा आधारभूत सिद्धांत आहे का? असे अनेक प्रश्न मनात अनेक वेळा उफाळून येतात. अर्थातच भांडवलशाही रचनेमागील तत्वज्ञान अशाच स्वरूपाचे असते अशी टीका सहजपणे करता येईल. पण ते बरोबर असेल का? तसे पाहिले तर व्यावहारिक पातळीवर भांडवलशाही, सरकारी आर्थिक एकाधिकारशाही म्हणजे रुढ अर्थाने समाजवाद, पांथिक राज्य सर्वजण कल्याणकारी राज्याचीच घोषणा करतात. अगदी गांधीवादी अंत्योदयसुध्दा. भारतीय राज्यघटनेनेसुध्दा कल्याणकारी राज्याची घोषणा केली आहे व त्यासाठी सुमारे १५/१६ कलमे खर्ची घातली आहेत. सामाजिक व आर्थिक सुरक्षा असे सर्व साधारण वर्णन करता येईल अशी ही कलमे आहेत. माणसाची किंवा सर्व सजीव जगताची पहिली गरज सर्वसाधारणपणे भूक हिच आहे. नंतर मानवेतर सजीवांना नसलेली गरज म्हणजे वस्त्र व रुढार्थाने मानवेतर सजीवांना नसलेली गरज म्हणजे घर. कारण मानवेतर सजीवांन...

बथ्था तमिळ सिनेमा

Image
*बथ्था एक तमिळ सिनेमा*  बघितलाच पाहिजे प्रत्येकाने/ प्रत्येकिने. अतिशय सामान्य मारधाड तमिळ सिनेमा वाटावा अशी सुरवात. प्रचंड जाड कोणत्याही अर्थाने हिरो न वाटणारा गुंड बथ्था हा सिनेमाचा हिरो. व आकर्षक असे काहिही बाल सौंदर्य नसलेला पण प्रचंड ताकतीचा बोलका चेहरा असलेला लहान मुलगा यांची ताकदवान कथा म्हणजे बथ्था हा सिनेमा. आपल्याकडे व्यावसायिक सिनेमा कलात्मक असण्याचे प्रमाण कमी. व समांतर सिनेमा म्हणजे सामान्य माणसांच्या भावविश्वाची चेष्टाच असते. म्हणून या व्यावसायिक चित्रपटाचे महत्त्व खूप जास्त आहे. सामान्यपणे आपल्याकडे निष्पापपणा  ( innocence) हा भाव दाखवण्यासाठी जो समजुतदारपणा लागतो त्याची क्षमता जवळपास शून्य आहे. म्हणून आपल्या सिनेमात निष्पापपणा हा बावळटपणा, चेष्टा, हास्यास्पद असा दाखवला जातो. निष्पापपणा किती सुंदर व तरलपणे दाखवता येऊ शकतो याचे मी पाहिलेल्या भारतीय सिनेमातील हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. थोडी कथा सांगायचा मोह होत आहे पण तो मी टाळतो. कारण जो निष्पाप भाव हा सिनेमा पाहुन अनुभवला पाहिजे त्याला कथा सांगितली तर छेद जाईल.  सिनेमातील उप कथानकेही तितकीच समर...