Doctor on the war front
*DOCTOR ON THE WARFRONT* एक जिवंत, रसरशीत अभिनाट्य वाचनाचा अनुभव आज प्रत्यक्ष मिळाला. इंग्रजी नावाचे हे अस्सल मराठी "अभिनाट्य" म्हटल तरी खर तर अनुभव नाट्य आहे. नाशिकचे अस्थिरोग तज्ज्ञ भरत केळकर यांनी वैद्यक पथकातून घेतलेल्या तीन यादवी युध्दाच्या दाहक अनुभवाचे हे शंतनु चंद्रात्रे या तरुण साहित्यिकाने केलेले अत्यंतिक संवेदनशील व दाहक असे नाट्य रुपांतर आहे. सामान्य युध्द वर्णनात नायकाला शत्रू मित्र हा अपपर भाव असतो जो या ठिकाणी अस्तित्वात नाही कारण अपरिचित ठिकाणी फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातून सेवा द्यायला गेल्यावर त्रयस्थ माणसाच्या मनावर झालेल्या गृहयुध्दाच्या परिणामांची खोल अश्वत्थामा जखम आपल्याला स्पष्ट दिसते. ति-हाईत असल्याने युध्दाचा फोलपणा व युद्धोत्तर उद्विग्न शांतता किती भयावह असते हे सहजपणे जाणवते. म्हणूनही हा प्रयत्न फारच मोलाचा व मराठी रंगभूमीला एक दिशा देणारा ठरणार आहे. ही युध्दे सामान्य युध्दांपेक्षा भयंकर व विकृत म्हणून शिशारी आणणारी आहेत कारण ही गृहयुध्दे आहेत. शत्रूशी नाहीत तर आपल्याच बांधवांशी आहेत म्हणून मूळापासून हादरवणारी आहेत. त्यामुळे हा अनुभव, त्याचे शब्दा...