मंडल आयोग हिंदू विरोधकांवर बुंबरॅंग
लेखांक १००* भारतीय राजकारणाच्या दृष्टीने यावेळी जगभर पसरलेला भारतीय हिंदू समाज, व त्यात संघ संस्काराचे बाळकडू प्यालेले स्वयंसेवक यांच्यामुळे जरा फरक पडू लागला होता. भारताने ताठ मानेने जगासमोर उभे असावे, आमचे तारणहार असावे, गरज असेल तर सेवा घ्यावी, असा भाव जगभर तयार होत होता. भयचकित जगाला भारतीय संस्कृती, धर्म व स्वयंसिद्ध वैचारिक बांधणी खुणावू लागली होती. अशातच भारतीय राजकारणाला राष्ट्र, धर्म, संस्कृती, व. विषयावर सुस्पष्ट भूमिका घेण्यास भाग पाडणारे रामजन्मभूमी आंदोलन सुरू झाले व या विषयी सर्वात स्पष्ट भूमिका घेऊन संपूर्ण देशाला व राजकीय पक्षांना भूमिका घेण्यास भाग पाडण्याचे ऐतिहासिक काम लालकृष्ण अडवाणी यांनी केले. छद्म धर्मनिरपेक्षता हा शब्द भारतीय राजकारणात परवलीचा शब्द बनला. बहुसंख्यांक समाज हा निवडणूक पटलावर वजीराच्या भूमिकेत आणून बसवला. कोणीही त्यापासून दूर राहू शकत नाही. अल्पसंख्याक गंड एका रथयात्रेने संशयाच्या भोवऱ्यात टाकला. भारतात धर्मातील राष्ट्रकारण हे उलगडले गेले. अन्य तपशील भरपूर आहेत पण तात्विक बैठक ही नेत्याकडे असेल तर सारा सारीपाट तोच मांडतो हे सिध्द झाले. सर...