रज्जूभैय्या चतुर्थ सरसंघचालक
तसे तर आखीव रेखीव संघटनेमध्ये निर्मात्या नंतरच्या प्रमुखांना त्या संस्थेचे सुचारू रूपाने चलनवलन करण्या व्यतिरिक्त फारसे स्वतः चे अस्तित्व वा प्रभाव त्या संस्थेवर अथवा त्यायोगे समाजावर पाडता येत नाही. व ते बराच अंशी खरे आहे. पण यातूनच अशा प्रमुखांच्या वेगळ्याच गुणांचा परिचय होऊ शकतो. तो रज्जूभैय्या यांच्या जयंतीनिमित्त आपण करून घेऊ शकतो. व अधिनायकवादाच्या प्रभावाच्या बाहेर पडण्यासाठी मदतही होईल. चतुर्थ सरसंघचालक माझ्या दृष्टीने एका वैशिष्ट्यपूर्ण संघ गुणाचा परिचय करून देतात. ते पहिले संघचालक आहेत ज्यांनी डॉ हेडगेवार यांना अनुभवलेले नाही, व पाहिले सुध्दा नाही. व संपूर्ण वेगळ्या सामाजिक पार्श्वभूमी वरून आलेले आहेत. तरीसुद्धा त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविण्याचा अट्टाहास केला नाही. संघ जसा चालला पाहिजे तसाच चालवला. मी नवीन दिशा देत आहे हा अट्टाहास चालवला नाही. संघ रचनेत मी नाही हे स्व कृतीने शिकवले ते रज्जूभैय्या यांनी. कोणतीही सामाजिक संघटनेचा फुटीचा इतिहास तपासला तर जाणवेल की नव नियुक्त प्रमुखाने मीपणा सिध्द करण्यासाठी घाईगर्दीने प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला व फक्त खळखळाट हो...