जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक एक पैलु
देशातील सर्वात महत्वाच्या विधानसभा निवडणुकीत दोन टप्प्यांचे मतदान झाले आहे. व तिसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील मतदान होऊ घातले आहे. जम्मू काश्मीर नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. व म्हणून सुध्दा महत्वाची आहे. पण ही निवडणूक खरी महत्वाची आहे कारण सामान्य निवडणुकीसारखी नाही. सामान्य निवडणुकीतील उत्साह हा माझा पक्ष, माझा उमेदवार व त्या विषयीची उत्सुकता अशी असते पण तो विषयच या जम्मू काश्मीर निवडणुकीत नाही. ही विधानसभा निवडणूक अतिशय गंभीर, गुंतागुंतीच्या विषयांवर भाष्य करणारी पण प्रत्यक्ष प्रचारात ते विषय कधीच समोर येणार नसल्याने समजून घ्यायला कठीण आहे. निवडणूक प्रचार हा ३७० /३५ ए रहाणार की जाणार? बेरोजगारी, विकास, आझादी, दंगाधोपा मुक्त, या विषयावर झाला असला तरी त्या आधारे मतदान होते की नाही? हे ठरणारी म्हणून कुतूहुल चाळवणारी आहे. यातून शोधायचे अंतरप्रवाह फारच वेगळे आहेत. मग काय घडणार आहे? ह्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत. त्यामुळे या निवडणूक प्रचारात आलेले काही मुद्दे विचारात घेऊ यात. कधी नव्हे ते श्यामाप्रसाद मुखर्जी, टपलू, अन्य काश्मिरी हिं...