राष्ट्रीय अस्मितेसाठी शिक्षणाची भूमिका
लेखांक ४८* समाजाचे संपूर्ण खच्चीकरण करण्यासाठी इंग्रजांनी ज्या क्षेत्राचा सर्वात जास्त वापर केला व ज्याचे सर्वात दीर्घकाळ दुष्परिणाम समाजाच्या मनोधैर्यावर झाले ते क्षेत्र म्हणजे शिक्षण. राष्ट्र जीवनच नाही, मागास समाज, फुटीरतेला खतपाणी मिळेल असे शिक्षण बाल संस्कार वयापासून दिले जात होते. याचा परिणाम म्हणून पिढ्यांमागून पिढ्या आत्मश्लाघेच्या बळी पडल्या. येथे एक उन्नत राष्ट्र जीवन होतं याचाच विसर शिक्षीतांना पडला. अशा वेळी या गर्द अंधारल्या क्षेत्रात प्रसिद्ध गांधीवादी व शिक्षण तज्ञ धरमपाल यांनी आशेचा किरण जागवला. त्यांच्या The Beautiful Tree या अभ्यास ग्रंथाने जणू क्रांती केली. हा एक व अशा अनेक ग्रंथ निर्मिती आधारे धरमपाल यांनी भारताची शैक्षणिक प्रगती याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला. गांधीवादी विचारवंत धरमपाल यांनी भारताचे शैक्षणिक मागासलेपण या आरोपातील हवा अभ्यासपूर्ण पणे काढून टाकली. या पुस्तकातून इंग्रज येण्याआधीची भारतातील शैक्षणिक स्थिती, साक्षरतेचे प्रमाण, शिक्षकांचे पगार, महिला शिक्षणाचे प्रमाण समकालीन इंग्लंड मधील भारताच्या तुलनेतील शैक्षणिक मागासलेपण याचे इंग्रजांच...