Posts

Showing posts from November, 2023

आत्म Pamplet चित्रपट एक अनुभव

एक सर्वांग सुंदर मराठी चित्रपट. परेश मोकाशी यांचा असल्याने तो वेगळा तर असणारच होता. पण वेगळेपणा म्हणजे सुंदर असलेच पाहिजे असे नाही. एका सामान्य माणसाचं आत्मचरित्र आहे. व ते सामान्य असल्याने बाड न होता एका पत्रका एवढ छोटंसं आहे. एक दलित मुलगा, पणजी शिकल्याने शाळेत जातो. एक मुलगी आवडते. सामान्यपणे मागे मागे फिरणं, पडलेला रुमाल उचलून देणे व. करतो. त्या वयातील पोर साथही देतात. व प्रेम प्रकरण सफल संपन्न होते. पण ही आत्मकथा परेश मोकाशी सांगतात म्हणून खूप मनाला स्पर्षत रहाते. वर्गातील मुले आरक्षण प्रश्नाला सामोरे जातात, अयोध्या आंदोलन, मुंबई bomb स्फोटाला, व ती मने संवेदनशील बनत जातात. घट्ट मैत्रीत रुपांतरीत होतात. ही साधी कथा एवढी वेधक बनत जाते की विचारता सोय नाही. सिनेमा हा संवाद कमी बोलकी चित्रे अधिक असतो. असा मराठीत अनुभव देणारा दिग्दर्शक म्हणजे परेश मोकाशी. एकच एक प्रसंग पण फ्रेममुळे एवढी विविधता आणू शकतो हे हा चित्रपट पहाताना जाणवते. चित्रपटाला भाषेची गरज नसते हे कळवून देणारे अनेक परदेशी चित्रपट आहेत पण सिनेमाची स्वतःची भाषा असते व ती चित्रातून व प्रत्येक फ्रेम मधून बोलते हे मराठी सिनेम...