Posts

Showing posts from January, 2019

सेवेचा सन्मान डॉक्टर अशोक कुकडे

डॉक्टर अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचे आजच समजले. आणि एक सकारात्मक उर्जा संपूर्ण शरीरातून चमकून गेली. अशी सकारात्मक ऊर्जा आपल्या अस्तित्वाने परिसरात निर्माण करणे हीच या माणसाची महानता आहे. थोडासा अशोकरावांचा परिचय. पुण्यामधून एम एस पूर्ण केल्यानंतर ज्या ठिकाणी वैद्यकीय सेवा नाही अशा ठिकाणी जाऊन वैद्यकीय सेवा सुरू करण्यासाठी लातूर हे कर्मस्थळ स्वीकारले. ही काकांची संघस्थानावर घेतलेल्या संस्काराची पहिली सामाजिक परतफेड होती. मारण्यासाठी फक्त शस्त्र उगारतात असे माहिती असलेल्या गावांमध्ये वाचवण्यासाठीसुद्धा शस्त्र उचलले जाते हे काकांनी पहिल्यांदी  समजावून सांगितले. वैद्यकीय सेवा संघ कार्य हे दोन्हीही काकांनी सर्वप्रथम लातूरमध्ये प्रतिष्ठित केले. सर्वे शाम अविरोध ठेवून या संघ संस्काराच्या मार्गाने काकांनी सर्व लातूरकरांना नव्हे पूर्ण मराठवाड्याला आपलं केल. अनेकांना संघ समजला तो या विवेकानंद रुग्णालयाच्या माध्यमातूनच. आणीबाणीच्या दोन वर्षाच्या काळ्या  कालखंडांमध्ये हे हॉस्पिटल ताठ उभे राहू शकले याचे कारण डॉक्टर काकांनी सर्वेषां अविरोधेन या  भूमिकेतून जोडले...

देशभक्तीवर चर्चा? पुन्हा ऐरणीवर

देशद्रोहाच्या आरोपाखाली एखाद्याविरुद्ध कोर्टामध्ये तक्रार झाली की आपल्याकडे एक छोटा वर्ग असा आहे की ज्याच्या पोटात गलबलायला लागते. एरवी उठसुठ कोर्टात काय ठरते बघू, बघा कोर्ट काय म्हणते,  असं म्हणणारे याबाबतीत मात्र कोर्टाची पायरी चढायला तयार नसतात.भारतीय दंड संविधानामध्ये राज्यद्रोहाच्या गुन्ह्याची तपशीलवार कलमे आहेत, पण त्याचा वापर मात्र या लोकांना नको असतो. दोन परस्परविरुद्ध गोष्टी एकत्र आणून देशभक्ती हा विषय वादग्रस्त बनवण्याची तीव्र इच्छा या मंडळींना असते. देशभक्ती विरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य.अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मत व्यक्त करण्यासाठी आहे न की मानवताद्रोही गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यासाठी. म्हणून आपण सर्वांनी देशात देशद्रोहाच्या आपल्या कल्पना स्पष्ट करून घेतल्या पाहिजेत. आजच्या परिस्थितीत देशद्रोह म्हणजे काय? भारत तेरे तुकडे होंगे. घर घर से अफझल निकलेगा. राष्ट्रीय नागरिकता दप्तराला विरोध. सर्जिकल स्ट्राइक वर संशय. तोंडी तलाक विधेयकाला विरोध. वंदे मातरमला विरोध तसेच सिनेमा थिएटरमध्ये राष्ट्रगीताला उभे राहण्याला विरोध. या व अशा सर्व गोष्टी या राष्ट्रद्रोहाचेच प्रत...

चला प्रबोधन करूया.

चला मतदान करू या. तरुणांनो मतदान करा,  प्रौढांनो मतदान करा, महिलांनी मतदान करा, प्रत्येक भारतीयांनी मतदान करा. 2019 च्या निवडणुकीत फक्त एवढेच प्रबोधन करावे लागणार आहे. कारण आहे या देशातील सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष. पूर्वी मतदानाला जाताना सक्षम चेहरे समोर दिसत असत, पण यावेळी त्या पक्षाने असा चेहरा समोर ठेवला आहे की सामान्य जनतेला मत देण्यापूर्वी विचार करण्याची गरजच शिल्लक नाही. यात आनंद नाही पण एखाद्या राष्ट्रीय पक्ष्याची अगतिकता पाहताना भारतीय लोकशाहीला लाज वाटत असेल. त्यामुळे यावेळी प्रबोधनासाठी काही मुद्दे शिल्लकच नाहीत हे सहजपणे जाणवते.त्या सर्वात जुन्या राजकीय पक्षानी जो चेहरा देश चालवण्यासाठी पुढे आणला आहे, याच्या मध्ये भारतीय मतदारांच्या प्रगल्भतेचा भीषण अपमान आहे. व हा अपमान प्रतिशोध घेण्यासाठी पुरेसा आहे, असे वाटते. त्यामुळे सकारात्मक मतदान करा व आपल्या प्रगल्भतेचा अपमान करणाऱ्या पक्षाला कायमचा धडा शिकवा अशी विनंती करणे एवढेच हातात शिल्लक आहे. सकारात्मक अशासाठी की नोटा हे मतदान नाही. नोटा हे व्यवस्था नाकारून अराजकता निर्माण करण्याचे कटकारस्थान आहे असेच पाहिले पाहिजे. न...