Posts

Showing posts from October, 2023

धडपड्या मुलीची साठी

धडपड्या मुलीची साठी. आज एका धडपड्या मुलीची, पद्माची साठी आहे. पण तिच्या स्वभावाने त्या वयाला मागेच कुठे तरी आडवून ठेवले आहे. कधी पंधरा असतं तर कधी पंचवीस, पण तिने कधीच वयाला चाळीशी पार करू दिली नाही. उत्साह, उन्मुक्त जगणे याच बरोबर नवीन शिकतांना तर वय विशीतच अडकून पडत. सोशल मिडिया हा खरं तर स्वतःला व्यक्त करण्याची जागा पण पद्मासाठी मात्र काही तरी नवीन शिकण्याची, प्रयोगात आणण्याची जागा, व महत्वाचे म्हणजे कुतुहूल जाग ठेवण्याची जागा आहे. तिची घरगुती स्थिती व तिनी गाठलेले वैयक्तिक आयुष्यातील यशाचे टप्पे याला काही ताळमेळच नाही. शिवाजीनगरच्या कोर्टात स्वतंत्र अस्तित्व असलेल्या महिला वकिलांची संख्या नगण्य, त्यातही कोणतीही पार्श्वभूमी नाही, आशिर्वाद नाही अशा महिला वकिलांची संख्या तर आणखीनच क्षीण पण त्यातील एक व खर तर म्हणता येईल की एकमेव म्हणजे पद्मा बोणटडकर वकील. पण हे एवढेच नाही. ऐन भरातील ती वकिली तुळशीपत्र वहावे एवढ्या सहजतेने सोडूनही दिली. जगायला किती पैसे हवेत याचा हिशोब केला, थोडे जास्त साठवले व पैशासाठीची धावपळ थांबवली. या प्रकारचे विचार खूप ऐकले आहेत पण कृती प्रत्यक्षात आणलेली एक पद्म...

रंगा हरीजी गेले

*संवादासाठी भाषा सहकार्य करते,अडचण नाही* रंगा हरीजी त्यावेळी रा स्व संघाचे अखिल भारतीय बौध्दिक प्रमुख होते. त्यावेळी नाशिक धुळे जळगाव येथे त्यांच्याकडून संघ समजून घेता आला हे माझे भाग्यच. पहाटे उठून ३/४ वाजता एक टाकी पत्रव्यवहार सुरू व्हायचा. घरातले उठले की चहाच्या वेळी गृहिणीशी गप्पा. No RSS  फक्त स्थानिक व कौटुंबिक संक्लपनेचे स्पष्टीकरण होईल अशा गप्पा.  माझ्या पत्नीला त्यांनी "अतिथी" शब्दाचा अर्थ समजून सांगितला होता. त्या नाशिक-धुळे-जळगावमधील तीन दिवसांत शाखा मुख्य शिक्षकांचा वर्ग जिल्हाश: होता. थेट संवाद कसा करायचा हे शिकण्यासारखं होत. मुख्य शिक्षक हा लहान, संघ अनुभव नसलेला, हिंदी न समजणारा, त्यामुळे थेट संवाद कसा साधणार हा प्रश्नच होता. त्यात त्यांची एकच सूचना, मुख्य शिक्षक सोडून कोणीही बोलायचं नाही. धुळे प्रवासात जनजातीय मुख्य शिक्षक जास्त, मराठी धड न बोलणारे, यांचे कसे होणार? मी रंगाजींना अडचण सांगितली. ते म्हणाले मी बघतो. व त्या संघ कामाच्या बैठकीतील पहिला प्रश्न होता,"कितने शिक्षकोंके घरमे सुबह जानेके लिए टट्टी है?" सर्वांना उत्तर आले व संवाद सुरू झाला.भाषेम...