अडवाणींना भारतरत्न
आज लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला. या आधी भरपूर राजकीय नेत्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पण त्यापैकी एक असे अडवाणी यांना मिळालेल्या भारतरत्न चे स्वरूप नाही. कारण अडवाणी यांनी भारतीय प्रशासनातील सर्वोच्च पद कधी अंगिकारले नाही. तसेच विशिष्ट राजकीय गरजेपोटी त्यांना हे पद, पुरस्कार मिळालेला नाही. त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे कारण अडवाणी हे भारतीय राजकीय संस्कृतीला १८० अंश कोनातून बदलले आहे. व या path breaking change साठी भारतरत्न पुरस्कार अडवाणी यांना मिळालेला आहे. अडवाणी यांनी भारतीय राजकीय संस्कृतीमध्ये असा कोणता बदल आणला व त्यासाठी त्यांनी काय काय सोसले? व कसे तो बदल कायमस्वरूपी झाला यामध्ये या पुरस्काराचे कारण लपलेले आहे. अडवाणी यांनी १९४७ सालापासून भारतीय राजकारणात अत्यंत अस्पर्श, अस्पृश्य ठरवलेली गोष्ट केली. बहुसंख्येने असलेल्या हिंदू समाजाच्या सांस्कृतिक भुकेला भारतीय राजकारणात मध्यवर्ती आणले. बौध्दिक दहशतवादी व बौद्धिक दहशतवाद या आधारे बहुसंख्यांक समाज, त्याचा विचार, त्याच्या सांस्कृतिक भुका या त्याज्य ठरवून व धार्मिक उन्माद या गटात टाक...