वीर बाल दिन
वीर बाल दिवस
जगातील कोणतही सरकार हे असेच असते. आपल्या लोकांनी आपल्या देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी, लोकांसाठी जे बलिदान दिलेले असते त्याचे सातत्याने स्मरण करत असते व त्या विषयी अभिमान बाळगून असते. हा भाव स्वाभाविकच असतो.
पण भारत एक असा देश आहे कि जेथे सरकारचा हा इतिहासाविषयी जो स्वाभाविक दृष्टीकोन असायला पाहिजे तो येण्यासाठी ६५/७० वर्षे लागली. सकल जगतमें खालसा पंथ गाजे हे सांगणा-या गुरू गोविंदसिंह यांच्या दोन कनिष्ट पुत्रांना जो मृत्यू स्विकारावा लागला त्याचा सरकारला स्वाभिमान वाटण्यासाठी, गौरव वाटण्यासाठी सुध्दा इतका प्रदीर्घ काळ गेला.
जोहावरसिंग व फतेहसिंग यांचे बलिदान
वीर बाल दिन स्विकारण्यासाठी एवढा प्रचंड काळ सरकारला का लागला? त्याची कारणमिमांसा राष्ट्र जागरणासाठी आवश्यक आहे. हे मरण हौतात्म्य होते एवढे साधे सत्य जे की करोडोने असलेला हिंदू समाज नीट जाणून होता, सरकारी स्तरावर का स्विकारले जात नव्हते. याचे कारण भारताचे राष्ट्रीयत्व हेच मुळी १९४७ पासून आहे असे मानणारी विचार धारा सत्ता व सत्ते आधारे वैचारिक नेतृत्व करणा-या मुखंडांनी स्विकरली होती, त्यामुळे त्या आधीचे संघर्ष राष्ट्र व समाजासाठी होते हेच अमान्य होते.
त्यामुळे इस्लाम हा क्रुर एकांगी व विकृत पंथ आहे हे स्विकारणे झेपत नव्हते, म्हणून शीख धर्मगुरूंची व त्यांच्या मुलांची बलिदाने ही सरकार दरबारी त्यागाच्या खात्यात जमाच होत नव्हती. धर्मासाठी त्याग हा राष्ट्रासाठी त्यागात मोडत नव्हता. व म्हणून सरकारला राष्ट्राचा मूलाधार ही कळत नव्हता.
पण राष्ट्र हजारो वर्षांपासूनचे सनातन राष्ट्र आहे हे समजून सांगण्याच्या शंभर दोनशे वर्षांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले.
समृद्ध राष्ट्र जीवन म्हणजे वेद कालापासून सुरू होते, रामायण महाभारत त्याला सांस्कृतिक दृष्ट्या पुष्ट करतात, मध्ययुगीन हिंदू राजे व समाज यांनी त्याला कालोचित व समृद्ध बनवले, देशाच्या कानाकोपऱ्यात प्रयत्नपूर्वक उभारलेली सांस्कृतिक एकात्मता दिसते, ते राष्ट्र म्हणजे भारत आहे. हे समाजाला कळू लागले तसे समाजाने हा भाव कळणार नेतृत्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले व त्याला २०१४ साली सर्वंकष यश प्राप्त झाले.
राष्ट्रीयत्व ही संकल्पना दुरुस्त झाली व ३७० कलम रद्द झाले, अयोध्येत राममंदिर सुरू झाले, काशी विश्वनाथ सरकारला त्याज्य राहिला नाही व आज त्यावर कडी झाली.
इस्लाम ही Holy cow नसून चिकित्से अंतर्गत रहाणार व त्यातील जे दोष बहुसंख्यांक हिंदू समाजाशी द्रोह करतील, ते चालणार नाहीत. सक्तिने वा आसक्ती ने धर्मांतरण इस्लामला मान्य असेल पण भारताला मान्य नाही व हा संदेश वीर बाल दिनाने दिला आहे. हिंदू धर्मासाठी मरण पत्करतात ते संभाजी महाराज व गुरू गोविंदसिंह यांची मुले ही राष्ट्रासाठी व राष्ट्र शब्दाला अर्थ निर्माण करणा-या संस्कृतीसाठी हौतात्म्य पत्करतात. व हे आजच्या वीर बालदिन साज- या करणाच्या सरकारच्या निर्णयामुळे सरकार दरबारी ही मान्य झाले आहे.
आज समाज व सरकार यांचे वैचारिक एकत्व सिध्द झाले आहे.
म्हणून या निर्णयाबद्दल सरकारचे अभिनंदन.
सुरवात झाली आहे, खूप काही दुरुस्त करायचे आहे, पण मार्ग निश्चित झाला आहे, गती पकडायची आहे.
सुनील देशपांडे
पुणे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment