परान्नजिवी तत्वज्ञान व राष्ट्रीयत्व
लेखांक १२६ आपण पहात आहोत कि परकीय व काही राष्ट्र बाह्य वैचारिक निष्ठा असणा-या बुध्दिवंतांनी भारताचे राष्ट्रियत्व, हिंदू शब्द व त्या अनुषंगाने येणारी संस्कृती व त्याचे चिरंतनत्व, त्याचा गौरवशाली इतिहास, सर्वंकष प्रगती हे सर्वच नाकारले व भूमिकाहीन सरकारांच्या मदतीने ते अधिकृत शिक्षण रचनेतून ते तसे समाजावर थोपण्यात यशस्वी सुध्दा झाले. तो विषय कधी इतिहास असतो, कधी विज्ञान असते, कधी कला असते, कधी समाजशास्त्र असते, पण या सर्वांचा गैरवापर करून संपूर्ण हिंदू समाज बदनाम केला व कमालिचा हतोत्साही सुध्दा केला. परंतू सुरवातीपासून आपण पहात आहोत कि अनेक द्रष्ट्यांनी स्वातंत्र्य लढा चालू असतानाही हे राष्ट्र विघातक षडयंत्र ओळखून समाज स्वत्वपूर्ण संघटित व वैचारिक दृष्ट्या भारतीयच राहिल या साठी प्रयत्न चालू ठेवले. व त्याचे सुपरिणाम स्वातंत्र्योत्तर भारतात सर्वांना आता दिसू लागले आहेत. आता ते प्रयत्न जागृक समाजाने कसे केले ते पुढील लेखांपासून समजावून घेऊ यात. सुनील देशपांडे Article (128/n)