कशाचा आनंद?
JNU ही तशी राष्ट्रवादी सामान्य जनांसाठी notorious संस्था म्हणून प्रसिद्ध होती. सरकारी पैशावर राष्ट्र, संस्कृती याच्यावर हल्ला करणारी बांडगूळ पोसण हा गोरख धंदा ते कायम चालू होता. पण जरा ताठ मानेने विचारांवर चालणारे सरकार आल्यावर तेथे जरा चाप बसू लागला आहे. कुलगुरू सामान्य भारतीयांना आनंद होईल अशा काही गोष्टी करत आहेत. त्यातील एक म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज अध्यासन केंद्र चालू झाले आहे. त्या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वक्ते म्हणून तेथे गेले होते. एक सुंदर कार्यक्रम झाला. मी आनंदी झालो. मी आनंदी का? छत्रपति शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे चिंतन करत होते न की फक्त महाराष्ट्राचे हे नीट अधोरेखित झाले. शिवाजी महाराज हे दूरदृष्टीने राष्ट्र उभारणी करत होते हे अधोरेखित झाले. अत्यंत कूपमंडूप वृत्तीच्या आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक नेतृत्वामुळे वैश्विक नेतृत्व प्रशिक्षणासाठी ज्या छत्रपति शिवाजी महाराज यांचा विचार व्हावयास पाहिजे होता त्यांना महाराष्ट्राचे राजे बनवले होते, त्या जोखडातून महाराज बाहेर पडले आहेत. शिवाजी महाराज हे फक्त घोषणेसाठी नाही तर अभ्यासासाठी आहेत हे अधोर...