अजमेर लैंगिक गुन्हे एक दृष्टीकोन
अजमेर लैंगिक गुन्हे: एक दृष्टीकोन अजमेर दर्ग्याचे खादीम म्हणजे समजण्याच्या भाषेत care taker, यांच्यापैकी सहा विकृत नराधमांना अखेर बत्तीस वर्षांनी जन्मठेप शिक्षा सुनावली गेली. म्हणजे शिक्षा जाहीर करण्याचा सोपस्कार पार पडला. यांच्या वरील आरोप हे अत्यंत गंभीर स्वरुपाचे व मानवतेने लाजून थिजून जावे अशा स्वरूपाचे होते. शंभरहून अधिक महिलांचे बदनामी करून लैंगिक शोषण केले गेले. स्त्रीची अब्रू वेशीवर टांगली गेली. गुन्हा वैयक्तिक विकृतीचा नव्हता तर सामुहिक विकृतीचा होता. व भरीस भर त्यात एक अजून जालीम नशा पण होती. म्हणून हा विषय भारतासाठी, हिंदूंसाठी समजावून घेणे अधिक आवश्यक ठरते. कोणताही बलात्कार, लैंगिक शोषण हे घृणास्पद आहेच पण या प्रकरणात ते अन्य काही कारणांनी अधिक विकृत व अधिक दखल घेण्या योग्य आहे. यातील सहाही आरोपी साधे गुन्हेगार नाहीत तर दर्ग्याच्या खादिमांमधील आहेत. म्हणजे विश्वस्त घरातील आहेत. दर्ग्याचे मजहबी मालक आहेत. तेथे येणारा चढावा हा या जातीतील लोकांच्या पायाशी ओतला जातो व ते हा पिसाटपणा करत होते. सगळे चिस्ती व सुफी नराधम होते. यांच्या जाती, दर्ग्याशी नातं व दुर्दैवी महिला यांच...