वीर विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हा फक्त नामोच्चार सुध्दा कोणत्याही वयातील माणसाला तरुण बनवतो, क्रियाशील बनवतो, तळपती तलवार बनवतो, संवेदनशील ह्रदय बनवतो, ध्यासी बनवतो, साहित्यिक व सैनिक एकाचवेळी बनवतो, ध्येयधुंद बनवतो, कणखर बनवतो, कडवाही बनवतो व क्षमाशीलही बनवतो. यात अजून कोणतेही विशेषण टाका. चालेल. तो बावनकशी सोन बनवतो. भारतात अशी काही नररत्ने जन्मली, ज्यांना पुर्नजन्माची गरजच पडली नाही. त्यांच्या साठी अनेक जन्मांची परमेश्वराने नेमलेली कामे या अद्वितीय पुरुषांनी एका जन्मातच पुर्ण केली. परतीचे दोरच कापून टाकले. त्यातील एक महनीय व्यक्ती म्हणजे विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्य योध्दा म्हणून काम दिले तर, वाक्वैभवही तुझ अर्पियेले असे म्हणत बोरू पासून बाॅंब पर्यंतचे सर्व मार्ग हातळले, होरपळून घेतले व अनेकांना चालवत नेले. साहित्य निर्मिती करा असा संकेत दिला तर एका जन्मात एक साहित्य शाखा असा धोपट मार्ग नाही तर येथेही उत्स्फूर्त उधळण. कथा कादंबरी, काव्य, नाटक, इतिहास, चरित्रे सर्वकाही. अगदी उर्दू गझला सुध्दा. कल्पना उत्तुंगच करायची, शत जन्म शोधताना . साहित्य निर्मिती ही केली व त्यातुनच बाॅ...