Posts

Showing posts from April, 2023

फक्त हसा

हास्य कविता सम्मेलनात  मला बोलवल. धन्यवाद. पण आठवण करून देतो वेगळेपणाच्या नादात फासतो कधी कधी  हेतुलाच हरताळ. फक्त हसा, मोकळं व्हा,  चिंता नको, टीपं गाळू नका हा ठरला हेतू, मला प्रश्न पडला यात बेगडीपणा तर नाही ना? खरच हास्य कविता मनापासून हवी ना कि उथळ पाण्याचा खळखळाट  लाफ्टर शो सारखा. हसून हसून पोट फुटले, हसून हसून बेजार झाले, हसून हसून डोळ्यात पाणी आले सगळी विशेषणे दु:खी अशी मग फक्त हसा ही बतावणी कशी? दु:खात तर टीपं गाळतोच  आनंदाचा पराकोटही डोळ्यात पाणी आणतो मग हसवा पेक्षा आसवं अधिक अस्सल तरी हास्यालाच मान्यता आसवांना स्थान पदराआड नाहीतर फिरवलेल्या मुखड्या आड. हासु खर होत, डोळे पाणवल्यावर, नाही तर नुसताच मुखवटा ठरतो. हास्य कवि सम्मेलन खर तेंव्हाच जेंव्हा हसून हसून रडाल तेंव्हा. म्हणून बेगडी नको, मुखवटा इतके हसू की, झरतील डोळे टपाटपा. सुनील देशपांडे ९४२०४९५१३२

विठ्ठल कारभारी शिंदे

विठ्ठल कारभारी शिंदे गेले. विठ्ठल भक्ती भवसागर पार करवते हे आपणास माहीत आहे. त्या भक्तीचे एक रूप म्हणजे वारी. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजायचा असेल तर एक वारी नगर जिल्ह्यातील शिर्डी या गावी कराविच लागते. या विठ्ठल कारभारी शिंदे नावाच्या दरबारी. तो दरबार आज उठला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे काय रसायन आहे हे समजत नाही कारण आमचा परिचय विठ्ठल कारभारी शिंदे नावाच्या स्वयंसेवक जातीशी होत नाही. संघ समजावा म्हणून आम्ही संघ शाखेच्या तंत्राची माहिती मिळवतो. जरा अधिक म्हणून डॉ हेडगेवार व गुरूजींची चरित्रे अभ्यासतो. तरीही या अभ्यासकांसाठी संघ समजूत ही नेती नेती अशाच स्वरुपात असते. कारण त्यांना विठ्ठल कारभारी शिंदे नावाचा जातिवंत स्वयंसेवक भेटत नाही वा त्याला शोधल पाहिजे असे वाटत नाही वा देह नाही ध्येय असा स्वयंसेवक असतो हा परिचय करून देण्यात आम्ही कमी पडतो . डॉ हेडगेवार हे ५१ वर्षाचं जीवन पुस्तकबध्द आहे पण हे लाखो सामान्य डॉ हेडगेवार हीच संघाची समजूत आहे व म्हणून आज पर्यंत शिर्डी येथे जाऊन विठ्ठल दरबारी संघ सहज समजावून घेता येत होता. आजपासून पूर्णविराम. विठ्ठल कारभारी शिंदे हा गरीब   घरात...