'हिंदू वैश्विक चिंतन' उपनिषदांच्या प्रकाशात
प्रास्ताविक आधुनिक जगामध्ये वैश्विक रचना म्हणून तीन मार्ग मान्यताप्राप्त आहेत. त्यातील एक आहे ख्रिश्चनिटी, दोन इस्लाम व तिसरा पराभूत पण तरीही दीर्घकाळ परिणाम केलेला कम्युनिझम. या मध्ये अध्याऋत होते की सर्वांना एका रचनेत आणले की जगातील संघर्ष नष्ट होऊन शांततामय जग रहाटी चालेल. पण वास्तवात याच्या विपरित घडलेले जगाने पाहिले आहे. परंतु आपल्याला जे मार्ग अपयशी ठरले त्याचे विश्लेषण करत बसण्याची आवश्यकता नाही तर जगात शांतता तर हवी, समंजसपणा हवा, सहजीवनाची ठोस रचना हवी. कोणत्याही संघर्षाची झळ सामान्य जनतेला बसू नये. अविश्वासाचे वातावरण निर्माण होता कामा नये. यासाठी मार्ग कोणता आहे? हा प्रश्न आहे. यावेळी हिंदू ही संक्लपना विचारात घेतली जाणे आवश्यक आहे. हिंदू ही फक्त संक्लपना नसल्याने व एकच एक धर्मग्रंथ, प्रेषित नसल्याने, वैश्विक चिंतन म्हणून हिंदू संक्लपना स्वतंत्रपणे विचारात घ्यावी लागत आहे. हिंदू ही सनातन कालापासून चालत आलेली एक अभिव्यक्ती आहे व म्हणूनच ती व्याख्येत बध्द नाही. म्हणून हिंदू वैश्विक चिंतन स्पष्ट होईल एवढ्यासाठी हिंदू शब्दाचे स्पष्टीकरण विचारात घेऊ. म्हणून या ठिकाणी हिंदू म...