जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक
जम्मू काश्मिरच्या निवडणूक निकालाकडे कसे बघावे या विषयी मी एक भूमिका मांडली होती. त्या अनुषंगाने मी जवळपास सर्व निकाल लागलेल्या या विधानसभेचे विश्लेषण करणार आहे.
हरियाणा ही नेहमीची राजकीय निवडणूक होती त्यामुळे त्याचे विश्लेषण सहजपणे होणार आहे पण जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक ही पक्षीय विजय पराजयाची नव्हती. तर चर्चेत नसलेल्या मुद्द्यांवर ती निवडणूक होती. घाटीतील मुस्लिम मुस्लिम बहुल प्रांतात तरी भौतिक कारणांनी मतदान करतात का? याचे उत्तर अपेक्षेप्रमाणे दुर्दैवाने नाही असेच आले. बहुसंख्यांक असलेले मुसलमान सुध्दा सर्व मुसलमान उमेदवारातील योग्य अयोग्य उमेदवार निवडत नाहीत तर भाजपला राजकारणात upper hand मिळता कामा नये या नकारात्मक भूमिकेतूनच विचार करतात. म्हणून काश्मीर खोऱ्यात जवळपास एकहाती विजय NC ला दिला जेणेकरून भाजप वाचून अडू नये.
हेच इस्लामचे वैशिष्ट्य आहे की माझ भल, मुलाबाळांच भल, हे महत्वाचे नाही, तर इस्लाम महत्वाचा. त्याला धोका भाजपपासून. तर strategic मतदान करा. भाजप दूर ठेवा. त्यासाठी पिडीपीला उगाच १०/१५ जागा मिळू देऊ नका. पाकिस्तानची अवस्था एवढी दयनीय म्हणूनच आहे. त्याच मार्गाने काश्मिरी मुसलमान बहुसंख्येने गेला.
तसेच जम्मू मधील बहुसंख्यांक हिंदू बहुल मतदार संघ भाजप जिंकला तरीही दोन तीन अपक्ष हिंदू जिंकले. पण या जम्मू भागात हिंदू बहुल पण मुस्लिम चांगल्या संख्येनं असलेल्या मतदार संघातील मुसलमान सहजीवनाच्या बाजूने उभे राहिले नाहीत तर मुस्लिम हित म्हणजे भाजप जम्मू काश्मीर विधानसभेत केंद्र स्थानी नको म्हणून व्यूहात्मक वागले. NCला जिंकवले. अर्थात अपेक्षित तेच घडले.
कुणालाही मुस्लिम समूहश: इस्लाम शिवाय कशाचाही विचार करेल असा भ्रम असेल तर तो काश्मिरी मुसलमानांनी नीट दुरुस्त केला आहे. तरीही खूप जोर लागल्याने नशीब NC बहुमतापासून थोडी दूर राहिली. काही मुस्लिम अपक्षही निवडून आले. आशेला जागा आहे की मुस्लिम बहुल प्रदेशातही राष्ट्रवादी शक्तींना बळ मिळू शकेल.
पण हिंदूंना अधिक सजग राहून आपण विजयी आहोत असे मानून विधानसभेत सहभाग दिला पाहिजे व विकृत मनोरथे रोखली पाहिजेत.
हे एक विश्लेषण.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२.
Comments
Post a Comment