भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 'शंभरी'
हा पक्ष शंभर वर्षांचा झाला. ह्याच्या मूळ विचाराला थोडी अधिक वर्षं होऊन मृतप्राय झाला. हा विचार मृतप्राय झाला यात दु:ख करण्यासारखे काही नाही. कारण तो विचार अशास्त्रीय होताच पण सर्वंकष लागू होईल इतका खोलही नव्हता. त्यामुळे काही तरी गमावले आहे असे मानण्यासारखेही त्यात काही नाही. म्हणून भारतातील कम्युनिस्ट पक्षांचे असे का झाले? याचाही विचार करण्याची आवश्यकता नाही. पण तरीही या विचारा आडून जगाला शंभर एक वर्ष वेठिला धरले गेले, ते कसे? हा प्रश्न उरतो व त्याचे उत्तर शोधताना त्या विचाराची भलावण करण्याची इच्छा होते. पण त्याचेही उत्तर स्पष्ट पण वेगळे आहे. त्या वेळच्या अनेक देशभक्तांनी आपापला देश पारतंत्र्य किंवा जुलुम मुक्त करण्यासाठी ह्या नवीन शिडीचा वापर केला. कम्युनिझम येण्यापूर्वी सुध्दा लोक क्षोभ असाच व्यक्त होत असे व असेच सत्ता परिवर्तन होत असे. पण त्या सत्ता परिवर्तनामध्ये ध्येयवाद नावाची फोडणी घातली जात नसे, ते या कम्युनिझममुळे शक्य झाले. त्यामुळेच रशिया असो, चीन असो, झेकोस्लव्हाकियो असो, स्वतः च्या विकृत क्रौर्याला क्रांतीच्या पदराखाली लपवता येईल म्हणून या कम्युनिझम...