ही नेटफ्लिक्स मालिका आहे. एक तासाचा एक असे एक तासाचे चार भाग म्हणजे ही मालिका. दुसरे महायुध्द संपत आले आहे. जर्मनीचा पराभव होत आहे. अशा वेळी फ्रान्समध्ये ही कथा घडते. छोट्या गावात ही घटना घडते. जर्मन रेडिओ ऑपरेटर या गावात ड्युटीवर असतो. सक्तीने युध्दात ओढलेला असतो पण संवेदनशीलता जीवंत आहे. तेथे एक अंध तरूणी चोरून रेडिओ स्टेशन चालवत असते. अन्याय, अत्याचार या पार्श्वभूमीवर तरल,प्रेमळ जीवन जगण्याचा अट्टाहास दिसतो व शेवटी क्रौर्याचा पराभव होतो. इतकी प्रत्ययकारी मालिका खूप दिवसांनी पाहण्यात आली. अत्यंत क्रौर्याने भरलेल्या वातावरणात तरल भावना इतकी सुंदर घेतली आहे की मालिका संपेपर्यंत त्या भावनेतून बाहेर पडता येत नाही. एक एक फ्रेम एवढी जबरदस्त आहे की ती फ्रेमच एक कथा बनते. आपल्या अ़ंधळ्या मुलीला गावाचा रस्ता कळावा म्हणून लाकडाचे ते गाव तो बाप बनवतो व मुलीला बोट फिरवुन त्या गावातून फिरवतो ते दृष्य अफलातून आहे. भकासपणा सुध्दा एवढा सुंदर घेतला आहे की त्या भयाण एकाकी घरातही आपल्याला भावनेची गर्दी पहायला मिळते. सिनेमा हे दृष्य माध्यम आहे ह्याचा पुनः प्रत्यय या मालिकेत येतो. थोडे पण परिणामकारक संवा...