Posts

Showing posts from July, 2023

माझा मित्र गेला

माझा मित्र गेला खरं तर दोन दिवस उलटून गेले आहेत. दिलीप धारूरकर यांना संभाजीनगर मुक्कामी देवाज्ञा झाली. सहसा मला भावना व्यक्त करण्यासाठी फार वेळ लागत नाही. पण दिलीपचे जाणे आतुन गोठवून टाकणारे होते. इतक अनपेक्षित होते दिलीपचे जाणे कि प्रतिक्रिया सोडा, वस्तुस्थिती स्विकारण्यासाठी सुध्दा दोन दिवस कमी आहेत.             पण तरीही हे खरं आहे व म्हणून स्वीकारले पाहिजे. कारण या ख-याच्या शोधाचाच तर दिलीप वारकरी होता. मी नगर जिल्ह्यात प्रचारक व दिलीप पाटबंधारे खात्यात इंजिनिअर म्हणून नगरला आला. एकटाच होता. नावापुरती खोली होती पण खरा मुक्काम संघ कार्यालय नगर. मला किती झटपट मैत्री करता येते माहिती नाही पण दिलीपला मैत्री करण्यासाठी फक्त एक कटाक्ष पुरत असे. स्निग्ध नजर व निष्पाप चेहरा व आयुष्यभर जपलेला बाल सुलभ कुतुहूलाने भरलेला दिलीप ह्याला मित्र मिळवावे लागले नाहीत, तर त्या परिसाजवळ गेलात की मैत्री शिवाय काही होऊच शकत नव्हते. मी ही एक मित्र बनलो. रात्री दिलीप येणार, बंद पडलेल्या कराड बॅंकेचे भागवत येणार व सात मजली हास्याचे फवारे उडणार. संघ कामावर गंभीर कृतीशील चर्चा होणा...

चंद्रायान तीन चंद्रावर जायला निघाले

चंद्रायान तीन चंद्राकडे निघाले काल दुपारी चंद्रायान तीन चंद्राकडे निघाले. भारतीय विजिगिषू वृत्तीचा प्रवास सुरू झाला. मागच्या वेळी थोडीशी चूक झाली, किंवा नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होते. हाता तोंडाशी आलेला घास गिळता नाही आला. पण अपयश पचवून पुनश्च हरि ओम म्हणले, त्यासाठी लागते ती विजिगिषू वृत्ती जागृत केली व कष्ट मेहनतीला प्रारंभ झाला. पुन्हा किचकट गणिते मांडली गेली, व्यवस्था तपासल्या गेल्या, कृत्रिम चंद्र उभा केला, वातावरण आयात केले, तंत्रात बारीकशी सुध्दा उणीव ठेवली नाही पण यावेळी नियतीला साकडे घातले, अज्ञाताचेही स्मरण केले, बालाजीचे दर्शन घेतले, व काल चंद्रायान तीन चंद्राकडे जाण्यासाठी अवकाशात झेपावले यशस्वीपणे. अता ४५ दिवस वाट पहायची, इंधनाला भर म्हणून करोडो शुभेच्छा बरोबर घेऊन चंद्रयान निघाले. या आनंदात मिठाचा खडा ही पडला. विज्ञानाच्या यज्ञामध्ये अंधश्रद्धेची समिधा कशाला? ज्यांनी कष्टाने, प्रतिभेने, तंत्रज्ञानाच्या कौशल्याने हे घडवले होते, त्यांना यात काहीच खुपले नाही पण काहीच घडवायचे नसते त्यांना मांजर आडव घालवण्याशिवाय काहीच करायचं नव्हतं. पण असू द्यावे. सुंदर चेह-यालासुध्दा का...