Posts

Showing posts from September, 2023

भिडे वाडा मानसिकतेची समस्या

भिडे वाड्याकडे पाठ, अशी समस्या आहे, असा अभास निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मला एका वेगळ्या मुद्यावर चर्चा करायची आहे. ज्यांना भिडे वाड्याकडे पाठ होत आहे, याचं दुःख होत आहे त्यांना काही सल्ला देणार आहे व आपल्या सल्ल्याची गरज नाही, ती प्रवृत्ती स्वयंभू देवस्थान आहे, हे ही माहित आहे तरीही आपण नेकी कर दर्या में डाल असं करणार आहोत. तर ज्या संघटनेचा आपण जाज्वल्य द्वेष करतो त्या संघटनेचा, कार्यपध्दतीचा, कार्याचा व यशस्वीतेचा अभ्यास खूपच वाढवावा लागेल. संघटन म्हणजे संघटन. तात्कालिक संकट काही का असेना, मी शाखाच लावणार ही रीत. पूर्वांचलात ख्रिश्चन गतिविधि काय यावर लेख नाहीत, तरूण पोर पाठवून शाळा सुरू केल्या. हे कसं वाईट आहे यावर चर्चाच नाही, जे चांगलं आहे ते करत राहायचं, वाईटाची रेषा आपोआप लहान होते. जगभरातील चर्च विश्व विरोधात लढल पण पूर्वांचल मध्ये सांस्कृतिक राष्ट्रवादच जिंकला.  याला गाडून घेणे म्हणतात. जर ३५००० महिलांची पाठ फिरवायची असेल तर भिडे वाडा पाठ दु:खितांपैकी ५०० जणा/ जणींनी तरी मुलींच्या शाळा चालवून लोकांना चांगले वाईट दाखवून द्यावे लागेल कारण या ३५००० महिला निरपेक्ष भाव...