Posts

Showing posts from January, 2022

कश्मीरीयत म्हणजे भारतीयत्व.

Image
लेखांक ७४* हे आश्चर्य चकित करणारे घडलं असल तरी अचानक मात्र घडलं नव्हतं हे आपण पाहिले. संपूर्ण हिंदू समाज, वेगवेगळी सरकारे, त्यावरील संपूर्ण समाजाचा दबाव, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने कालांतराने घेतलेली ठाम भूमिका या सर्वांचाच परिणाम होत, होत वरील आश्चर्य घडले. ३७० जाण्याचे काय काय परीणाम होत आहेत हे पहाणे फार महत्त्वाचे आहे. साधारणपणे खिलाफत चळवळी पासून मुस्लिम समाजाला धमक्यांच्या आधारे नवनवीन  राष्ट्र विघातक मागण्या मान्य करून घ्यायची सवय लागली होती त्याला जबरदस्त सुरूंग लागला. ३७० कलम हे वज्रलेप आहे असा मुस्लिम समाजाचा व देशा विदेशातील अनेकांचा व सामान्य समाजाचा समज धुळीस मिळाला. सुमारे १५०/२०० वर्षांपासून मानगुटीवर बसलेलं मुस्लिम अनुनयाचे भूत उतरण्यास सुरुवात झाली. याच जोडीला तीन तलाक बंदीचा कायदा झाल्यामुळे तर एक पाऊल पुढे पडले. तीन तलाक प्रकरणाने समाजात मोठे परीवर्तन होणार आहे असे नाही. पण आमचा शरीया अस्पर्श आहे हे गृहितक साफ कोलमडून पडले. ही गोष्ट सर्वात महत्वाची घडली. संविधानात एखादी गोष्ट चिकटवून घेऊ व ती वज्रलेप आहे असे भासवू हा भ्रमही निघून गेला. आमचा व्यक्तिगत कायदा या ...

अखेर कलम ३७० उडाले.

Image
लेखांक ७३* सुमारे ७५ वर्षाच्या राजकिय इतिहासामध्ये २०१४ साली प्रथमच संपूर्णपणे काॅंग्रेसपेक्षा वेगळ्या विचाराचे संपूर्ण बहुमतातील केंद्र सरकार भारतामध्ये अस्तित्वात आले. त्याच्या येण्यामागे १०० वर्षांची राष्ट्रीय विचाराने भारावलेला जनसमुदाय उभा करण्याच्या प्रयत्नांची साखळी, व त्यांना एकत्रित करून शक्तीरूप दिलेली संघटना ह्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहेच. यापुर्वी जी सरकारे आली ती काॅंग्रेस किंवा काॅंग्रेसेतर अशा स्वरूपाची होती. त्यामुळे सामान्यांच्या आकांक्षांचे ते १००%प्रतिनिधी ठरू शकतं नव्हते ही त्यांची समस्या होती. या विषयीची अगतिकता व उद्वेग श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत आमचे एकट्याचे बहुमत नाही म्हणून कलम ३७० हटवता येत नाही, असे म्हणून व्यक्त केला होता. जनसंघाच्या निर्मिती पासून ह्या ध्येयात कधीच फरक पडला नव्हता. २०१४ साली फक्त स्वबळावर  भाजप सत्तेत आला कि ज्याच्या सर्व अवतारात, जसे जनसंघ, जनता पक्ष, भाजप, ३७० कलम हटवणे हा प्रमुख मुद्दा होता. त्या दिशेने भावनिक वायुमंडळ हे तयार झाले होते, पण आता आवश्यकता होती तांत्रिक विजयाची सुध्दा. भारतीय एकात्मतेचा दणदणीत वि...

विवेकाची ऐशीतैशी

विवेकाची ऐशीतैशी अंनिस मध्ये याहून काही वेगळं घडण अपेक्षित नव्हते. पण आत्ता भांडणारे दोन गट ही समस्या नाही. राजकारणात घराणेशाही विरूद्ध पिंका टाकणा-या स्वघोषित प्रबुद्ध जमातीचे पाय किती मातीचे आहेत ही ती समस्या आहे. तात्पुरती मलमपट्टी होईलही. पण भांडणा-या तरूणांपेक्षा त्यांना नासवणा-या भोंदू सुधारकांचा हिशोब तपासणे गरजेचे आहे. अंनिस व डॉ दाभोळकर म्हटल्यावर घळघळणारे, अनिल अवचट म्हटल्याबरोबर ताठ उभे रहाणारे यांना समाजातील संस्था जीवन, त्यात व्यक्ती महात्म्याचे शून्य महत्त्व व म्हणून  या सामाजिक पवित्र गायींचे योग्य मूल्यमापन आरशासारखे दाखविण्याची गरज आहे. अंनिस ट्रस्ट, त्याचा ताबा मुलांकडे गेला कसा? डॉ दाभोळकर यांना काहीच श्रेय नाही का? गुणगान करणा-यांनी करावे पण डॉ दाभोळकर यांना आरसा म्हणून गाडगे महाराज व त्यांच्या ट्रस्टची घटना दाखवावीच लागेल ना? ( वडील डॉ दाभोळकर यांना) अनिल अवचट यांचेही कार्य, संवेदनशील मन, अफाट प्रतिभेचे साहित्य महानच आहे पण,.‌.‌..... व्यसनमुक्ती ट्रस्ट वतीने मुलगी बोलते. थोडे दिवसांनी संस्था जीवन म्हणून देश काय शिकेल? बाबा आमटे यांचे कार्य बघता बघता कुटुंब सम्म...

काश्मीर समस्येचा सुखान्ताकडे प्रवास

Image
लेखांक ७२* अशा अनेकविध अंगांनी काश्मीर समस्येवर संपूर्ण समाज, व देश काम करू लागल्यामुळे व तसे वर्षानुवर्षे काम करत राहिल्याने सतत भेदरलेली सरकार ही यंत्रणा सुध्दा काही धीट निर्णय करू लागली. जशी कि निवडणूका घेऊन लोकनियुक्त सरकारे येऊ लागले व राष्ट्रीय राजकारण करणा-या पक्षांवर व त्या राष्ट्रीय राजकिय पक्षांचा स्थानिक कार्यकर्ते व वातावरणा वरील समाज दबाव वाढत गेला. यात लष्कराचा सकारात्मक प्रभावही काम करत होता. मेजर सोमनाथ शर्मा हे स्वतंत्र भारतातील पहिले परमवीर चक्र विजेते वीर हे १९४८च्या काश्मीर मधील संघर्षात श्रीनगरमधील विमानतळ रक्षणार्थ हुतात्मा झाले होते. लष्करातील पहिले सर्वोच्च बलिदान या काश्मीरी समस्येवर उपाय शोधताना झाले. परंतू वैचारिकदृष्ट्या, तसेच अतिरेकी व इस्लाम प्रणित असंवैधानिक रचना या विरोधात केंद्रांतील सत्तेत असणारा पक्ष, काॅंग्रेस फार काही करत नव्हता. व त्या पक्षाच्या मनोधारणेत अशा संघर्षाच्या कल्पना रूजतच नव्हत्या. पण या सर्व संघर्षमय कालखंडात ईस्लामचे कडवे व विकृत रूप कुठेतरी सामान्य काश्मिरी मुसलमानांनासुध्दा भयभित करू लागले होते. रक्त ला चटावलेल्या इस्लाम...

आले समाजाच्या मना व काश्मीर प्रश्न सुटला

Image
लेखांक ७१* सर्वार्थाने विकृत समस्येत आडकलेला काश्मीर प्रश्न असा सुटला  तरी कसा काय? इतका गुंता न कापता, तोडता सुटला कसा काय? जसे दो-याचा गुंता सुटण्यासाठी योग्य टोक हाती यावे लागते, तसेच देशाच्या समस्यांचे सुध्दा असते. स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून सर्व महर्षि यावर चिंतन, मनन व कृति करत होते. यातील सर्वात अवघड पण अत्यावश्यक कृति केली, डॉ हेडगेवार यांनी. हिंदू हे भारतीय राष्ट्रीयत्वाचे नाव आहे हे जाणले, त्या नावानी हाक मारली, त्या हिंदूत्वाच्या लांब रेषेत सर्वांना आणुन, छोट्या छोट्या अहंकाराच्या रेषा त्यात जाळून टाकल्या. जसे निर्वासित हे काश्मीरी पंडीत हे नसून, काश्मीरी हिंदू आहेत हे संपूर्ण देशाला समजावून सांगितले. देश कुटुंब आहे व जसे कुटुंब चालवणे  हे शेजा-याची नाही तर कुटुंबाची जबाबदारी असते तसे राष्ट्र सुचारू रूपात चालेल हे पहाणे व त्यासाठी वाटेल ते काम करणे हे समाजाचे, त्या नागरिकांचे कर्तव्य आहे. व यासाठी राष्ट्रव्यापी संघटन आवश्यक आहे हे डॉ हेडगेवार यांनी जाणले व  हे सर्व केले. व स्वाभाविक काश्मीर खोरे समस्या ही संपूर्ण देशाची झाली. गावोगावी कार्यकर्ते फिरत राहिल...

इस्लामी काश्मीर व जम्मू आणि लडाख

लेखांक ७०* कोणत्या भयंकर परीस्थिती मधून काश्मीर खोऱ्यातील अल्पसंख्याक हिंदू समाज जात होता हे आपण पाहिले. पण हे एखाद्या समाजाचे असमंजस क्रौर्य म्हणावे एवढे साधे नव्हते तर भारताकडून संरक्षण मिळवून स्वतः च्या कल्पनेतील इस्लामी काश्मीर निर्माण करणे या मोठ्या कटातील ती फक्त प्यादी होती. काश्मीरात बाहेरून कोणी येऊ शकतं नाही हे कायद्यानेच करवून घेतले पण जम्मू व लडाख मुस्लिम बहुल करण्याची कटकारस्थाने मात्र सुरूच ठेवली. त्या दोघांवरही अन्याय सुरूच ठेवला. जर काश्मीर, व जम्मू लडाखला स्वातंत्र्य हवे असते तर त्या तिघांना तरी समान सुविधा वा प्रगती मिळायला हवी होती. पण तसे घडत नव्हते. तिथे फक्त इस्लाम लाच विशिष्ट दर्जा होता व बाकी सर्व काफरच होते. पण या दोन काफर विभागांमुळे राष्ट्रीय एकात्मतेची वीण टिकून होती व ती उर्वरित देशातील हिंदू संस्था संघटनांना घट्ट करता येत होती. व घडलेही तसेच. लडाखमध्ये सिंधू महोत्सव होऊ लागला. अमरनाथ यात्रेला जीव धोक्यात घालून हिंदू धार्मिक समाज जाऊ लागला. देशभक्त विचारवंत काश्मीर अभ्यासगट स्थापून काश्मीरीयत व इस्लाम भिन्न आहेत, हे उच्च रवात सांगू लागले व राजकीय पटलावर प्र...

काश्मीरी नरसंहार व हिंदू समाजाचे दशावतार

Image
लेखांत ६९* एका अर्थाने फाळणीच्या वेळी हिंदू व शीख समाजाने जे भोगले तेच परत हिंदू व शीख समाजाच्या वाट्याला स्वतंत्र भारतातील काश्मीर खो-यात आले. बायका मुली सोडून हिंदूंनो काश्मीर खोरे रिकामे करा ह्या व अशा अर्थाच्या भिंती रंगू लागल्या. वेचून हिंदू घरांवर सूचना डकावल्या जाऊ लागल्या. प्रसिद्ध नाणावलेल्या हिंदू मान्यवरांचे मुडदे पडू लागले. नाटक म्हणून सुध्दा  FIR दाखल होत नव्हते,  वा अटक होतं नव्हती. गाव तर सुटलीच पण श्रीनगरमध्ये सुध्दा  हिंदू असण्याला क्षमा  नव्हती. हे एक चित्र नाही तर हजारो दृष्ट कथांची फक्त एक झलक आहे. फाळणी प्रमाणेच बाप व भावांनी मारत मरायसाठी सिध्द रहायच तर आईने मोठा सुरा घेऊन मुलीच्या गळ्याला लावून बसायचं. दुर्दैव जिंकल तर आधी मुलीचा व नंतर स्वतः चा त्या सु-याने शेवट करायचा. ह्यातील हातभागी नशीबवान जेंव्हा दिल्लीत पोहचले तेव्हा या सत्यकथा जगानी छातीवर दगड ठेवून व डोळ्याच्या खाचा करून एकल्या. पण सरकार व विचारवंत यांच्या मृतप्राय रक्तात खळबळीची काय अपेक्षा करणार? विकृत माणसांची विकृती नव्हती ही. विकृत तत्वज्ञानाचे अमानवीय विकृत वर्तन होते...

काश्मीरच्या दुर्दैवी दशावताराचे फेरे परत निर्वासित

Image
लेखांक ६८* स्वातंत्र्योत्तर भारतात जम्मू काश्मीर लडाख मधील फक्त काश्मीर खोरे हेच म्हणजे काश्मीर व अब्दुल्ला घराणे हा एकमेव काश्मीरचा आवाज असे सतत मानल्या गेल्यामुळे काश्मीर विलीनीकरण, ४८ च्या लढाईतील विमानतळ उभारणी, शामा प्रसाद मुखर्जी यांचे हौतात्म्य याला मर्यादित यश मिळाले व काश्मीर ही समस्या म्हणून कायमच राहिली. या अनुनयवाद प्रकारच्या केंद्र सरकाच्या वर्तनामुळे इस्लामसाठी काश्मीर खोरे हे दारूल इस्लाम बनून गेले. व जम्मू व लडाख ही नावडतीची पोर बनली. पण त्याहून भयंकर म्हणजे दारूल इस्लाम सदृश परिस्थिती बनलेल्या काश्मीर खोऱ्यातील उर्वरित हिंदू समाजाची अवस्था कोणीच वाली नाही अशी झाली. ज्या केंद्र सरकारच्या भरोशावर रहावे ते तर कु-हाडीचा दांडा गोतास काळ निघाले व हळूहळू काश्मीर खोऱ्यातील हिंदूंसाठी दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. सुरवातीला वैयक्तिक वाटणारे इस्लामिक आक्रमण हळूहळू समुह स्वरूपात होऊ लागले. इस्लाम विरूद्ध इस्लामेतर असे स्वरूप त्याला प्राप्त झाले होते. जणूकाही वाघ बकरीचा संघर्षच होता. व दुर्दैवाने इस्लाम शब्द आला की कापरं भरणार असं तकलादू केंद्र सरकार अस्तित्वात होते. देशभक्त हिंदू...

विघटनवादी शक्ती व काश्मीर प्रश्न

Image
लेखांक ६७* समाजाला जीवन ध्येय समजावून सांगणे, संघटित करणे, निस्वार्थ बुध्दीने क्रियाशील करणे हे सर्व काम स्वातंत्र्य लढ्या बरोबरच करणारे महापुरुष आपल्या कडे झाले व परीणाम म्हणून नेतृत्वाची अनास्था असतानाही समाजाने स्वतः च राष्ट्रीय एकात्मता अधिक सुदृढ व आधुनिक काळाशी सुसंगत निर्माण होईल ह्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी व्यक्ती, संस्था संघटना, व उत्स्फूर्तपणे समाज यांनी जे प्रयत्न व कार्य केले ते आपण पहात आहोत. पुर्वांचल व अता काश्मीर समस्या व त्यावरील उपाय याच्या आधारे.  काश्मीरचे  विलीनीकरण, पाकिस्तानशी १९४८ व नंतरचे सततचे संघर्ष, विघटनकारी करारा विरूद्ध व्यक्ति, समाज व संघटना यांनी केलेले मूलभूत कार्य आपण मागील लेखात पाहिले. त्यामुळे काश्मीर खोऱ्याचे आज बदललेले चित्र हे संपूर्ण भारताने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे हे लक्षात येते. पण काश्मीर प्रश्न हा इतका साधा, सोपा सरळ नव्हता. उलट अत्यंत जटिल बनला होता. यात कुराणाने तयार केलेली मुस्लिम मानसिकता, शीर्षस्थ नेतृत्वाला इस्लामी आक्रमतेविषयी असलेली भिती व स्वप्रतिमा मग्न नेहरूंची मानसिकता, डाव्या विचारसरणीच्या विकृत व...

काश्मीरचे विलीनीकरण व शामाप्रसाद मुखर्जींचे बलिदान

Image
लेखांक ६६* संघ राज्य निर्मिती मध्ये संस्थान खालसा करणे या कामात अडचण आणली हैद्राबादच्या निजामाने. पण ते प्रकरण सरदार वल्लभभाई पटेल यांनी कठोरपणे हाताळून मोडून काढले. पण तेथे प्रजा प्रामुख्याने हिंदू होती व परिसरातील राज्ये पण हिंदू होती. काश्मीर प्रकरण पंडित नेहरू यांचेकडे होते. व हाच नेतृत्व फरक या दोन राज्यांतील जनतेचे भवितव्य लिहीत होता. राजा हिंदू असूनही व त्याने विलिनीकरण मान्य करूनही मुस्लिम वेगळेपणा चुचकारण्याच्या नादात सोपी गोष्ट अवघड होत गेली. मुस्लिम अनुनय या भयंकर पापाचे धनी असलेले आपले नेतृत्व यांनी काश्मीर प्रश्न असा लटकत ठेवला. ज्यांनी नावलौकिकासाठी कधीच काही केलं नाही त्या श्री गुरुजींच्या सहकार्याने राजांच्या मनातील दिल्ली विषयी अविश्वास दूर करून,कसे तरी जम्मु काश्मीर भारतात जोडून घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री प्रेमनाथजी डोगराजी व अन्य प्रतिष्ठित नागरिक बंधुनी गतीने हालचाली करून जम्मू काश्मीर भारताला जोडून घेतले. सामान्य नागरिकांना जे कळत होतं ते स्वप्रतिमा मग्न  सरकार व शिर्षस्थ नेत्यांना कळत नव्हते. इकडे उर्वरित भारतात स्वातंत्र्य तर तिकडे जम्मू काश्मीर म...

राष्ट्रीय एकात्मतेची समस्या - काश्मीर

Image
लेखांक ६५* मुघल आक्रमणाच्या काळात अन्यायाने हिंदू धर्म सोडायला लागलेल्या बांधवांना परत येण्याचे रस्ते बंद झाल्यामुळे काश्मीर समस्या तीव्र बनत गेली. मुस्लिम दबावगट ही आपली शक्ती आहे व सरकार दबावाखाली येते हे जाणवल्यावर माकडाच्या हातात कोलीत अशीच अवस्था झाली व फाळणीच्या पार्श्वभूमीवर चुचकारण्याच्या नादात प्रश्न चिघळून सडू लागला होता. शेजारी पाकिस्तान निर्माण झालेच होते व निर्नायकी नेतृत्वामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात नकारात्मक बचावाच्या  पवित्र्यात आपण आलो होतो. पण या सर्व पार्श्वभूमीवर हिंदू समाज जागृतीची जी प्रक्रिया चालू होती त्याचे दृश्य परिणाम जाणवू लागले होते.काश्मीर खो-यातील हिंदू, ज्यांना परिचित भाषेत काश्मिरी पंडित म्हणतात ते भारताप्रती अनन्यसाधारण निष्ठा ठेवून होते. जम्मू व लडाख हेही भारत निष्ठा या बाबत निःशंक होते. त्यामुळे देशभक्तीचा सूर टीपेवर होता व त्यातच महाराज हरीसिंग हिंदू होते. पण समस्या हिंदू व देशासाठी दिल्ली नेतृत्व ही होती. संघर्ष आपल्यांशीच होता ही समस्या होती. याही ठिकाणी पुर्वांचलाप्रमाणेच समस्या उद्भवली. जगभरात काश्मीरचा आवाज म्हणजे फुटीरतावादी शक्तींचा आवाज...

विघटन वादी राजनिती व काश्मीर प्रश्न

लेखांक ६४* पुर्वांचलासारखे सर्व घटक अस्तित्वात असल्यामुळे भारताच्या उत्तर सीमेवरही एकात्मतेची वीण क्षीण करणारे जालीम घातक रसायन दीर्घकाळापासून उकळत होते. इस्लाम मानणारी बहुसंख्यांक लोकसंख्या, भारतात केंद्रस्थानी बौध्दिक दृष्टीने कणाहीन सरकार व सक्रिय आंतरराष्ट्रीय दबावगट हे सर्व काश्मीर या ठिकाणी सुध्दा उपस्थित होते. पूर्वांचल पेक्षा इस्लामचा स्वभाव म्हणून क्रौर्य हा अजून एक जालीम कंगोरा या घातक रसायनाला होता. ऐतिहासिक चूका हा विषय बाजूला ठेवून सुध्दा तीन क्षेत्रात विभागलेल्या जम्मू काश्मीर व लडाख यातील फक्त काश्मीरच फुटीरतेच्या उंबरठ्यावर का? हा प्रश्न, सरकार, स्वयंघोषित विचारवंत व त्यामुळे जनतेला  पडला नाही व त्यामुळे परत हा विषय सोडवण्याची जबाबदारी समंजस राष्ट्र हितैषी समाजावरच येऊन पडला. वरील प्रश्न कळूच द्यायचा नाही हा खास खिलाफती शहामृगी पवित्रा सर्वच क्षेत्रांनी घेतल्यामुळे नीरक्षीरविवेक हा राहिलाच नव्हता. अशाही वातावरणातून आजची काश्मीर समस्या सुटण्याची कामगिरी गेली ७५ वर्षे एकेकट्या व्यक्ती, संघटना व समाज कसा करत होता हे या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षे या कालखंडातील इतिहास समज...

पूर्वांचलातील एकात्म राष्ट्र भाव जागरण

Image
लेखांत ६३* पूर्वांचलाच्या समस्येचे गांभीर्य आपण पाहिले. त्याचे वेळोवेळी जे प्रत्यंतर येत असे ते उदाहरण रूपाने पाहिले. पण यातून एक धडा देशाला मिळाला कि जर समाजाने सकारात्मक पध्दतीने समस्येचा पाठपुरावा केला तर समस्या सुटतेच. समस्येचा जन्मच मुळी हितसंबंधींच्या खोटेपणातुन झालेला असतो. पुर्वांचलातील सातत्यपूर्ण  ५०/६० वर्षांच्या समाजाच्या संघटित प्रयत्नांना मोठे यश प्राप्त होत आहे. भारतभरातून कार्यकर्ते येथे जातं आहेत, सतत ५० वर्षे. शाळा काढतात , शिकवतात, वसतिगृह काढतात, छोट्या छोट्या पाड्या वस्त्यांवर दवाखाने काढतात, देशभरातून तरूण डाॅक्टर तेथे जातात, तिथलेच होऊन राहतात. आता तर महाराष्ट्रातील हेडगेवार रूग्णालय त्या परिसरात अद्ययावत रूग्णालय काढते. पुर्वांचलातील वैद्यकीय सेवेचे एक दृश्य या बरोबरीने उर्वरित भारतातील लोक  तिकडे सहली काढतात व निसर्गाबरोबर तेथील लोकांच्यात मिसळतात. लोकांना वाचतात. व जाणारे भारतीय आणि स्थानिक लोक एकमेकांना समजून घेतात कि आपण एकच आहोत. तसेच येथून मुल मुली उच्च शिक्षणासाठी देशभरात येऊन राहतात, शिकतात, संस्कृती समजून घेतात व त्यामुळे अता पूर्वा...

नागा राणी गाईडिंगल्यू व राष्ट्रीय एकात्मता.

Image
लेखांक ६२* पुर्वांचलाची परिस्थिती आपण समजून घेतली आहे. अनेक वर्षे हे क्षेत्र अलगाववाद्यांना, चर्चला आंदण दिल्यासारखे झाले होते व त्यामुळे जो देश विरोधी आवाज देईल तोच त्या प्रदेशाचा आवाज आहे असं भासवले जाई, माध्यमांद्वारे ठासले पण जाई. त्यामुळें क्षीण स्वरूपात का होईना तेथे चर्च शिवाय मूळं निवासी आहेत, त्यांचे जीवन, मूळ संभाळून आहेत हे उर्वरित भारताला माहिती नव्हतं व माहिती करू द्यायचेच नाही हा कटही होता. परंतू ज्यावेळी पूर्वांचल मध्ये India my home, एकल विद्यालय, वनवासी कल्याण आश्रम, विश्वं हिंदू परिषद, पूर्वांचल परिषद पोहचू लागले, विश्वास वाढू लागला, सहली निमित्ताने लोकांचा सहवास व सरमिसळ होऊ लागली त्यावेळी समाजाला ह्या मूळ संस्कृती धरून टिकवून ठेवलेल्या नागरिकांचा स्वाभाविक शोध लागू लागला. त्यातील एक नाव राणी गाईडिंगल्यू. नागा मूळ निवासी. चर्चला शरण न गेलेल्या नागा निवासींची राणी.  संपूर्ण देशाविषयी आत्मिय भाव भरलेला. सांस्कृतिक पाथेय घेऊन चाललेल्या. संधी मिळताच संपूर्ण देशात पसरलेल्या जनजातीय बांधवांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने देशभर क...

पूर्वांचलाची समस्या व संस्कृती संवर्धन.

लेखांक ६१* पुर्वांचलवर वर एवढा विस्तृत विचार करण्याची खरच आवश्यकता आहे का? असा प्रश्न पडू शकतो. पण हिंदू अल्पसंख्यांक झाला तर तो भाग भारतापासून तुटतो किंवा अलग होण्याची भाषा करतो अथवा त्याला परदेशी पंचमस्तंभीयांचे छुपे अथवा उघड सहकार्य मिळते ही तीनही सूत्रे काश्मीर प्रमाणे येथेही लागू होतात. सतत आक्रमणांशी झुंझणार्या प्रदेशाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही व त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागतात. पुर्वांचला बाबत काहीसे असेच घडले. संपूर्ण देश एक म्हणून संस्कार करणारी जी सांस्कृतिक रचना भारतात होती, त्यात कालोचित रचना न लागल्याने काही भाग हा संपर्क न होता, संवाद न होता राहीला, वर्षानुवर्ष तसाच राहिला व परीणाम स्वरूप इंग्रजांचा चंचूप्रवेश झाल्यापासून व नंतर राज्यच स्थापन झाल्यावर संपर्क व संवाद हीन झालेला पुर्वांचल मूळ सांस्कृतिक धारेपासून सुटू लागला व शेवट तुटल्यासारखा झाला. पहिला पादरी आला व पुर्वांचल ख्रिस्ती झाला नाही. इतिहास सांगतो की सात फादर्स नी जीवन दान केले तेंव्हा पहिला ख्रिस्ती झाला. परंतु जे सांस्कृतिक मूल्य घेऊन पुर्वांचल उभा होता त्याचा वर्षानुवर्ष परीपोष होत...