विश्वासराव ताम्हणकर गेले
विश्वासराव ताम्हणकर गेले. तसे हे सामाजिकदृष्ट्या फार प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व नव्हते. पण ज्यांचा विश्वासरावांशी परिचय होत असे त्यांना चुकल्या चुकल्या सारखं वाटायला लावणार व्यक्तिमत्त्व होत विश्वास ताम्हणकर. पुण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काही घराणी आहेत. त्यातील हे एक मात्तबर घराण आहे. सर्व भाऊ फक्त संघ एके संघ. जीवनाची घडीच अशी घातली होती की आयुष्याच्या प्रथम स्थानावर संघ. असे विश्वासराव गेले. ताम्हणकर व पुणे या मिश्रणामुळे पुरेसे तर्कट वाटायचे पण खर तर तर्कशुद्ध असायचे. इस्लामी जगतात काय खदखद चालू आहे हे सर्वात अचूक माहिती असलेला प्रथम क्रमांकाचा हिंदू म्हणजे विश्वास ताम्हणकर. या विषयावरील कोणताही संदर्भ विश्वासाने मिळण्याचे ठिकाण म्हणजे मोतीबाग पुणे येथील विश्वासरावांची खोली. या खोलीत एवढा खोल अभ्यास नव्हे ज्ञानयज्ञ चालू असे की आगामी काळात इस्लाम कसे वागणार आहे याचे अचूक भाकीत या खोलीत होत असे. तर्कशुद्ध विचार, अत्यंत आत्मीय संबंध, विनोदी अंगाने कार्यकर्त्यांचे समिक्षण हे सगळे शिकण्याचे विद्यापीठ म्हणजे विश्वास ताम्हणकर. मला मात्र विश्वास ताम्हणकर यांचा मित्र म्हणवून घेता आले ...