टि. बि. कुन्हा
Denationalisation of Goans या ग्रंथाचे लेखक व गोवा मुक्ती साठी आघाडीचा योध्दा म्हणजे टि. बी. कुन्हा. पण स्वातंत्र्याची लढाई सर्वार्थाने जिंकायची असेल तर जी भूमि स्वतंत्र करायची आहे, त्याची संस्कृती, धर्म , तत्वज्ञान नीट आत्मसात असले पाहिजे व त्या मुळे निर्माण होणारा शत्रुबोधही नीट जाणता आला पाहिजे तर तो समाजच स्वातंत्र्य मिळवू शकतो. व भारताची ही ओळख गोव्याला सुध्दा आहे, हे सांगणारा देशभक्त म्हणजे टि. बि. कुन्हा. तसे जन्माने कॅथोलिक ख्रिश्चन पण कर्माने चर्चच्या मते नास्तिक असल्याने व कायम स्वतः ची मूळे भारतियत्वात व सनातन राष्ट्र जिवनात शोधणारे असल्याने किंचितही पातळपण न आलेले राष्ट्रभक्त होते. त्याहुनही महत्वाचे म्हणजे जन्माने मिळालेला पंथ कधीही परंपरेने मिळालेल्या संस्कृतीवर स्वार होऊ दिले नाही. म्हणून झेवियर कधीच त्यांच्या दृष्टीने संत होऊ शकला नाही. फक्त पोर्तुगीजच त्यांचे शत्रू नव्हते तर हे सनातन समाजाला बेहाल करणा-या ख्रिस्ती धर्म प्रचारकांचे कठोर विरोधक होते. कुन्हांचे मोठेपण हे आहे कि ख्रिस्ती पंथ प्रचारक व पोर्तुगाल राजसत्ता यांचे साटेलोटे त्यांनी नीट ओळखले होते व झ...