Posts

Showing posts from December, 2018

तीन तलाकच्या निमित्याने

तीन तलाक च्या विरुद्ध लोकसभेमध्ये कायदा पास झाला.नागरी मुल्यांचे समर्थन करणाऱ्या सर्व भारतीयांना मनापासून आनंद झाला. मुस्लिम स्त्रियांची एका अमानुष प्रथेपासून सुटका झाली. मुस्लिम स्त्रीच्या संसारावरील टांगती तलवार दूर झाली. निदान अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा मार्ग तरी खुला झाला. परंतु यानिमित्ताने एक वेगळीच महत्त्वाची गोष्ट घडली आहे. व्यक्तिगत कायदा नावाच्या तुरुंगामध्ये डांबून ठेवलेल्या मुस्लिम समाजाला मुक्तीचा एक मार्ग सापडला आहे. शरीया सर्वश्रेष्ठ, कुराण ईश्वरीय व म्हणून अपौरुषेय याविरुद्ध पहिले पाऊल पडले आहे. मुस्लिम वैयक्तिक कायद्याचा अर्थ काय हे भारत सरकार, भारतीय न्यायालय ठरवू शकणार नाहीत. तर फक्त मुल्ला मौलवी आणि वेगवेगळे धर्म दलाल ठरवतील या मुद्याला मूठमाती मिळाली आहे. मला हा मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटतो. भारतीय मुल्ये व भारत देश याविषयी अप्रीती निर्माण करण्यात कुराण व शरीया यांची फार मोठी भूमिका आहे.  त्यामुळे पुढील काळात मूर्तिभंजन, देशाला माता न मानणे अशा प्रकारच्या अज्ञांनासुद्धा चाप लावला गेला पाहिजे. ज्यावेळी अशाप्रकारे बहुसंख्यांक समाजाच्या भावना दुखावणारी व...

प्रश्न विचारू या

फादर दिब्रिटो यांना प्रश्न पडला आहे की गाय महत्त्वाची की माणूस? अशी एक मोठीच प्रश्नांची मालिका तयार करूया. अखिया वरचा प्रश्नच परत विचारूयात की गाय महत्त्वाची का क्रूर तरस? कायदा कोणीच हातात घेऊ नये परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहता गोहत्या ही अतिशय क्रूर म्हणूनच इतिहासामध्ये पाहिली गेली आहे. व हिंदू समाजाचा अपमान हाच त्याचा बहुतेक वेळा हेतू राहिलेला आहे. आता फादर दिब्रिटो यांना प्रश्न विचारू. आठवण करून  काही प्रश्न आपण विचारुयात. बलात्कारित नन महत्त्वाची की बलात्कार करणारा फादर? अद्यापही फादर दिब्रिटो यांनी फादर विरुद्ध उघड भूमिका घेतलेली वाचनात आलेली नाही.पदोपदी तुकाराम महाराजांचे स्मरण करणाऱ्या फादर दिब्रिटो यांनी या फादरला नाठाळाचे माथी हाणू काठी असा शब्दप्रयोग केलेला वाचनात आलेला नाही. चर्चच्या मखमली जाजमा खाली जणूकाही सगळं आलबेल आहे अशा स्वरूपात अन्य धर्मांच्या बारीक-सारीक गोष्टी मध्ये कावळ्याच्या चोची मारण्याचे उद्योग करणाऱ्या फादर दिब्रिटो यांनी कृपया या बलात्कारी फादर या विषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी. फाशी झालेला अतिरेकी महत्त्वाचा की नसिरुद्दीन शहा चे अभिव्यक्तिस्वातंत...

श्रमसाफल्य

बाप म्हणून मी खूपच आनंदात आहे. कारण माझा मुलगा ऋषी आज माझ्यासाठी हिरो बनला आहे. तसं तर ऋषी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश मिळवत असतो, बक्षीस मिळवत असतो, परंतु आज त्यानी जे काही केलं त्यामुळे मला यशापेक्षाही त्याच्यातील गुणाचं अधिक कौतुक वाटलं.  व्हिजेटिआय मुंबई यांनी  भरवलेल्या व्हॉलीबॉलच्या मॅचेस मध्ये पुण्याच्या सीओईपी च्या वतीने ऋषीने दिवसभरामध्ये 5 मॅचेस खेळून यश संपादन केले. मला कौतुक करायचं आहे ते आज दिवसभर त्या सगळ्या संघाने केलेल्या कष्टाचं. तरुण मुलांना कष्ट करायला नको आहेत फक्त सोशल मीडिया व ई विश्वातच गुंतून राहिला आवड त. असं म्हणणाऱ्या सर्वांना तरुण मुलांना खरं  काय आवडतं याचं उत्तर मिळालं आहे. व्हॉलीबॉल सारख्या मैदानी खेळांमध्ये आज दिवसभरामध्ये 5 मॅचेस म्हणजे किमान पंधरा सेट्स या मुलांना खेळावे लागले. आव्हान स्वीकारणे म्हणजेच तर तारुण्य. आज या मुलांनी सिद्ध करून दिले की आम्ही खरे मर्द तरुण आहोत. मला या तारुण्याचं कौतुक करायचं आहे. नाहीतर एका शेंडाड शिपायाची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. कसतरी युद्धावर पाठवलं तर मार खाऊन परत आला. काय झालं विचारल्यावर म्हणतो क...

श्री गणेशा करूया.

हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. पण आता ब्लॉग रायटिंगच्या प्रांतातही मुशाफिरी करून पाहणार आहे. पूर्वी मेन स्ट्रीम व प्रिंट मिडिया मध्ये मला व्यक्त व्हायला संधीच नव्हती. पण सोशल मीडिया आला व मला  व्यक्त होण्याची संधी उपलब्ध झाली. नव्हे तर व्यक्त होण्यासाठी फार मोठे दालनच उपलब्ध झाले. मला माझ्या सामाजिक जीवनात जाणवणारी वस्तुस्थिती व वर्तमान पत्र दाखवत असणारी दुनिया यांच्यातील विसंगती आत्यंतिक त्रास देत असे. व हाच आक्रोश सर्वसामान्य लोकांचाही आहे हेही मला जाणवत होते. अयोध्या आंदोलनाने या सर्वांवर कळसच केला. जनक्षोभ कुठे  व या वर्तमानपत्रांच्या स्वतःच्या भूमिका कुठे? याचा काही ताळमेळच बसत नव्हता. त्या वेळी तीव्रतेने वाटले की लोकां पर्यंत मला पोहोचता आले पाहिजे. सोशल मीडिया आला व हे स्वप्न साकार झाले. व्हॉट्स अप फेसबूक ट्विटर आता ब्लॉग. धन्यवाद सोशल मीडिया. पहिला ब्लॉग तुझ्या आभाराचा व धन्यवादाचा.