Posts

Showing posts from July, 2026

आधुनिक अगस्तीचे समुद्र उड्डाण

Image
आज ८ जुलै, स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ऐतिहासिक समुद्रातील उडीचा दिवस. खरोखरच ऐतिहासिक दिवस आहे. जगभर भारतीय क्रांतीकारक स्वातंत्र्यासाठी प्रयत्नशील होते. पण तरीही भारतीय स्वातंत्र्य लढा हा जगाच्या केंद्रस्थानी येत नव्हता. पण ही ऐतिहासिक उडी ८ जुलै २०१० साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मारली व जगाला एका स्वातंत्र्य लढ्याची जाणीव झाली. म्हणूनच ही उडी ऐतिहासिक आहे. पोहलेले अंतर फार नाही पण स्वातंत्र्य लढ्याने कापलेले अंतर फार मोठे होते. या उडीने दोन सार्वभौम देशांना भारतीय स्वातंत्र्य चळवळी विषयी ठाम भूमिका घेणे भाग पाडले हे या उडीचे महात्म्य होते. फ्रांसला इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावे लागले. सावरकरांच्या हस्तांतरणाची मागणी करावी लागली. एका उडीतून सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले म्हणून ही उडी ऐतिहासिक आहे . २४ फेब्रुवारी १९११ साली या केसचा निकाल लागला. एवढे दिवस हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत राहिले. हस्तांतरण अवैध होते हे मान्य झाले. कृतिचे परिणाम ठरवते की कृति किती परिणामकारक होती. इतिहासाने सिध्द ...

The Sheep Detectives

Image
मी आज Amazon Prime वर द शीप डिटेक्टिव्हज हा चित्रपट पाहिला. एक अफलातून सिनेमा पाहुन झाला. कलेने प्रेक्षकांच्या जगाकडे बघण्याच्या कक्षा रुंदावायच्या असतात असे असेल तर हा चित्रपट ते काम पूर्ण करतो. हा सिनेमाचा विषय कसा होऊ शकतो? असा प्रश्न सिनेमा पाहताना पडला तर त्याने प्रेक्षकांच्या जाणीवांच्या कक्षा रुंदावल्या असे म्हणता येईल. The Sheep Detectives ने पूर्ण केले आहे. काय कथा आहे? एक मेंढपाळ आहे. तो मेंढ्या सांभाळत असतो. प्रेम करत असतो मेंढ्यांवर. त्यांना विकत नसतो. त्यांना रात्री रहस्य कथा वाचून दाखवत असे. त्याचा मृत्यू होतो. मग तो खून ठरतो. चित्रपटात खून आहे पण रक्तपात नाही. गावक-यांवर संशय येतो. त्याचीच मुलगी अटक होते. या शेळ्या गुप्तहेर गिरी करतात व खूनी पकडला जातो. पण या कथेला ताकद मिळते ती out of the box विचाराची. व्हॅन, व मेंढर एवढच नायक जाॅर्जचे जग. रहस्य कथा अर्धवट वाचून झाली की ती मेंढर आपापसात चर्चा करत की खूनी कोण? त्यातल्यात लिली मेंढरु उत्तराजवळ जात असे. मेंढर मरत नाहीत तर ढग बनतात असा विश्वास. संकट, दु:ख कधी माहितीच नाही. सगळा कारभार भाबडेपणातून चाललेला. Innoce...