Posts

Showing posts from June, 2024

भारतीय सार्वभौमत्वाचे जीवनदान डॉ मुखर्जी यांचे बलिदान

श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान स्मरण दिन. स्वातंत्र्योत्तर भारतातील स्वातंत्र्यासाठीचे पहिले आंदोलन छेडले असतानाचा पहिला बळी म्हणजे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी होत. स्वातंत्र्योत्तर भारतातील स्वातंत्र्यासाठी ह्या परस्पर विरोधी भासणा-या वाक्यातच या आंदोलनाचे महत्त्व लपलेले आहे. व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलीदानी नेतृत्वाचे सुध्दा. वास्तविक स्वतंत्र भारतातील पहिल्या मंत्रीमंडळात ते व्यापार मंत्री होते. पण वैयक्तिक स्वार्था पलिकडे राजकारण ठेऊन ते सत्तेतून बाहेर पडले व नवीन राजकीय पक्ष स्थापन केला. कलकत्ता या विख्यात विद्यापिठाचे ते पूर्वी कुलगुरू होते. तसेच फाळणीच्या वेळच्या बंगाली हिंदूंच्या हतभाग्याचे साक्षीदार होते. व त्यामुळे इस्लाम, मुस्लिम व्यवहार व त्यातील विकृत लालसेशी नीट परिचित होते. त्यामुळे या देशात राष्ट्र सर्वेतोपरी असा भाव असणारा पक्ष आवश्यक आहे हे जाणले व भारतीय जनसंघ स्थापन केला. त्या नंतरचे हे पहिलेच आंदोलन. नव्हे स्वतंत्र भारतातील पहिला स्वातंत्र्य लढा उभारला. काश्मीर मध्ये. काश्मीर संस्थान सार्वभौम भारतात विलिन करण्यात पं. नेहरुंनी जो होळ घालून शेख अब्दुल्ला यांना ने...

नालंदा व शिवराज्याभिषेक

या जून २०२४ मध्ये दोन ऐतिहासिक महत्वाच्या घटना घडल्या. ज्यात काही साम्य स्थळे शोधणे आवश्यक आहे. नालंदा विश्व विद्यालय नवीन वास्तुत प्रविष्ट झाले व जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजे २० जून २०२४ शिव राज्याभिषेक दिन आहे. दोन्ही प्रसंगात काही महत्वाची साम्य स्थळे आहेत. नालंदा पुन्हा निर्माण करावे लागले कारण ते बख्तियार खिलजीने कुराणाशिवाय अन्य ज्ञान नाही म्हणून जाळून टाकले होते. ज्ञानाचा जगातील सर्वात भयावह अपमान या ठिकाणी झाला. व पराभूत मानसिकतेतील हिंदू समाजाने या विकृत सरदाराचे नाव उत्तर प्रदेश मधील रेल्वे स्टेशन वर काल परवा पर्यंत उरावर बाळगले होते. तर हिंदू राजा, विजिगिषु असू शकत नाही हा ५००/६०० वर्षांचा अपमान शिव छत्रपती यांनी ३५० वर्षांपूर्वी मोडून काढला होता. म्हणून या दोनही दिवसांचे महत्व एकच आहे. अपमान गिळायचा नाही तर प्रतिशोध घेऊन नष्ट करायचा असतो हे महत्व अधोरेखित होते. व प्रतिशोधही किती सकारात्मक व तेजस्वी. ज्ञानाचा अपमान पराभूत केला नवीन विद्यापीठ व त्याच स्थानी, त्याच नावाने प्रस्थापित करून. व हे हिंदू समाजाने शेकडो वर्षे सल मनात ठेऊन घडवून आणले. तर शिवाजी महाराजांनी हिंदू संस्कृत...

स्मरण नालंदा विश्व विद्यालयाचे

नालंदा विश्व विद्यालयात कार्यक्रम झाला. पण मला आठवले की ज्ञानाचा द्वेष कोण करत? ज्ञानमार्गी व्हायचेच पण ते ज्ञान जाळणार तत्वज्ञान अधिक लक्षात ठेवायच. कुराणा बाहेर ज्ञान नाही म्हणणारे कोण? हे अधिक नीट स्मरणात ठेवले पाहिजे. ज्या तत्वज्ञानाने नालंदा मधील ग्रंथ संभार जाळला त्या विकृतांचा अत्ता मुस्लिम असणा-यांनी निषेध केला पाहिजे अशी अपेक्षा ज्ञानमार्गी समाजाने केली पाहिजे.  कारण ग्रंथ जाळणा-यांनी कुराणाचा आधार घेतला होता. त्यामुळे कुराण मानणा-यांची जबाबदारी आहे की अशा विकृतांचा निषेध करणे. पाहु या, नालंदा नाव आल्यावर किती जणांना या ज्ञानमार्गी संस्कृतीचा अपमान आठवतो. सुनील देशपांडे  ९४२०४९५१३२

निवडणूक २०२४ हिंदू विजयाचे स्मितहास्य केरळ

२०२४ निवडणूक हिंदू चेह-यावरील स्मितहास्य  वर्तमान लोकसभा निवडणूक, त्याचे निकाल, माध्यमावलंबामुळे आलेले नैराश्य, या पार्श्वभूमीवर मला अजून एका विश्लेषणामुळे हिंदू चेह-यावरील स्मितहास्य जाणवत आहे. ते आहे केरळ राज्य. फक्त २० लोकसभा मतदारसंघ असलेला प्रांत. पण बंगाल नंतर स्वतःच्या संघटित शक्तीवर सत्तेत असणारे डाव्यांचे एकमेव राज्य. तसेच मरणप्राय काॅंग्रेसला लोकसभेसाठी धुगधुगी देणारा प्रांत. विरुध्द बाजूला अपरिमित त्याग, बलिदानानंतरही हिंदू संघटनेला राजकारणात मध्यवर्ती भूमिका घेऊ न दिलेला केरळ. अशा केरळमध्ये २०२४ च्या निवडणुकीने काय दिले हे पाहिले कि स्मितहास्याचे कारण कळते. या निवडणुकीमध्ये केरळमध्ये १९५२ पासून प्रथमच कोणत्याही रुपातील जनसंघाला लोकसभेची जागा जिंकता आली आहे. थिसुर हा मतदारसंघ व सुरेश गोपी हा कलाकार. या मतदारसंघातून प्रथमच भाजप झेंडा खांद्यावर घेऊन विजयी झाला. सतत धडका मारून मारून हिंदू समाजाने केरळमधील डावा खडक फोडला.निसटता नाही. दणदणीत विजयाने फोडला. डाव्यांची हिंदू मतांवरील मक्तेदारी मोडून काढली.  हिंदूंनी हिंदू म्हणून मतदान केले. जाती चौकटी बाहेर जाऊन आद्य शंकराच...

माध्यमावलंबिंचा सावळागोंधळ

माध्यमावलंबियांचा सावळागोंधळ  जमिनी वास्तवाशी काहीही संबंध नसताना माहितीच्या मायाजाळात अडकून स्वतःच स्वतःला दु:खी करण्याचा खेळ सध्या माझ्या सारख्या सामान्य माणसांचा चालू आहे. व ही माहिती अनेकविध मार्गांनी व इतक्या वेगाने आदळत आहे की ती स्विकारताना त्याचे तार्किक विश्लेषण करण्याची मनस्थिती राहीली नाही. अन्यथा विजयानंतर एवढी हतबलता मला वाटलीच नसती. माझ्या सारख्याचा आणखी एक विशेष दोष मला जाणवला. स्वतःच्या सामान्यपणावर मात करण्यासाठी मला तालेवार माणसे, पक्ष, संघटना यांना लहान दाखवण्याची संधी मिळाली की मी ती पूर्ण ताकदीनिशी वापरून घेतो. कारण त्यांचे दोष काढून मी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. मोदींपासून सुरवात करून, फडणवीस मार्गे पुण्यातील कार्यकर्ते कसे चुकले व म्हणून आपण हरलो हा तो प्रवास असतो. तेंव्हा माझे तर्कशास्त्र अडगळीत पडलेले असते. अरे तू तुझ्या अपेक्षाभंगाला, प्रत्यक्ष विजय असून पराजय म्हणतो आहेस. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वी विजयी झालेले घंगेकर २५००० मतांनी पिछाडीवर पडले. जनतेने तिचे काम चोख पार पाडले आहे. पण माध्यमावलंबी झालो असल्याने ज...

विजय ही विजय है

विजय ही विजय है  निवडणूक संपली. कवित्व चालू आहे. त्या वाहत्या गंगेत आपलही तर्पण. निराशा येते. पण आपल्याला निराशा का आली? याचाही विचार केलाच पाहिजे. सध्या माहितीच्या अतिरेकी मा-यामुळे जमिनीशी नाळ नसलेल्या आपल्या सारख्या सामान्य नागरिकांच्या मनात कल्पनांचे अबलख वारू घोडदौड करत असते. व मग ४०० पार हे वास्तव वाटू लागते व मग वास्तव हे निरभ्र न वाटता झाकोळ वाटू लागते. मी पण त्या वास्तवाचा भाग आहे. अशा वेळी जरा त्रयस्थ होता आले पाहिजे. मी ही प्रयत्न करतोय. मला आकड्यात शिरायचे नाही. मला माझ्या कल्पनेतील हिंदू हिताचा विचार करायचा आहे. अगदी स्वतंत्र भारतात तामिळनाडूमध्ये प्रभू श्रीरामांच्या, चपलेचे हार घालून हजारोंच्या संख्येने निघालेल्या खास द्रविडी मिरवणूका आपण पाहिल्या आहेत. त्याच  तामिळनाडूमध्ये राम मंदिरामध्ये रामललांची प्राण प्रतिष्ठा श्रध्देने व उघडपणे करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लाखो हिंदू, हिंदू म्हणून जमत होते, जय श्रीराम च्या घोषणा देत होते व २,३% मत नसलेल्या भाजपला एकट्याला ११, १२% मत देतात हा मला हिंदू जागरणाचा विजय वाटतो आहे. केरळमध्ये खात खोलल हा हिं...