भगिनी निवेदिता
भगिनी निवेदिता हिंदू धर्म, हिंदू तत्वज्ञान, हिंदू समाज व हिंदू राष्ट्र हे सर्व एक सनातन वैश्विक चिंतन आहे हे व्यवहारिक पितळीवर सिध्द होते ते भगिनी निवेदिता यांच्या संपूर्ण जीवन कहाणी मधून. म्हणून ज्यावेळी सर्व जग हिंदू जीवनदृष्टी व वैश्विक चिंतन समजावून घेण्यासाठी असूसलेली आहे, अशावेळी तर भगिनी निवेदिता यांचे जीवन उदाहरण म्हणून जगासमोर नीट मांडले गेले पाहिजे. भगिनी निवेदिता या आयर्लंड मध्ये राहणा-या स्काॅटीश होत्या. शिक्षिका होत्या, इंग्लंडमध्ये रहात होत्या. कोणत्याही अर्थाने हिंदू धर्म, तत्वज्ञान, समाज व राष्ट्र या चारही अंगांशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध आला नव्हता. स्वामी विवेकानंद यांच्याशी त्यांचा संबंध आला, त्यांना मानवतेचा मुलाधार हिंदू धर्म थोडा फार विवेकानंद यांच्या विचार व कृती मधून समजला होता. व त्या प्रभावाने निवेदिता भारतात आल्या व संन्यास घेऊन भगिनी निवेदिता बनल्या. भगिनी निवेदिता यांच्या जीवनाचा अभ्यास हा अनेक अर्थांनी हिंदू वैश्विक चिंतन समजावून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. कारण ही कहाणी फक्त गुरु शिष्यांची नाही. तर एक संपूर्ण जीवनदृष्टी स्विकारण्यासाठी कोणकोणते घटक...