Posts

Showing posts from June, 2026

गुरु हरबिंदरसिंग साहिब यांची जयंती

Image
३० जुनला गुरु हरबिंदरसिंग साहिब यांचा जन्मदिवस आहे. गुरुजी हे शीख संप्रदायाचे सहावे गुरु. वडील व पाचवे शीख गुरु अर्जन सिंगजी यांच्या अमर बलिदानानंतर अवघ्या ११ व्या वर्षी गुरुपदी विराजमान झाले. गुरु अर्जन सिंगजी यांचे बलिदान अर्थातच इस्लामी आक्रांतांच्या विकृत अत्याचाराशी संघर्ष करताना झाला होता. संघर्ष म्हणजे बलिदान. अशा पार्श्वभूमीवर गुरू हरबिंदर साहिब हे या पदावर विराजमान झाले. यांचा कालावधी होता इसवी सन १५९५ ते १६४४. अवघे ४९ वर्षांचे आयुष्य होते. पण शिख संप्रदायातील सर्वात महत्वाच्या बदलाचे ते कर्ते होते. संप्रदायाने संघर्ष करण्यासाठी सिध्द झाल्याचे व त्याचे नेतृत्व पंथ प्रमुखाने करण्याचे भारतीय पंथ इतिहासातील ते तसे पहिलेच उदाहरण असावे. ज्यावेळी हिंदू वैश्विक चिंतन आपण अभ्यासत असतो कि जे वैविध्य फक्त स्विकारत नाहीत तर विविधता आदराने स्विकारते, त्यात तलवार कशी येऊ शकते? सह अस्तित्व हाच ध्यास असलेल्या चिंतनात पंथ तलवार कशी उचलू शकतो? अशी दुविधा मनात निर्माण होऊ शकते. किंवा तसा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो?. हाच प्रश्न हिंदू वैश्विक सहजीवन, शांततामय सहजीवन सांगत असताना हिंदू देव देवता...

वटपौर्णिमा आणि आम्ही हिंदू

Image
हिंदू समाजाची एक खोड आहे. कुणीतरी समाजातील दोष दाखवला तर आम्ही स्वतः हून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे रहातो व स्वतःच्या सात पिढ्यांचा उद्धार करतो.  आज वटपौर्णिमा आहे. ज्यांना हिंदू समाजात कवडीची किंमत नाही तेच फक्त, मराठीमध्ये ज्याला फेमिनिझम म्हणतात, त्या नावाने उगाचच गळा काढतात व आम्ही आरोपित हिंदू हा सण कसा पर्यावरण पूरक आहे याचे दाखले देत बसतो. मी हिंदू म्हणून व मुलगा, भाऊ, नवरा, बाप व सासरा अशा अनेक नात्यांनी स्त्रियांच्या भावविश्वाशी असलेल्या नात्याने काही स्पष्ट बोलणार आहे.  वट पौर्णिमा वडाचे महत्व सांगते पण त्यासाठी ती पूजा नाही तर ते स्त्री महात्म्य सांगते म्हणून महत्वाची आहे. त्यामुळे हिंदू समाज ज्यांना हिंग लावून विचारत नाही अशांच्या, मग पुरषांनी पण का नाही पूजा करायची असल्या कोल्हेकुईला उत्तर व. देत बसणार नाही.  हिंदू कुटुंब रचना ही सर्वस्वी त्यागावर उभी आहे व त्या त्यागाच्या केंद्र स्थानी हिंदू स्त्री आहे. मुलगी, बहिण, बायको, म्हणून भावजय, नणंद, आई, आजी अशी अनेक बिरुदे ती संभाळते. व या जबाबदाऱ्या जर आनंदाने सांभाळायच्या असतील तर त्याग या एकाच गुणाने ते...

भारताची आत्मप्रेरणा जागवणारा राज्याभिषेक अर्थात हिंदू साम्राज्य दिन

Image
भारताची आत्मप्रेरणा जागवणारा राज्याभिषेक अर्थात हिंदू साम्राज्य दिन. शिवराज्याभिषेक म्हणजेच खरं तर हिंदू साम्राज्य दिन आहे. पराभवाची एक दीर्घ परंपरा मोडून काढून हिंदू विजयाकांक्षी स्वभावाला स्वयमेव मृगेंद्रता याची आठवण करून देण्यासाठी आजपासून ३५० वर्षांहून अधिक काळ शिवाजी महाराजांनी घडवलेला कार्यक्रम म्हणजे शिवराज्याभिषेक. विजयाचा जल्लोष करण्याची सवय मोडलेल्या हिंदू समाजात विजयी चैतन्य जागवण्यासाठी घडवून आणलेला चैतन्य जागरण कार्यक्रम म्हणजे शिवराज्याभिषेक. हिंदू राजा हिंदूंचा राजा  वडिलोपार्जित गादीवर वडिलांच्या नंतर वारसाहक्काने बसण्याचा एक तांत्रिक उपक्रम म्हणून राज्याभिषेक नव्हता. तर हिंदू सरदार असतील, फार तर मांडलिक असतील पण स्वघोषित राजा असू शकेल? शक्यच नाही असे उत्तर खोटे ठरवून दाखवण्यासाठी केलेला त्या सहस्त्रकातील सर्वात रोमांचकारी उपक्रम म्हणून या शिवराज्याभिषेकाचा आठव करावयाचा आहे. म्हणून सर्वार्थाने  हा हिंदू साम्राज्य उत्सव आहे. म्हणून हा संपूर्ण भारत वर्षाने साजरा करण्याचा दिवस  आहे. हिंदू साम्राज्य दिन आहे. यात फक्त गडकोट किल्ले किती जिंकले याचा ह...

छत्रपति संभाजी महाराज यांची जयंती

Image
या वर्षी २६ जूनला छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीने जन्म दिवस साजरा होत आहे. खरं तरं छत्रपति संभाजी महाराज यांनी स्वतःचा मृत्यू एवढा महान करुन ठेवला आहे, मृत्युंजय करून ठेवला आहे की तो मृत्यू, ते धिरोदात्त मरण हि एक ललित कृति बनून राहिली आहे. संभाजी महाराज हा शब्द उच्चारताच फक्त बलिदानच आठवते, एवढे ते बलिदान हे महान आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या पराक्रमाने इतिहास जेवढा आश्चर्य चकित झाला नसेल एवढा त्या मृत्यूने इतिहास हा पुलकित झाला आहे. त्या मृत्यूचा पराक्रम समजण्यासाठी अपरिहार्य म्हणून फक्त जन्म आहे. पण तरीही त्या दिवसाचे स्मरण आवश्यक आहे कारण त्या दैदिप्यमान मृत्यूला संभाजी महाराज का कवटाळू शकले याचे उत्तर त्यांचा जन्म ते मृत्यूपर्यंतच्या आयुष्यात दडले आहे. त्या अनोख्या मृत्यु आलिंगनामुळे त्या जन्मकळा जरी झाकोळल्या गेल्या असल्या तरी तेथूनच हा दैदिप्यमान मृत्यू स्विकारण्याची कणखर मानसिकता बनत होती. जन्म झाला त्यावेळी राजपुत्राच्या जन्माचा सोहळा, उत्सव साजरा होत नव्हता तर त्यावेळी संपूर्ण स्वराज्य हतबल होते, जणू मृत्यूचा तातच गळ्याला लागला होता. आनंद उत्साहाने साजरा करणे श...

योग दिवस

Image
योग दिवस  दि. २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पण साजरा होतो. सामान्यपणे आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करण्यामागे तीन प्रमुख कारणे आहेत. १ आंतरराष्ट्रीय समस्यांकडे लक्ष वेधून घेणे  २ मानवी अधिकारांचे रक्षण करणे  ३ आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न. हे योग्य आहे व आवश्यकही आहे. पण यामध्ये एक कमतरता आहे, ती म्हणजे हे सर्व प्रयत्न आग लागली म्हणून विहिर खणण्यासारखे आहे. उदाहरणार्थ लहान मुलांचे लैंगिक शोषण होते म्हणून त्या समस्येविरुध्द जनमत करण्याचा प्रयत्न करणे किंवा मानवी हक्कांचे उल्लंघन लक्षात आले म्हणून मानवी हक्क दिन अथवा सामंजस्यासाठी पृथ्वी दिन साजरे केले जातात. असे आंतरराष्ट्रीय दिन १४० आहेत. या पार्श्वभूमीवर आपण योग दिनाचा विचार करु शकतो. किंबहुना भारतीय म्हणजे हिंदु विचार कसा काम करतो हे पाहु शकतो. जगातील समस्या एवढे दिन साजरे करुनही कमी होत नाहीत. उलट वर्षातील ३६५ दिवस कमी पडतील एवढ्या समस्या वाढत आहेत. याचे कारण आहे जगासमोर सुयोग्य तत्वज्ञान, त्या प्रकाशात प्रवास केलेला इतिहास, तसे तत्वज्ञान आत्मसात केलेला समुदाय व भूमि हे सर्व नीटपणे आलेली नाही. ब...

डॉ हेडगेवार

Image
 डॉ केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्माला १३७ वर्षे झाली आहेत. जन्म १८८९ पाडव्याचा. सामान्यपणे कोणतिही कर्तबगार व्यक्ति ह्या कालावधीत विस्मृतिच्या पडद्याआड गेलेली असते. पण डॉ केशव बळीराम हेडगेवार हे काही वेगळेच अजब असे रसायन आहे. त्यांच्या मृत्युला सुध्दा ८६हुन अधिक वर्षे झाली आहेत. मी लहान बाळ असताना डॉ केशव बळीराम हेडगेवार यांना पाहिले होते असे म्हणू शकणारी एखाददुसयी व्यक्ती सुध्दा आज नव्वदीच्या पुढे पाहिजे. व असे असूनही आजसुद्धा डॉ हेडगेवार यांचे नाव, चरित्र, आठवणी व मार्गदर्शन कोट्यवधी जनतेला माहिती आहे व त्या मार्गाने चालणारी अशीच लाखोंच्या संख्येत कार्यकर्ते मंडळी आहेत. ज्यांना जग स्वयंसेवक म्हणून ओळखते. व फक्त भारतच नाही तर जगभराच्या काना कोपऱ्यात कुणी ना कुणी तरी हे पाथेय अभिमानाने मिरवत आहे. अशा डॉ केशव बळीराम हेडगेवार यांचे स्मरण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे की आज जे डॉ हेडगेवार हे नाव सर्वदूर आदराने परिचित आहे त्यांच्या  मृत्यू समयी काही फार थोड्या लोकांना ते परिचित होते. मग असे काय घडले की प्रत्यक्ष कार्यरत देह अस...

तुळजाभवानीचे दर्शन

Image
तुळजापूरची तुळजाभवानी ही आम्हा देशपांडे कुटुंबियांची कूलस्वामिनी आहे. त्यामुळे मी सपत्निक व मुलगा, सून असे शनिवारी ( Corporate जगताला) सुट्टी म्हणून पुण्याहून तिच्या दर्शनासाठी गेलो. नवीन लग्न झालेले जोडपे व नवीन गाडी दोन्ही तिच्या पायाशी घालून आलो.  तसा दिवसात ६०० किलोमीटर प्रवास व देवीच्या दर्शनासाठी ४, ४/३० तासाचा रांगेतील प्रवास हा भरपूर थकवणारा होता. पण ४/५ सेकंदांच आईचं सुंदर दर्शन झालं. काळ्या रुपातील तेजस्वी डोळ्याची आईची मुर्ती देखणी आहेच पण कणखरही. हजारो लेकर रांगेत होती. यातील कुणीही Black life matters? च्या आंदोलनात नसत कारण या सगळ्यांची आईच काळी. पण या आईच्या रंगाची ओळख नसलेल्या पेज थ्री जनतेच्या इंग्रजी आंदोलनात समाजाचा सहभाग का मिळत नाही हे ही मला समजले. या रांगेत ४/५ तास वेळच वेळ होता. तेंव्हा आईच्या आईपणाची परत ओळख झाली. या आईने आईपणाची किती झिज सोसली ते आठवले. एका गाण्याच्या चार ओळी आठवल्या. तुळजापूरची भवानी, माय मह्नमंगला, राऊळात अधम खान, दैत्यासह पोहोचला, मुर्ती भंगली, मनात चित्रगुप्त हासला, केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला. आम्हा सर्वांचे दैवत असलेले छत्रपति शिव...

भारतीय Zen Z चे अभिनंदन

Image
झुरळ पार्टीच्या निमित्ताने भारतीय Zen Z चा अपमान नको असा एक लेख मी लिहिला होता व भारतीयांना अनाठायी वाटणारी भिती सोडावी असा अनाहुत सल्ला दिला होता.  काल जंतरमंतर वरील आंदोलनानंतर परत एकदा याचे स्मरण करुन देणार आहे. यावेळी थोडी तुलना करून तोच मुद्दा परत मांडत आहे. जंतरमंतर वरील दिवाळखोर आंदोलन आपण पाहिले व भारतीय Zen Z आपला वापर भारतविरोधी हत्यार म्हणून करून देणार नाही हे विधान नक्कीच पटले असणार. इकडच्या तिकडच्या चार विद्यार्थी संघटना सोडल्या तर जबाबदार Zen Z तिकडे फिरकली नाही. पण त्याचे कारण Zen Z आळशी आहे हे नसून ती हजारो वर्षांपासून संस्कारित आहे म्हणून.  या विधानाच्या सत्यतेसाठी अता आपण एक तुलना करु या. कालच तामिळनाडू मधील भाजपचा चेहरा अन्नामलाई यांनी भाजपचा राजिनामा देऊन तामिळनाडूच्या द्रविडीयन राजकारणाला पूर्ण नेस्तनाबूत करुन तमिळ अस्मिता राष्ट्रीय एकात्मता उभी करण्यासाठी पक्ष उभारणी सुरू केली आहे. तिचे भवितव्य हा चर्चेचा विषय नाही. पण एखाद्या जबाबदार नेत्याने जर Zen Z च्या हृदयाला साद घातली तर काय होते? हे तामिळनाडू मध्ये पहायला मिळाले. फक्त अभासी...