Posts

Showing posts from April, 2022

समाज व समाज सुधारणा

लेखांक ११३ या सनातन समाजामध्ये समाज परीवर्तन करण्यासाठी प्रक्रिया काय असावी यातील समाज सुधारकांचे प्रयत्न व कायदा यांच्या मर्यादा आपण पाहिल्या. याचा अर्थ त्या प्रयत्नांचे महत्व अजिबात कमी होत नाही. पण ज्या पूर्व अटींशिवाय हे शिव धनुष्य उचलले जात नाही त्यांचा वापर कसा झाला व त्याचे परीणाम कसे घडले हे आपण प्रामुख्याने पाहू यात. समाजावर प्रेम, त्या विषयी स्वाभिमान हे असणारे नेतृत्व कसा विचार व कृती करत होते हे आपण पाहू यात. योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता व सारखे महापुरुष हे धर्म, अध्यात्म या आधारे काम करत असताना समाज निर्दोष बनविण्यासाठी प्रयत्न करत होते. विवेकानंद हे तर जातीयता हा शाप आहे, शास्त्रार्थ नंतर आधी मैदानावर खेळा असे सल्ले देत होते. व समाज ते सल्ले ऐकत होता. कारण ते विवेकानंद शिकागोत या समाजाच्या महानतेचा डंका पिटून मग समाजाला कोण होतास तू काय झालास तू असा प्रश्न विचारत होते. तसेच थोडे मागे गेले कि ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांनी या समाज दोषाचे दुष्परिणाम भोगले पण त्यामुळे संतापून जाऊन या सुधारणा केल्या नाहीत तर शिक्षा भोगल्या व सांगितले की आपण चुकत आहोत. व जातपा...

सामाजिक प्रश्न व राष्ट्रकारण

लेखांक ११२ इंग्रजी शिक्षणाच्या आधारे समाजाचे परीक्षण व गुण दोषांची चर्चा करण्याची सवय लागल्यामुळे समाजसुधारकांच्या कार्यशैलीमध्ये दोषाचे शोध व त्यावर आक्रमक हल्ला हे आलेच पण त्या बरोबरीने इंग्रज साक्षात प्रभू व त्यांच्या येण्याने ह्या समाजदोषांचे भान आम्हा आले हा भाव दृगोचर होत होता. त्याचा स्वाभाविक परीणाम स्वातंत्र्योत्सुक जनता व पुढारी यांच्या विरोधात ही चळवळ प्रामुख्याने आहे हाच भाव जनतेच्या मनात ठाण मांडून बसला.  स्वातंत्र्य चळवळ हतोत्साही व्हावी म्हणून हे सर्व प्रयत्न आहेत हा भाव जागा राहिला. पण त्याहूनही दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे आम्ही महान संस्कृती आहोत व त्यातील दोष दूर करण्यासाठी हा समाज सुधारण्याचा व्याप आहे हा भाव कधी या आंदोलनांमध्ये जाणवला नाही व दुसरं कि आमच्या शत्रूला (इंग्रजांना) कायदा करण्याच्या विनवण्या केल्या गेल्या ज्यातील हा अपमान लढाऊ समाजाने स्वीकारला नाही. तरीही समाज सुधारणा समाजानेही स्वीकारल्या का व कशा? याचा मार्ग कोणता होता व त्या मार्गाने या ७५/१०० वर्षातील प्रवास कसा झाला व काय साधले हे पुढील लेखांमधून पाहू यात. सुनील देशपांडे. Article (...

सामाजिक चिंतनाची दिशा

लेखांक १११ कोणतेही सामाजिक प्रश्न वा समस्या या प्रामुख्याने त्या देशातील बहुसंख्यांक समाजाच्या समस्या अथवा प्रश्न असतात. त्यामुळे भारतीय समाजाचे प्रश्न हे स्वाभाविकच हिंदू समाजाचे प्रश्न व दोष या संदर्भात आहेत. समस्या सोडवताना एक समाज सुधारक प्रयत्न करतात व दोन कायदा आपली भूमिका पार पाडतो. पण या दोनही ठिकाणी काही मर्यादा आहेत.  त्या प्रामुख्याने समाज सुधारक हा गट घेतल्यास त्या सुधारकाला समाजाची मान्यता व सुधारकाला समाज ममत्व किती आहे यावर अवलंबून असते. तसेच समाज ताडण करायचं आहे कि समाज शिक्षण करावयाचे आहे, यावर त्या सुधारणा अवलंबून असतात. समाज कुरिती ह्या प्रत्येक समाजात कालौघात  येत असतात हे सूत्र त्या समाज सुधारकाने स्वीकारले आहे का? महान समाजाचे पतन झाले असले तरी मूळ तत्व महान आहेत व ती पुनर्प्रस्थापित  करायची आहेत हा भाव सुधारकाचा आहे का? हे प्रश्न नकारात्मक आले कि कलह उत्पन्न होतो पण हेतू साध्य होत नाही. तसेच कायद्याचे असते. मानसिक परिवर्तन झाल्या शिवाय कायदा परीणामकारकता दाखवू शकत नाही. गोरे काळे हा वाद अमेरीकेला गृहयुध्दापर्यंत घेऊन गेला पण गोरी श्रेष्ठत्व मानसिकता...

समाज परिवर्तनाची प्रक्रिया

लेखांक ११० दीर्घकाळ राजकीय परीप्रेक्षातील परीवर्तनाचा आपण अभ्यास केला. व त्याचे परीणाम दृश्य स्वरूपात व पटकन जाणवणारे असल्यामुळे ते अभ्यासणे आवश्यकही होते. पण त्याच्या बरोबरीने सामाजिक, सेवा, अशा अनेक क्षेत्रांत सुध्दा राष्ट्र सर्वप्रथम ठेवून कार्यरत राहिल्यामुळे समाज परीवर्तनाची आंदोलने ही समाजवीण विस्कटणारी झाली नाहीत. उलट समाज अधिक सक्षम होण्यासाठी मदतच झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातील सुधारक व स्वातंत्र्यप्रेमी आंदोलक यांचे नाते विळा भोपळ्याच्या सख्यासारखे वाटायचे. पण या समाज सुधारणांमध्ये राष्ट्र विषयी विचारशील चिंतन असलेला समाजाचा मोठा हिस्सा उतरला त्यावेळी ते समाज परीवर्तन तुलनेने खुप सोपे वाटू लागले. या विषया संदर्भातील वैचारिक मांडणी आपण सुरवातीच्या लेखांमधून पाहिली आहे. त्यातील पूर्व अट होती, ज्या समाजात परीवर्तन करायचे त्या समाजाला स्वत्व स्वाभिमानाची जाणीव असली पाहिजे. ते परीवर्तन त्या समाजाने स्वतः हून पटवून घेतले पाहिजे. समाजाविषयी ममत्व व बंधुभाव असला पाहिजे. या अटी पूर्ण करून केलेले समाज परिवर्तनाचे प्रयत्न नक्की यशस्वी ठरतात व ते चीरस्थायी स्वरूपाचे असतात. या विषयातील क...

आणि कलम ३७० उडाले.

Image
लेखांक १०९ स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षातील सर्वात परीवर्तनासाठी अवघड पण राष्ट्रीय विचाराने जे १५०/२०० वर्षांच्या सततच्या प्रयत्नातून सिध्द केले ते राजकीय परीवर्तन आपण पहात आहोत. यातील  समाजाच्या राष्ट्र भावनेवर विश्वास असलेले राष्ट्रीय सरकार आल्यावर सर्वात महत्वाचे परीवर्तन व संभवतः या शतकावर पूर्ण प्रभाव टाकणारी सर्वात प्रभावी कृती म्हणजे जम्मू काश्मीर राज्याचे वेगळेपण जपणारी कलम ३७० रद्दबातल करणारी कृती होय. राजकिय दृष्टीने अत्यंत कठीण निर्णय पण नेतृत्वाचा जनसामान्यांच्या आशा आकांक्षा वर पूर्ण विश्वास असेल तर कसा सहज घेता येऊ शकतो याचे सर्वोत्तम राजकीय उदाहरण आहे. २०१९ ची निवडणूक झाली व अमित शहा गृहमंत्री झाले. त्यावेळी अंदाज येऊ लागला होता. की भारताची ३७० कलमाची भळभळती जखम भरून निघेल कि काय? त्यासाठी रणनिती बनतं होती. राजकिय साठमारी व. वाटत असतानाच मेहबुबा मुक्तींबरोबर चे सरकार अल्पमतात आले. त्यांनी राजिनामा दिला. एक एक चाली यशस्वी होत, एका सकाळी राज्यसभेत स्फोट झाला. ३५ एए हटल्यावर अनेकांना कळले की काय झाले. सामान्य भारतीयांच्या एका राष्ट्रीय स्वप्नाची पूर्तता मोदी शहा...

सीमा समस्या व ताठ मानेचा देश

Image
लेखांक १०८ मूलभूत चिंतनात फरक असेल तर परीवर्तन हे किती व्यापक व सर्वव्यापी असते हे आपण पहात आहोत. व यातील सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय प्रश्नांवरील भूमिका व त्या व्यवहारात कशा प्रकारे आणल्या जातात.  फारच थोड्या देशांना ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात जसे भारत चीन संबंध. अनेक कंगोरे असणारे हे अतिशय नाजूक प्रकरण आहे. चीनकडे जबरदस्त धक्का देण्याची क्षमता आहे. प्रचंड आर्थिक क्षमता आहे. हाताशी हुकूमशाही आहे. स्वभावतः कम्युनिझम अक्राळविक्राळ विस्तारवादी आहे व . अशा सर्व जमेच्या बाजू. व अजून एक महत्वाचे म्हणजे पंचमस्तंभी कारवाया करणारे भारतातील चीनचे मित्र कम्युनिस्ट. गलव्हान व्हॅलीतील संघर्ष ही फक्त लढाई नव्हती तर वैचारिक राजकीय परिवर्तन झाल्यावर भारत कसा प्रतिसाद देणार आहे याचे उदाहरण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रचंड मोठी समाईक सीमा दोघांची आहे. पण पुर्वीचे बोटचेपेपण २०१४ पासून घटू लागले आहे. मैत्री समानतेच्या निकषांवर होणार. व्यवहार चालू पण चीनी समुद्रात छोट्या देशांना संरक्षण देण्याची तयारी सुरू करणार. जागतिक महासत्तांसोबत चर्चा करताना १३० कोटी ज...

स्वयंसेवी संस्था व नवजागृत हिंदू समाज

लेखांक १०७* सरकार बदल हा विषय बाजूला ठेवून वैचारिक दृष्ट्या वेगळे सरकार आले व समाजाच्या मानसिकतेशी मिळालेले ते सरकार असेल तर काय घडत हे या स्वातंत्र्योत्तर राजकीय भारतात नवीनच होते. म्हणून त्याचे विविध पैलू, भाग अभ्यासणे आवश्यक आहे. फारच प्रयत्नपूर्वक समाजाने स्वतः ते परीवर्तन घडवून आणलं होतं. व आता समाज त्याची सत्ताधारी म्हणून फळे चाखत आहेत. व विविध अपरिचित संकटांवर सरकारच्या मदतीने मातही करत आहे. यातील राष्ट्राला आतून पोखरून टाकणा-या व बाहेरून जगात बदनाम करणा-या अशा एका संस्थाजीवनाचा मोठा सहभाग आहे. हा फार मोठा मायावी राक्षस भारताला अनेक वर्षे ग्रासत होता. या संस्थांचे ओळखीचे नाव असते. NGO. अशासकीय संस्था. यांना समाजसेवी संस्था असेही म्हणतात. यांना सेवा संस्था म्हणत असले तरी प्रत्यक्षात खायचे अन दाखवायचे दात वेगळे असतात. यांना दुखितांचे दु:ख दूर करण्यात रस कमी व त्याचे भांडवल करून समाजवीण उद्धस्त करण्यात रस अधिक. अशा प्रकारे प्रयत्न करणे हे मुख्य काम असते. सामान्य जनजीवन चालू असताना अचानक एखादी समस्या me too म्हणत येते, त्याचा फायदा संपेस्तवर, एखाद्या चर्चवर दगडफेक होते, तवर अचानक mo...

लोक सहभाग. बदलत्या राजकीय परिभाषेमुळे

Image
लेखांक १०६ आपण पहात आहोत कि पूर्णपणे या मातीतून जन्मलेले तत्वज्ञान घेऊन आलेल्या राजकीय विचारांच्या सरकारमुळे प्रचंड वेगळेपणा सामान्य समाजाला व जगालाही पहायला मिळत होता. तसेच प्रथमच लोकसहभाग ही संकल्पना ही ख-या अर्थाने लोकांना पहायला व सहभागी होण्यासाठी संधी म्हणून मिळाली. भारतातील स्वच्छता अभियान. यामध्ये आपणच आपल्या घरी संडास बांधावा ही योजना. लोकांचा सहभाग मागितला व तो सहभाग अपेक्षेपेक्षा अधिकच मिळाला. खेड्यापाड्यातून स्त्रीयांची लज्जास्पद अवस्था संपली. व सार्वजनिक व्यवस्थेमुळे येणारा बेजबाबदारपणा ही संपला. घर तेथे स्वच्छतागृह ही योजना ही नेतृत्वाचा समाजावर विश्वास यांचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.  असेच लोकसहभाग याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गॅस अनुदान सोडावे हे जनतेला केलेले आवाहन. लोकांनी अनुदान सोडले व त्या सोडलेल्या अनुदानातून समाजाच्या  गरीबाला, वंचिताला शेगडी व गॅस मिळाला. असेच जग आश्चर्य चकित झाले ते जनधन बॅंक खाते या योजनेत कोट्यवधी गरीब सहभागी झाले. सर्व जनता सहभागी अशी एकात्मिक अर्थ व्यवस्था उभी राहिली. अर्थव्यवस्थेच्या गतीसाठी व वाढीसाठी सर्वसमावेशक अर्थव्...

देशाला स्वतः ची ओळख सरकारी स्तरावर

Image
लेखांक १०५ भारतात वैचारिक भारतीय बनावटीचे सरकार आले व आगळ्या वेगळ्या वायुमंडलाचा देशाला परिचय होण्यास सुरुवात झाली. त्यातील सर्वात सुखद सुरवात म्हणजे हा देश असंख्य नरवीरांच्या, समाजधुरीणींच्या प्रयत्नांमुळे स्वतंत्र झाला आहे हा साक्षात्कार होय. अन्यथा आमचा स्वातंत्र्य लढा गांधी नेहरू नावाने सुरू व त्याच दोन नावांनी समाप्त होत होता. लांबचे सोडा पण पटेल, बोस हे काॅंग्रेसी नेते सुध्दा वळचणीला पडले होते. त्यामुळे सावरकर व. नावे माफीवीर म्हणून हिणवण्यासाठी असावीत हे स्वाभाविक होते. सामाजिक क्षेत्रात स्वामी विवेकानंदांचे स्थान नव्हते तर योगी अरविंद व. या नावाचा विचारच सोडा. अशा असंख्य अनामिक देशभक्त, संस्कृती संवर्धक महापुरूषांनी देश घडवला हे सरकारी स्तरावर स्विकारले गेले. पण २०१४ पासून विचारवंतांना हवे ते नेते असे न रहाता, समाज प्रेम करतो अशा प्रत्येक नेत्याला त्याचा उचित सन्मान मिळू लागला. सुभाषचंद्र बोस यांच्या फाईल्सना उजेडाचे दर्शन घडले तर लोहपुरुष सरदार पटेल यांचे भव्य स्मारक उभे राहिले.सावरकर हे नाव महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील तरूण उच्च रवात घेऊ लागले. खरं तर समाजात हे ...

सरकारातील भारतीयत्व लख्ख झळकले.

Image
लेखांक १०४ २०१४ साली भारतात प्रथमच डाव्या वायुमंडलाच्या अत्यंत विपरीत विचाराचे संपूर्ण बहुमतातील सरकार केंद्रात आले. त्यामुळे नवीन सरकारच्या प्रत्येक कृतिकडे सामान्य जन कुतूहुलाने किंवा म्हणता येईल लहान मूल जसे जादुच्या प्रयोगाकडे कुतूहलाने बघते तसे बघू लागले, तर वैचारिक विरोधक अचंबित होऊन. यात मेडिसन स्क्वेअर मधील आत्मविश्वास जागवणारी अभूतपूर्व भारत विजय सभा असो वा नऊ दिवस उपवास करत व फक्त पाण्यावर रहाणारा तरीही कार्यमग्न पंतप्रधान असो. राजकीय पटलावर भारतीयत्व जगाने आधुनिक काळात प्रथम पाहिले ते या मेडिसन स्क्वेअर सभेमध्ये. भारतीय संस्कृतीचे राजकीय स्वरूप जगाला प्रथमच दिसले. जागतिक योगा दिवसावर शिक्कामोर्तब असो वा युनोत पाकिस्तानला ठोकणे असो. भारतीय जनतेला आनंदाच्या गुदगुल्या होत होत्या तर जगाला खरा भारतीय म्हणजे हिंदू स्वभाव, व्यवहार राजकीय स्तरावर कसा आहे हे समजू लागले होते. असा भारत आहे हे जगाने पाहिले नव्हते. एक माणूस नाही तर सामान्य भारतीय हा सहज व्यवहार म्हणून लंघन करतो ह्या सारख्या छोट्या गोष्टींसाठी सुध्दा 'भारत की नयी खोज' करावी असे जगाला वाटू लागले. असे भा...

भारतीय राजकारणातील दुविधा भाग २

लेखांक १०३ अशा प्रकारे एक विरोधीपक्ष विरूद्ध सरकारी पक्ष अधिक सर्व विरोधी पक्ष असे विचित्र राजकारण या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षात दीर्घकाळ पहायला मिळाले. जनसामान्यांच्या ध्येयाला दाबून टाकून आमच्या वैचारिक भूमिका हा या देशाचा व देशातील सर्वांचा  ध्येयवाद हे लाडकं पालुपद चालू होते. कारण ते मोडून काढू शकणारा पक्ष एकछत्री अमलात येत नव्हता.त्यामुळे ते थोपवलेले विचार निर्णायक मोडून काढण्यासाठी २०१४ सालापासून प्रयत्न सुरू झाले. यात मग माझ ध्येय मीच सांगणार, हा हिंदू समाजाला वाकड लावण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला, त्यांना हिंदू समाजाने एका वाक्यात सांगितले, कि जर माझ्या ध्येयवादा आड याल, अथवा त्याची टिंगलटवाळी कराल, अथवा त्याच्या अस्थांच्या विषयाशी खेळाल तर इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा अशी अवस्था करून सोडू. मग आवार्ड वापसी षडयंत्र आले तर ती अवार्ड वापसी गॅंग आहे हे हिंदू समाजाने सांगून टाकले.  जेनयुने पहिल्यांदी राष्ट्रद्रोहाच्या आरोपाचा चटका अनुभवला. व सामान्य माणसाचा अभिव्यक्त होण्याचा नवीनच अनुभव JNU च्या Ivory tower मध्ये राहणा-या विचारवंतांनी  घेतला. शिक्षणाची वय किती...

भारतीय राजकारणातील दुविधा

लेखांक १०२ हिंदू समाजाने राजकीय तडजोड न स्वीकारता केलेल्या राजकीय प्रवासामुळे  आधुनिक भारतीय राजकारण एका वेगळ्याच दुविधेमध्ये ( Paradox) अडकले. सामान्यपणे सर्वत्र राजकारण हे सत्ताधारी विरूध्द इतरे जन असे  चालत असते. पण जनसंघापासून तत्वज्ञानाधिष्टित राजकारण आल्यामुळे राजकीयदृष्ट्या अल्पसंख्याक असलेला जनसंघ अथवा भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्ष असे न पहायला मिळालेले राजकीय चित्र भारतीय राजकिय पटलावर पहायला मिळू लागले. सकृतदर्शनी विरोधी आघाडी, काॅंग्रेस विरूद्ध बनायची, पण त्यात इतका तकलादूपणा असायचा कि ही विरोधी पक्षांची आघाडी आहे कि सत्ता पक्षाची बी टीम आहे हेच कळायचे नाही. किंबहुना ही आघाडी फोडताना एकच टाहो फोडला जायचा कि जनसंघ जातीय आहे. आघाडी भौतिक विषयांवर असायची व फुटताना  भौतिक नसलेल्या विषयावर फुटायची. व त्याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले जायचे नाही.या अर्थाने ही दुविधा भारतीय राजकारणात स्पष्ट दिसायची कि छोटा विरोधीपक्ष जनसंघ विरूद्ध सत्ताधारी काँग्रेस व अन्य सर्व विरोधी पक्ष. जनता पक्ष हा आणिबाणी विरूद्ध म्हणजे हुकुमशाही विरुद्ध तयार झाला. एका अर्थाने लोकशाही संरक्षणासाठी ...

मंडल आयोग व हिंदुत्व

Image
लेखांक १०१* हिंदू समाजाने १९८९ पासून राजकीय जागृकते बाबत अजिबात तडजोड न करता निर्भेळ यशासाठी प्रवास सतत चालू ठेवला. यामध्ये हिंदुत्वात अडथळे होऊ शकतील असे अनेक मुद्दे घुसविण्याचा प्रयत्न चालूच होता, पण हिंदुत्वाच्या व्यापक कक्षातच सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे हिंदू समाजाने निश्चित केले होते. जाती आधारित राजकारण करणा-या पक्षांना हिंदुत्व अमान्य असे व यासाठी मंडल आयोग आणून हिंदूंनी पुन्हा जातीत अडकून विचार करावा हा मोठा प्रयत्न झाला. पण या आयोगाच्या निमित्ताने हिंदूत्व विरोधकांच्या अनेक गृहितकांना मूठ माती मिळाली. बि.पी. मंडल, मंडल आयोगाचे प्रमुख. हिंदुंच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून आरक्षण भूमिका ठरवली. पण हिंदु जातीत विभागला न जाता हिंदुत्वात मिसळून गेला. राजकारण्यांसाठी करायला गेलो एक असे झाले. मंडल आयोगामुळे हिंदू हा शब्द उच्च वर्णीय लोकांसाठी आहे, बाकीच्यांना धर्म नाही व. मानणा-यांना चपराक बसली होती. मंडल आयोगात येणा-या जातींना धर्म होता व तो हिंदू होता. त्यामुळे आरक्षण घेऊ पण आमचा धर्म आम्ही का सोडू. हा साधा प्रश्न उपस्थित केला गेला. जात ही धर्माविरुद्ध...