प्रवास भगीरथ प्रयत्नांचा
🔸प्रवास भगीरथ प्रयत्नांचा...! 🔸 🚩 यंदाच्या विजयादशमीला 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या संघटनेच्या स्थापनेला ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त संघाच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारा सुनील देशपांडे यांचा लेख.... 🚩 विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस. १९२५ च्या विजयादशमीच्या दिवशी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. आज ही संघटना ९९ वर्षे पूर्ण करीत आहे. अशी संघटना, ज्या संघटनेला स्वतः ची ज्युबिली साजरी करण्यात काहीही रस नाही. ‘याची देही याची डोळा’ कार्य पूर्ण करण्यासाठी जी धडपडत आहे, अशा संघटनेचा हा जन्मदिवस आहे. त्यामुळे या एकमेवाद्वितीय संघटनेचा, कार्यपद्धतीचा प्रवास, विकासाचे टप्पे, समजून घ्यायला सर्वच भारतीयांना खूप उत्सुकता वाटत असेल. ही एकमेवाद्वितीय संघटना असल्याने तुलनात्मक अभ्यास करून हा प्रवास, हा विकास समजावून घेण्याचा सोपा मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे रा. स्व. संघाचा विकास समजून घ्यायचा असेल तर फक्त ही संघटनाच समजावून घ्यावी लागेल. एका धगधगत्या क्रांतिकारकाने तो लखलखत्या विद्युलतेचा मार्ग सोडून, डोळे दिपवून टाकणारा मार्ग त्यागून, मिणमिणत...