हिंदू वैश्विक चिंतनात 'शांतता '
हिंदू चिंतन हे सर्वार्थाने वैश्विक चिंतन का आहे? हे अनेक प्रकाराने तपासता येते. यातील वेद, उपनिषदांतील ब्रम्हज्ञानापासून, तत्वज्ञानापर्यंत प्रत्येक वाक्य हे संपूर्ण चराचर सृष्टीतील एकात्मतेचे दर्शन घडवते. ज्ञानमार्गी हिंदू जीवन रचना सुध्दा तत्वज्ञानातील सर्वसमावेशकता सांगते. हिंदू समाजाचे वर्तन व आधुनिक काळातील भारताची संयमित युध्दे, हिंदू संस्कृतीचा विश्व संचार हे सर्व हिंदू चिंतन हे वैश्विक चिंतन आहे हे सहज पटवून देते. पण हिंदू या शब्दाला शांतता हा गुणवाचक शब्द फारसा जोडला जात नाही. अब्राहामिक पंथ प्रमुख शस्त्रसज्ज दाखवला जात नाही पण एकही हिंदू देव देवता शस्त्राविना नाही. म्हणूनच हिंदू या अंगानेसुध्दा वैश्विक चिंतन कसे आहे? हे बारकाईने समजून घेतले पाहिजे. यासाठी शांतता शब्दाच्या मर्यादांचाही विचार केला पाहिजे. मूळ शांतता शब्द हा संस्कृत मधून जशाच्या तशा आला आहे. व तो मानसिक स्थिती दर्शवितो. तो प्रामुख्याने वेगवेगळे तह, करार, भौतिक शांतता यासाठी वापरला जात नाही. या उलट पीस ( इं) हा शांततेच्या भौतिक प्रयत्नांसाठी वापरला जातो. म्हणून आधुनिक परिभाषेत शांतता शब्द हा भितीदायक शब्द बनला आहे...