Posts

Showing posts from December, 2022

वीर बाल दिन

वीर बाल दिवस  जगातील कोणतही सरकार हे असेच असते. आपल्या लोकांनी आपल्या देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी, लोकांसाठी जे बलिदान दिलेले असते त्याचे सातत्याने स्मरण करत असते व त्या विषयी अभिमान बाळगून असते. हा भाव स्वाभाविकच असतो.  पण भारत एक असा देश आहे कि जेथे सरकारचा हा इतिहासाविषयी जो स्वाभाविक दृष्टीकोन असायला पाहिजे तो येण्यासाठी ६५/७० वर्षे लागली. सकल जगतमें खालसा पंथ गाजे हे सांगणा-या गुरू गोविंदसिंह यांच्या दोन कनिष्ट पुत्रांना जो मृत्यू स्विकारावा लागला त्याचा सरकारला स्वाभिमान वाटण्यासाठी, गौरव वाटण्यासाठी सुध्दा इतका प्रदीर्घ काळ गेला. जोहावरसिंग व फतेहसिंग यांचे बलिदान  वीर बाल दिन स्विकारण्यासाठी एवढा प्रचंड काळ सरकारला का लागला? त्याची कारणमिमांसा राष्ट्र जागरणासाठी आवश्यक आहे. हे मरण हौतात्म्य होते एवढे साधे सत्य जे की करोडोने असलेला हिंदू समाज नीट जाणून होता, सरकारी स्तरावर का स्विकारले जात नव्हते. याचे कारण भारताचे राष्ट्रीयत्व हेच मुळी १९४७ पासून आहे असे मानणारी विचार धारा सत्ता व सत्ते आधारे वैचारिक नेतृत्व करणा-या मुखंडांनी स्विकरली होती, त्यामुळे त्या आधीचे स...