जखमा पुसल्या जातात, व्रण रहातात
करोना महामारी येऊन गेली, त्यातील तपशील अता विसरणीला लागले आहेत. त्यापूर्वी १०० वर्षे प्लेगची महामारी आली व त्यातील तपशील ही विस्मृतीत गेले. १९७५ च्या जून मध्ये लोकशाहीचा संकोच नव्हे निर्घृण हत्या करणारी आणीबाणी आली व त्यातील तपशीलही विस्मृतीत चालला आहे व अधिकाधिक धूसरच होत जाणार आहे. या तीनही घटना समाज जीवनावर व समाज मूल्यांवर आघात, जखम करणा-या घटना आहेत . जखमा भरल्या जातात, येथेही त्या भरल्या जात आहेत. पण जखमेचा व्रण महत्वाचा असतो. तो पुसता येत नाही. तो रहाणे खूप महत्वाचे असते. आज आपण तो व्रण जपू या. कोणते व्रण आहेत.? हे व्रण आहेत, त्या संकट काळात कोणती मूल्ये जपली गेली, ती मूल्ये म्हणजे त्या दुर्दैवी जखमेचे व्रण. प्लेगच्या साथीत इंग्रजी अत्याचाराची जखम अता भरली आहे पण त्यातून जे देशभक्तीचे स्फुल्लिंग पेटले, ते चाफेकर स्मरणाने, गोंद्या आला रे च्या गजराने आजही जिवंत आहे व हे व्रणच जिवंत ठेवायचे असतात. तपशीलाची फोलफट काळौघात उडून गेली तरी चालतात. लोकमान्य टिळक, चाफेकर बंधु, गोडसे, पुण्याचे इंजिनियरिंग कॉलेज, तेथे बनवलेली गोळी हे व्रण स्मरणात ठेवायचे असतात. करोना, त्याचे रौद्र रूप, मृत्य...