Posts

Showing posts from November, 2024

अन्वयार्थ

अन्वयार्थ  महाराष्ट्रातील निवडणुकीत मतदान झाले आहे व अता निवडणूक निकालाची धामधूम चालू आहे. भाजप प्रणीत आघाडी प्रचंड बहुमताकडे वाटचाल करीत आहे. व सामान्य माणसाला मिडीयाच्या निर्बुद्ध प्रचारामुळे जी भिती वाटत होती ती पूर्ण खोटी ठरली. हिंदू हित हा या निवडणुकीचा मध्यवर्ति मुद्दा होता. तो प्रचारात समजत होता. सर्व प्रकारच्या जिहाद मुळे व तो जनतेला पटवून देण्यात कार्यकर्त्यांना यश आल्यामुळे ही प्रचंड गाजलेली निवडणूक एकतर्फी झाली. या निकालाचा जो अर्थ सांगितला जाणार नाही तो आपण समजावून घेऊ यात. हिंदू सामाजिक कार्यकर्त्यांना जी गोष्ट पहिल्या पासून माहिती होती ती यावेळी निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी आली. मुसलमान हे नेहमी इस्लामचे प्यादे म्हणूनच राजकारण करतात. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला सुध्दा ते मत देतात. हिंदुत्ववादी विचारधारा खरी कोणती हे त्यांना सर्वात नीट परिचित असते व म्हणून त्या विचारधारे विरुद्ध जे कोणी त्यांना मुसलमान मदत करतात. पण या वेळेस प्रथमच भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व उघडपणे ही वस्तुस्थिती स्विकारुन कामाला लागले व व्होट जिहाद हा शब्द निवडणूक रिंगणात आला. मुसलमान हा फक...

डोनाल्ड ट्रंपचा विजय

अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी डोनाल्ड ट्रंपचा विजय होत आहे. तसे अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी कोण विजयी होतो याने मला फारसं आनंद वा दु:ख होण्याचं कारण नाही. कारण माझ्या रोजच्या जगण्याशी त्याचा तसा काही संबंध नाही.पण अमेरिकेत राष्ट्रवादाचा उघड पुरस्कार करणारा माणूस निवडून आला आहे. याचा मात्र मला फार आनंद झाला आहे. राष्ट्रवाद म्हणजे काही तरी मानवता विरोधी असा भ्रम असणा-यांना अमेरिकन जनतेने चांगले प्रत्युत्तर दिले आहे. कितीही अफ्रिकन, व अन्य देशीय नागरिक आले तरी अमेरिकन राष्ट्रवाद हा तेथील गो-यांच्या सांस्कृतिक कल्पनांप्रमाणेच चालला पाहिजे. ट्रम्पच्या संभाव्य विजयात मला आनंद होण्याचे पहिले कारण हे आहे की हा अमेरिकन राष्ट्रवादाचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय पोलिस गिरी करून देशाला अडचणीत आणणा-या भूमिका सोडून माझ्या देशाचे हित एवढेच आंतरराष्ट्रीय राजकारण ही भूमिका मांडण्यावर भर देणारा उमेदवार अमेरिकेला मिळाला. मला आनंद होण्याचे दुसरे कारण म्हणजे राष्ट्रवाद हा अमेरिकन निवडणूकीच्या केंद्र स्थानी नको म्हणून एखादी काळी व्यक्ति गेली तर ते देश पेटवण्यासाठी कारण बनवणे, उमेदवार टिंगलीचा विषय बनवणे, मानवतावि...