Posts

Showing posts from July, 2022

NGO's नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा

लेखांक १५३ सर्व साधारणपणे समाजातील दुर्बल घटक यांना न्याय, आधार मिळावा, त्यांची समाजाच्या उदारतेच्या आधारे सेवा व्हावी, दुरितांचे दुःख दूर व्हावे यासाठी स्वतः हून कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्ति समुहाने स्थापन केलेल्या या स्वयंसेवी संस्था असतात. म्हणजे तशी अपेक्षा असते. पण भारतात व ब-याच अंशी जगातही असे गोंडस रूप धारण केलेल्या स्वयंसेवी संघटना म्हणजे जागतिक विकृत विचारधारांच्या रावणाच्या कह्यातील मायावी मारीच असतात. यांचा काळा इतिहास हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. पण संत मदर टेरेसा यांची सेवा कार्ये, अर्भक विक्रिचा खेळ करणारी अर्भकालये, पर्यावरणवादी ग्रेटाचे नको त्या विषयावरील टूलकिट, मलालाच्या सेवाभावी चेह-या अडून काश्मीर प्रश्नावर दखल देणे, लष्कर, पोलिस यांच्याविषयी अप्रिती निर्माण करण्यासाठी मानवाधिकार अधिकाराचा बागोलबुवा उभा करणे. असे एक ना अनेक उद्योग देश, त्यातील समाज, स्वस्थ जीवन उध्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील असतात. नक्षलवादाचे, हिंसेचे, अराष्ट्रीय आंदोलनांचे मानवतावादी बुरख्या आडून समर्थन केले जाते. दलित बांधवांचे शिरकाण करणा-या नक्षलवाद्यांना पाठिशी घातले जाते. मदरसे व ख्रिश्चन...

एनजीओ नावाचा मायावी राक्षस व जागृत समाज

लेखांक १५२ आपण स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांचे विविधांगी, पण समाजाच्या इच्छाशक्तीचे परिवर्तनाचे प्रयोग, समाजानेच संघटित होऊन कसे व्यवहारात उतरविले, ह्याचा धांडोळा घेतला आहे. यातच असे अनेक बारीकसारीक कंगोरे असतात कि जे सलत असतात पण परिस्थिती अनुकूल झाल्याशिवाय समाजपुरूष त्यात दुरूस्तीची अपेक्षा करू शकतं नाही. असेच भारतीय समाजाचे ही झाले होते. जसे इतिहास, कला, ज्ञान शाखा यांत अन्याय झाला व त्याचे परीमार्जन समाजाने संघटीत होऊन केले व स्वविचाराचे सरकार आल्यावर जोरकसपणे ते काम केले. तसेच या समाजावर अन्याय करणारी आणखी एक व्यवस्था हेतुपुरस्सर अस्तित्वात आली होती. तिचे स्वरूप मायावी होते व त्यामुळे त्या विरूध्दचा संघर्षही साधा सरळ नव्हता. त्यातील संघर्षाचा काही भाग समाज स्वतः करू शकत होता, पण काही आवश्यक गोष्टींसाठी सरकारी सहकार्य फार गरजेचे होते. यातील जागृत समाजाने जो कार्यभाग करणे गरजेचे होते ते संघटित समाज सातत्याने ७५ वर्षे केले व २०१४ पासून सरकारला भूमिका घेण्यासही भाग पाडले. हि व्यवस्था म्हणजे NGO's. अनेक अशासकीय समाज संस्था स्थापन केल्या जाऊ लागल्या, समाज उत्थानाचे हेतू सांगितले जाऊ ल...

सर्वंकष राजकीय परिवर्तन म्हणजे काय

लेखांक १५१ समाजाने सातत्याने केलेल्या जागरणाचा परीणाम म्हणून २०१४ साली समाजाला प्रथमच स्वतः च्या राष्ट्रीय इच्छा पूर्ण करू शकेल असे सरकार आणण्यात यश आले. अशा वेळी समाज सहभाग हा अत्युच्च रहात असतो. प्रेरणा जिवंत होतात. व समाज स्वयंस्फूर्तीने पुनर्निर्माण कामात सहभाग देऊ लागतो.याची भरपूर उदाहरणे आपण पाहू शकतो. याची उदाहरणे यादी सारखी देता येतील. पण अनेक साध्या गोष्टी सुध्दा आधी का झाल्या नाहीत असा प्रश्न पडतो. जसे योगा दिवस. ज्या योगाचे महात्म्य जगाला समजले होते, तो योगा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवस होण्यासाठी ६०/७० वर्षें का लागली? याचे उत्तर आहे लोकेच्छा व सरकारची इच्छा यातील फरक. २०१४ साल उजाडले व या समाजाच्या इच्छा आकांक्षा सरकारच्या सुध्दा इच्छा ठरल्या. लोकशाही व्यवस्थेचा पहिला विजय. लोकेच्छा ही सरकारला शिरोधार्य झाली. असेच अवघड ३७० कलमाच्या गच्छंतीच्या वेळी घडले. समाजाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. राम मंदीर निर्मितीसाठी स्वतः पंतप्रधान उपस्थित राहिले. भारत या पुनर्निर्माण होण्याची वाट पहात होता. तो डोकलाम, पाकव्याप्त काश्मीर मधील आक्रमण, चीन विरूध्द कारवाई, ब्रह्मदेशातील कारवाई...

सर्वंकष राजकीय परिवर्तन व समाज

लेखांक १५० ज्यावेळी समाजाच्या अपेक्षा व सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती एक होते त्यावेळी काय घडू शकते हे २०१४ सालापासून भारत अनभवू लागला तर जग पाहू लागले. समाजाच्या इच्छा, आकांक्षा व त्यासाठी केलेला संघर्ष व राजसत्ता ही समाज बांधिल असेल तर शिक्षण, इतिहास, कलाक्षेत्रातील विकृत हुकूमशाही कशी मोडून काढली जाते हे आपण मागील काही लेखांमधून पाहिले आहे. पण समाजाच्या सार्वभौम राष्ट्र म्हणून ज्या अपेक्षा असतात व त्या अपेक्षांची पूर्तता सत्ताधारी कसे करतात याचा नाविन्यपूर्ण अनुभव भारतीय समाज २०१४ पासून करून घेत आहे. तत्पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा विषयी कामे होत होती पण स्वतंत्र  होणा-या समाजाला ज्या उपेक्षांना पारतंत्र्यात समोरे जावे लागते, त्याचे परिमार्जन होणे हे अधिक गरजेचे वाटत असते. व या आपल्या देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात तर हा पारतंत्र्याचा कालावधी हाच मुळात फक्त १५० वर्षाचा ठरवला गेला कि जो भारतीय समाजासाठी हजार वर्षांचा होता. इस्लामी आक्रमणे ही भारताच्या पारतंत्र्यात मोजणेच इतिहासातून पुसण्यात आली. परंतू समाज तर तोच सनातन समाज होता व तो अथक हजार वर्षे आक्रमकांशी झुंजत होत...

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे यश हे समाज उर्मीतच

लेखांक १४९ समाजाची वैचारिक अभिव्यक्ती म्हणजे सरकारची सुध्दा आहे हे ७५ वर्षात तशा अर्थाने प्रथमच घडत होते. त्यापुर्वी सरकारे समाजाला अभिव्यक्त करत नव्हती कारण सरकार एक, समाज बाजूला, तर वैचारिक नेतृत्व तिस-याच्या हातात रिमोट कंट्रोल द्वारा. त्यामुळे अशा सरकारांना बौध्दिक दृष्टीने घाबरवणे सोपे होते. पण आता परिस्थिती पालटली होती. समाज वैचारिकदृष्ट्या सजग होऊन, स्वतः च्या वैचारिक भावना अभिव्यक्त करेल असे सरकार बनवण्यासाठी प्रयत्नशील होता व २०१४ साली त्याला ते पूर्णपणे जमले. त्यामुळे सरकार त्याच्या म्हणजे समाजाच्या विचाराने चालू लागले. जे सुंदर कपड्या आडून वैचारिक वीष व समाजाच्या विजिगिषू वृत्तीवर हल्ला करीत असत त्याचा बंदोबस्त समाजानेच सरकारच्या मदतीने  सुरू केला. गाय हा भावनिक विषय, समाज बदनामीसाठी वापरू देण्यास विरोध सुरू केला व भावभावना या  शास्त्रीय संज्ञापना आहेत हे ठणकावून सांगितले. योगा हे प्रगत समाजाचे लक्षण आहे हे सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे यापुढे निवडक नसणार हे ही स्पष्ट केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही मूलभूत राष्ट्रीय एकात्मतेशी तडजोड म्हणून वापरू दिले जाणार नाह...

सत्ता व समाजातील वैचारिक एकात्मता

लेखांक १४८ ज्या पद्धतीने या एकारलेल्या विचारधारांनी वैचारिक लढाई ही राजकीय बनवली त्यामुळे या विचारधारा वैचारिक लढाई पण हारल्या व राजकीय सुध्दा. या विचारधारांची मूळ चूक ही झाली कि राष्ट्रीय विचारधारेचा हा विजय नसून एका पक्षाचा, त्याच्या नेत्याच्या प्रभावाचा व आपण ज्यांच्या वळचणीला बसून ही वैचारिक चबढब करत होतो त्या पक्षाच्या ना कर्तेपणाचा हा पराभव आहे. यालाच शहामृगी पवित्रा म्हणतात. ‌जे दिसत ते नाकारून जी इच्छा आहे तीच खरी मानायची. पण परीणाम स्वरूप संपूर्ण पराभव पदरी पडला. जर विचारधारा, कार्यपध्दती याचा हा सातत्यपूर्ण विजय आहे हे समजून घेतले असते तर बरच काही सावरता आले असते. पण सद्य परिस्थितीत समाज राजकीय पक्षाच्या वळचणीला नसून त्याच्या म्हणजे समाजाच्या स्वतंत्र अपेक्षा आहेत व तो त्या  सत्तेला पूर्ण करण्यासाठी भाग पाडत आहे.हे जाणले असत तर संघर्ष उथळ झाला नसता. पण व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे या विचारधारेत दडपले जाईल  असे ठरवून स्वतः च्या विचारधारा हुकूमशाही तत्वांवर आधारित असूनही मोदी हे नेते व हिंदू हा समाज हा हुकूमशाही आणणार असे गृहितक आखून संघर्ष सुरू केला....

वैचारिक संघर्षात झुंडीची कोंडी

लेखांत १४७ मुळात संघर्ष राजकीय नव्हता तर विचारधारेला होता पण त्या राष्ट्रीय विचारधारेची ताकद इतकी जास्त होती व हजारो वर्षांपासून सिध्द होती कि ती समूळ नष्ट करणे कोणालाही शक्य नव्हते. या एकारलेल्या, अपरिवर्तनीय विचारधारांना ते शक्यच नव्हते.  त्यामुळे राष्ट्रीय विचारधारेला वैचारिक संघर्ष करून पराभूत करणे हे यापैकी कोणालाही शक्य नव्हते. अशा वैचारिक संघर्षाला जी सर्वसमावेशक मानसिकता लागते तीच मुळी नसल्यामुळे वैचारिक संघर्ष व त्यातून विजय ही शक्यताच संपली. व मग परत सुरू झाला संघर्षाचा सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न. सुरवातीला सरकारी दमनशाहीची मदत हे शस्त्र वापरले जात होते, ते शस्त्र २०१४साली निकाली निघाले. मग वैचारिक संघर्ष शक्य नसल्याने सोप्या मार्गाने प्रवास सुरू झाला. राजकीय विरोध उभा करायचा, सामाजिक प्रश्न निर्माण करायचे, कलाक्षेत्रातील स्वातंत्र्य, मानवाधिकार, अशी शस्त्रे बाहेर काढायची हे खेळ सुरू झाले. व येथेच फसगत सुरू झाली. ज्या विचारा विरूध्द संघर्ष करायचा, ते बाजूला राहिले. पण तो विचार तर केंद्र स्थानी आला होता व त्याला फारशी गरज नसली तरी सत्तेची कवचकुंडले पण जोडीला होती. सत्तास...

एकारलेल्या विचारधारांचीं राजकीय कोंडी

लेखांक १४६ कला क्षेत्रावर एकारलेल्या विकृत विचारधारा मानणा-या समुहाचा जो भयानक व विकृत प्रभाव होता त्यामुळे समाजाची सदिच्छा व चांगुलपणा वरचा विश्वासच उडाला होता. सहनशीलता हा दोष वाटावा इतक्या टोकाला विकृती पोहोचली होती. चित्रकार हुसैन यांच्या स्वाभाविक विकृती विरुद्ध जनक्षोभ उभा राहिला. विचारवंत कंपू विसरला होता कि परिस्थिती पूर्ण बदलली आहे, व त्यामुळे कलाकारही हुसैन यांच्या विरोधात उभे राहिले. कलाकारांनाही या निवडक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात उभे रहावे असे वाटू लागले. जागृत समाजाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खोटा मुखवटा घेतलेल्यांना समजून दिले कि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना, तरच कलाकाराला व एवढेच नाही तर अभिव्यक्ती यापुढे selective नाही तर सर्वांसाठी समान असेल तरच तुम्हाला मिळेल. लोकांनी, एकारलेल्या विचार धारेला, आता लबाडी करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी खेळू देणार नाही हे ही स्पष्ट केले. तीन तलाक, हलाला हे कथांमध्ये डोकवू लागले तर चर्चमधील अनैतिकता, व भ्रष्टाचार यांना ही कथा, समाज माध्यमे यात जागा होऊ लागली. भरकटलेल्या एकारलेल्या विचारधारांवर पुष्ट झालेल्या विचारवंत कंपूला ...

संपूर्ण परिवर्तन व अभिव्यक्ती स्वातंत्र्य

लेखांक १४५  सर्वंकष सत्ता परिवर्तन झाले. वैचारिक परिपुष्टता करणा-या सर्व सरकारी संबंधित संस्थांवर बसून स्वार्थ व परमार्थ करणा-या या वर्गाला सत्याबाबत शहामृगी पवित्रा घेऊन जगण्याची इतकी सवय झाली होती कि बाहेर परिवर्तनाची पहाट झाली आहे हेच मुळी त्यांना कळले नाही. जसे समाज माध्यमे व त्यांची ताकद व स्वतः ची संपलेली विश्वासार्हता  यांचा या विचारवंतांना अंदाज नव्हता, तसेच संपूर्ण राजकीय परिवर्तनाचे बाबतही कळले नाही. पण सत्य तर समोर आ वासून उभे होते. पण याचा स्वीकार करून स्वतःच्या भूमिकांची पुनर्बाधणी करण्या ऐवजी जनता मताचा अनादर करण्याचा प्रयत्न झाला. ज्या संवेदनशील कला, साहित्य क्षेत्राने सर्वाधिक संवेदनशील पाहिजे होते, त्याच धुरीणी आपला पराभव समजून घेण्याऐवजी खापर फोडायला दगड शोधत बसले. पण बहुसंख्यांक समाजाला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. समाजाला, कलेला, साहित्याला, या सर्वांनाच. अन्यायाचे परिमार्जन कसे करायचे हे हि काम ही क्षेत्रे व त्यातील सर्व उपेक्षित दिग्गज व सामान्य माणसे करू लागली. कलेत राष्ट्रवादाचे, संस्कृतीचे, पूर्वापार परंपरांचे सकारात्मक प्रदर्शन, महान भारतीय दर्शन...

वैचारिक एकारलेपणाची वाताहात

लेखांक १४४ जी प्रक्रिया समाजामध्ये सहजपणे समाजाने सातत्यपूर्वक करावयाची असते ती प्रक्रिया या वैचारिक झुंडीने सत्ताधीशांच्या मदतीने करण्याचा प्रयत्न केला कि सामान्यपणे ज्या सत्तेला अधिकार दमन हा रोग असतो. पण एकदा तो मार्ग स्विकारल्यानंतर त्या सत्तेच्या उलथापालथी मध्ये स्वतः चे स्वत्वही गमावून बसावे लागले. हैवही जाते व दैवही. अशी अवस्था आमच्या आहि रे गटातील विचारवंत गटाची झाली. २०१४ साली सर्वंकष सत्तांतर झाले. आज पर्यंतच्या आधुनिक भारतात निवडणूकीच्या आधारे संपूर्ण वेगळ्या तत्वज्ञानावर उभे असे परीवर्तन २०१४ साली भारतात प्रथमच घडले. असे सर्वंकष राजकीय परीवर्तन होईल असे कोणाही विचारवंत कंपूला वाटले नव्हते. त्यामुळे असे घडले तर? हा विचारच केला गेला नव्हता. व अभेद्य अशी सत्तेची कवचकुंडले लेऊन आपण आपला वैचारिक Ivory Tower सांभाळून ठेऊ असे वाटत असतानाच ती कवचकुंडले गळून पडली. आमच्या वैचारिक क्षेत्राची एवढी कुंठीत अवस्था आली होती कि जो विचार कधीही रूजू द्यायचा नाही, फोफावू द्यायचा नाही, जगू टिकू द्यायचा नाही, त्या विचाराचा अभ्यास सुध्दा केला गेला नाही. त्याची बलस्थाने, मर्यादा याचा विचार केला गे...

अभिव्यक्ती स्वातंत्र्य शासकीय दावणीला

लेखांक १४३ अभिव्यक्ती ही कोणत्याही स्वरूपात असली तरी त्याचे स्वातंत्र्य जपले पाहिजे हे भारतात हजारो वर्षांपासून प्रयत्नपूर्वक रूजवलेले मूल्य आहे. पण ते सोईचे नसल्याने एकारलेल्या विचारधारांनी बीन कष्टाच्या मार्गाने ते आणण्याचा प्रयत्न, म्हणजे शासकिय यंत्रणांच्या माध्यमातून समाजात हे रूजवण्याचा नाटकी प्रयत्न केला. काय होते या प्रयत्नांचे स्वरूप? कला व कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे तर कायदा करा. कायदा कोण करणार? तर ब्रिटीश किंवा स्वातंत्र्योत्तर भारतीय संसद. जगभरातील कोणत्याही देशाला भौतिक गरजांशिवाय  अन्य कोणतीही गोष्ट शासकीय पातळीवर बहाल करता आलेली नाही. नियम, बंधने कधीही सकारात्मक नसतात तरीही ती व्यवहार सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असतात. पण त्यांनी मनाचे, भावनांचे, अभिव्यक्ती चे नियमन करता येत नाही व करायचेही नसते. पण समाजात मान्यता नाही व समाज समजूत घडवण्यासाठी पिढ्यांपिढ्या द्यावा लागणारा वेळ देण्याची कुवत नाही त्या सर्वांनी शासकीय मदतीने हे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. वैचारिक समजूत कमकूवत  असलेल्या शासनामुळे या परान्नजीवी घटकांचे चांगलेच फावले. यात शासनाची बक्षीस...

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारताचे सनातन मूल्य

लेखांक १४२ समाजामध्ये ज्यावेळी एखादी  भावना ही दीर्घकालीन वा कायम स्वरुपी रूजवायची असते, त्यावेळी ती समाजात व समाजाबरोबर राहून रूजवावी लागते. परंतू आधुनिक भारतातील विचारवंत, कलावंत ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आम्ही भारतीय समाजाला नवीनच देत आहोत कि जे या मागास समाजात कधीच नव्हते, असा आविर्भाव आणला होता, ते स्वतः त्यासाठी कोणत्याही खस्ता खात नव्हते व समाजात हे मूल्य प्रवाहित करण्याचा प्रयत्न करत नव्हते. मूळात हे मूल्यच खरं तर त्यांना तत्वज्ञान पातळीवर मान्य नव्हते. पण भारतात जबाबदारी शिवाय अधिकार मिळवण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कला स्वातंत्र्य, सृजनशीलता ही हत्यारे बनवली गेली होती. पण भारताने हजारो वर्षांच्या राष्ट्रीय व सांस्कृतिक प्रवासातून हे मूल्य समाजात नीट रूजवले होते. व्यक्ती व समाज यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मूल्य रूजण्यासाठी व्यक्ति व समाज याला आत्मसन्मान आसावा लागतो. त्यामुळे भारतीय तत्वज्ञानाने समाजात व व्यक्तिमध्ये हजारो वर्षांपासून हा भाव जागा केला व परीणामतहा समाजात एकमेकांच्या स्वातंत्र्याचा सन्मान होता. पण या नवागतांनी अभिव्यक्ती मूल्य रूजण्यासाठी उप...

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी समाज संघर्ष

लेखांक १४१ समाज माध्यमे ही ही अभिव्यक्ती व्यासपीठ म्हणून सामान्य पण समंजस, अभ्यासू, तार्तिक व्यक्तिंच्या हातात आली. व कोणतेच धरबंध नसलेले विद्वान हे स्वतः ची मते सत्य म्हणून मांडून प्रतिवादाला आवकाश न ठेवता ज्या Ivory Tower मध्ये बसले होते, त्यांचे असत्याचे बुरखे टराटरा फाटू लागले. आधी स्वतः च्या कह्यातील मेन स्ट्रीम मिडीया माध्यमातून ही मंडळी व्यक्त होत असत. पण त्याचा वाचक व प्रेक्षक आटल्याने व बाहेर सामान्य माणूस सत्य व ज्ञान व व्यवहारीक शहाणपणाची शस्त्रे घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई लढत असल्याने  त्यात उतरणे या विचारवंतांना भाग पडले. ट्वीट मागे घेणे, पोस्ट काढून टाकणे, वृत्तपत्र सेवेने रोज माफीनामा लिहिणे सुरू केले. कारण सत्याची वाफ दाबून ठेवणे आता शक्य नव्हते. सत्याचा अनेकांगी आविष्कार सुरू झालाच, त्याच बरोबर प्रतिबंधात्मक कारवायाही सुरू झाल्या. चेहरा नसलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य बरोबर घेऊन समाजाला, लबाडी विरूद्ध शठं प्रति शाठ्यं ही लढाई पण खेळायची होती. हुसेन हे देवीचे नग्न चित्र काढत असतील तर त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रेषितांचे चित्र काढण्याची परवानगी देते का? ...

समाज माध्यमे social media व अभिव्यक्तीचे सार्वत्रिकीकरण .

लेखांक १४० एकारलेल्या वैचारिक झुंडीला व त्यांच्या आश्रयदात्या सत्ताधिशांना जसे समाज संघटन या विषयी पूर्ण अज्ञान होते तसेच त्यांचा समाज माध्यमाच्या अभिव्यक्ती शक्तीचा अंदाज सुध्दा पूर्ण चुकला. तंत्रज्ञानाचे असाधारण महत्त्व नाकारून, त्याच्यावर उथळपणाचा आरोप व खरेपणा विषयी संशय व्यक्त करून भागेल असा स्वतः च स्वतः चा भ्रम करून घेऊन समाज माध्यमांकडे दुर्लक्ष केले. पण या क्षेत्राची ताकद पूर्ण वेगळी होती. व परीवर्तन हा सहज स्वभाव असलेल्या समाजाने हे ओळखले होते. व त्याचा अभिव्यक्त होण्यासाठी पूर्णशक्तीने उपयोग सुरू झाला. समाज माध्यमे या पोपटाचा प्राण आहे, कोणालाही अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य. आज पर्यंतची अभिव्यक्तीची माध्यमे ही मर्यादित होती. त्यामुळे सामान्य माणसाला अभिव्यक्त होऊ द्यायचे कि नाही, किती? याचा निर्णय मूठभरांना करणे शक्य होते. वर्तमानपत्रात फक्त पत्र छापून येईल पण लेख नाही. सामान्य माणसाला अभिव्यक्त होण्यासाठी लेखन स्वातंत्र्यावर अघोषित मर्यादा होती. सिनेमा तर परिघा बाहेरचीच गोष्ट होती. चित्रकाराच्या चित्राचे रसग्रहण करणा-या मर्मज्ञाच्या वैचारिक मान्यतेत आलात तर आपण चित्रकार व...