Posts

Showing posts from March, 2026

भगवान महावीर जयंती

Image
आज भगवान महावीर जयंती साजरी होते आहे. कोणताही भारतीय पंथ सांगतो तसेच पण कालोचित विचार भगवान महावीरांनी जैन समाजाला म्हणून दिले. पण पंथ म्हणून दिलेले मार्गदर्शन असले तरी जैन हा भारतीय मातीत जन्मलेला पंथ असल्याने स्वाभाविक विचार हा एखाद्या समाज घटकासाठी न राहता पूर्ण मानवतेसाठीच आहे. व भारतात जन्मलेले प्रत्येक तत्वज्ञान हे हिंदू वैश्विक चिंतनच असते. संपूर्ण जगाने जर संयमाने सहजीवन जगायचे असेल तर दुस-याच्या मताचा फक्त स्विकार करायचा असे नसून मताचा आदरही करायचा आहे तरच शांतततामय सहजीवन शक्य आहे हेच महावीरांनी सांगितले आहे. सामान्यपणे अहिंसा, सत्य वचन, अपरिग्रह आत्मशोध क्षमाशिलता, जगा व जगू द्या अशी शिकवण आपल्या परिचयाची असते व ती अत्यावश्यक आहेच. पण त्या शिवाय काही महत्त्वाच्या शिकवणी महाविरांच्या आहेत. यातील एक आहे आनेकांतवाद. म्हणजे सत्य एकच असले तरी त्याला अनेक पैलू असतात व म्हणून प्रत्येकाच्या विचाराच्या वेगळेपणाचा सन्मान करा. हे मार्गदर्शन म्हणजेच हिंदू वैश्विक चिंतन आहे. वेगळेपणाचा आदर करा. वेगळेपण म्हणजे चूक नाही तर वेगळेपणाने तेच सत्य सांगितले आहे. हे जाणले की आपोआप समं...

राम जन्मला ग सखी राम जन्मला

Image
*राम जन्मला ग सखी राम जन्मला*  आज प्रभू रामचंद्रांचा जन्म दिवस आहे. सर्व पृथ्वीतलावर नैतिकतेचे, न्यायाचे, स्त्री सन्मानाचे, वैयक्तिक व सामाजिक जीवनातील योग्य वर्तनाचे धडे देण्यासाठी आज रामनवमीला प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला व असे मापदंड घालून दिले की हजारो वर्षांपासून आज तागायत ते जन सामान्यांना मार्गदर्शन करीत आहेत.  वैयक्तिक चारित्र्य, कुटुंब व्यवहारातील त्यागाचे महात्म्य, राजकीय नैतिकता, न्याय निष्ठूर जीवन, स्त्री सन्मान फक्त माता सितेसाठी नाही तर वनवासी शबरीसाठी सुध्दा देऊन प्रत्येक स्त्री ही समान सन्मान प्राप्त आहे हे सांगितले, असे प्रत्येक विषयावर इतके खोलवर परिणाम करणारे मापदंड दिले आहेत की १० सहस्त्र वर्षांनंतरही ते तसेच लागू आहेत. इतके की भारतीय कुटुंब कायदा सुध्दा एक पत्नी व्रताचाच पुरस्कार करते. पण आज आपण दोन जरा वेगळ्या मुद्यांच्या  आधारे राम जन्म साजरा करु या. रामलला . हिंदू जागरणाचा कळसाध्याय  बुध कौशिक ऋषिंनी रामरक्षा स्तोत्र आपल्याला दिले आहे. अनुभूतीचे शब्द असल्याने ते साक्षात मंत्र रुपात आपल्याला मिळाले आहेत. म्हणून ते गेयही आहेत व अत्...

धर्मवीर संभाजी महाराज यांचे बलिदान

धर्मवीर संभाजी महाराज यांचे बलिदान  फाल्गुन अमावस्या हा दिवस हिंदू अस्मितेचे पुन्ह पुन्हा स्मरण करण्याचा दिवस आहे. ह्या दिवसाचे अनन्यसाधारण व एकमेव स्मरण म्हणजे बलिदान. धर्मवीर ह्या उपाधिस सर्वार्थाने पात्र ठरलेले बलिदान म्हणजे संभाजी महाराजांचे हौतात्म्य. धर्मवीर संभाजी महाराज यांचे बलिदान हे युद्धभूमीवर झालेले हौतात्म्य नाही, दोन राजांच्या शह काटशहातील बळी देणार नाही तर शंभर टक्के धर्मासाठी बलिदान आहे. हिंदु धर्म सोडण्यासाठी शरीरावरील इतके अत्याचार झेललेला दुसरा महावीर इतिहासाने पाहिला नसेल. म्हणून संभाजी महाराजांचे बलिदान हे छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज बनवते. अशीच बलिदानाची मालिका शीख धर्मगुरुंची आहे. त्यातील गुरु तेग बहाद्दूर यांचे हिंदू समाजासाठी केलेले बलिदान आज देशभर स्मरणात ठेवले जात आहे.या वर्षी त्याचेही ३५० वे स्मरण आहे. पण या बलिदानांमुळे जगभर काही गोष्टी ठळकपणे अधोरेखित झाल्या आहेत, ज्याचे स्मरण अधिक आवश्यक आहे. इस्लाम हा एक विकृत, मानवता विरोधी पंथ आहे. क्रौर्य हे सत्ताधीश किंवा शक्तिशाली व्यक्ती समुहाकडे असू शकते. पण त्या क्रौर्याचे समर्थन क...