Posts

Showing posts from October, 2022

भारतातील विद्यापीठे

नालंदा तक्षशिला सोडून काही नावे घेता येतील का? काल ३/४ तास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर काढले व एका नवीनच विद्यापिठाचा शोध लागला. सज्जन व समजुतदार समाजाचा प्रभाव व संख्या याचा शोध लागला.  पुण्यातील पाऊस झाला होता. गाड्यांची गणित गंडली होती. चिडचिड व राग संताप व्यक्त करायला याहून योग्य वातावरण नव्हते. अशा वातावरणात हे विद्यापीठ मानवी व्यवहारातील समजुतदारपणा, संयम, सुसंस्कृत व्यवहार याचे प्रशिक्षण देत होते.  हे विद्यापीठ आहे की नाही हे ठरवण्यासाठी सॅंपल सर्वेमध्ये लबाडी नव्हती. भरपूर संख्या होती. म्हणजे गर्दी होती. तरूण पोरं पोरी होत्या, म्हातारे कोतारे होते, मध्यमवयीन जबाबदार होते, सर्व भाषांचे सूर कानावर पडत होते, बॅगांपासून बोचक्यां पर्यंतचे सामानाचे प्रकार सर्व आर्थिक स्तरांची जाणीव करून देत होता. अशा सर्व असमान घटकांमध्ये एक साम्य होते, अडचणींचा बाऊ न करता, सहकार्य करून मार्ग काढायचा. एवढस टीचभर स्वारगेट स्थानक त्यात अवाढव्य गाड्या शेकड्याच्या संख्येने ये जा करत होत्या. पावसाच पाणी चिखल होऊन पसरलेले, शेकड्यांनी लोक किमान २/३ तास खोळंबून उभी होती. चौकशीच्या खिडकीवर किमान ...

प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा

विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म दिवस. १९२५ च्या विजयादशमीच्या दिवशी डॉ हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. व आज ही संघटना १०० वर्षे पूर्ण करीत आहे. अशी संघटना, ज्या संघटनेला स्वतः ची ज्युबिली साजरी करण्यात काहीही रस नाही. याची देही याची डोळा कार्य पूर्ण करण्यासाठी जी धडपडत आहे. अशा संघटनेचा हा जन्म दिवस आहे. त्यामुळे या एकमेवाद्वितीय संघटनेचा, कार्यपद्धतीचा प्रवास, विकासाचे टप्पे, समजावून घ्यायला सर्वच भारतीयांना खूप उत्सुकता वाटत असेल. ही एकमेवाद्वितीय संघटना असल्याने तुलनात्मक अभ्यास करून हा प्रवास, हा विकास समजावून घेण्याचा सोपा मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे रा. स्व संघ विकास समजावून घ्यायचा असेल तर फक्त ही संघटनाच समजावून घ्यावी लागेल. एका धगधगत्या क्रांतीकारकाने तो लखलखत्या विद्युलतेचा मार्ग सोडून, डोळे दिपवून टाकणारा मार्ग त्यागून मिणमिणत्या शांत पणतीचा प्रकाश बनण्याचे ध्येय वयाच्या ३५ व्या वर्षी निवडले, ती व्यक्ती म्हणजे डॉ हेडगेवार व मार्ग म्हणजे संघ. या बदलाची व दीर्घदृष्टीची तुलना कदाचित योगी अरविंद यांच्या प्रवास वळणाशी होऊ शकेल. असा हा स्थापन झालेला राष्ट्रीय स्व...