The Sheep Detectives
मी आज Amazon Prime वर द शीप डिटेक्टिव्हज हा चित्रपट पाहिला. एक अफलातून सिनेमा पाहुन झाला. कलेने प्रेक्षकांच्या जगाकडे बघण्याच्या कक्षा रुंदावायच्या असतात असे असेल तर हा चित्रपट ते काम पूर्ण करतो.
हा सिनेमाचा विषय कसा होऊ शकतो? असा प्रश्न सिनेमा पाहताना पडला तर त्याने प्रेक्षकांच्या जाणीवांच्या कक्षा रुंदावल्या असे म्हणता येईल. The Sheep Detectives ने पूर्ण केले आहे.
काय कथा आहे? एक मेंढपाळ आहे. तो मेंढ्या सांभाळत असतो. प्रेम करत असतो मेंढ्यांवर. त्यांना विकत नसतो. त्यांना रात्री रहस्य कथा वाचून दाखवत असे. त्याचा मृत्यू होतो. मग तो खून ठरतो. चित्रपटात खून आहे पण रक्तपात नाही. गावक-यांवर संशय येतो. त्याचीच मुलगी अटक होते. या शेळ्या गुप्तहेर गिरी करतात व खूनी पकडला जातो. पण या कथेला ताकद मिळते ती out of the box विचाराची. व्हॅन, व मेंढर एवढच नायक जाॅर्जचे जग. रहस्य कथा अर्धवट वाचून झाली की ती मेंढर आपापसात चर्चा करत की खूनी कोण? त्यातल्यात लिली मेंढरु उत्तराजवळ जात असे.
मेंढर मरत नाहीत तर ढग बनतात असा विश्वास. संकट, दु:ख कधी माहितीच नाही. सगळा कारभार भाबडेपणातून चाललेला. Innocence is a vertue ह्याची इतकी सुंदर कल्पना येते की विचारता सोय नाही. ती व्हॅन, जाॅर्ज, मेंढर व प्रचंड हिरवा landscape म्हणजे सौंदर्याची पर्वणी आहे.
अशा तच जाॅर्ज मरतो. मरणाचा पहिला दाहक अनुभव त्या मेंढरांना मिळतो. व रहस्यभेदासाठी लिली व दोन तीन मेंढर तयार होतात. कुंपणा बाहेर पहिले पाऊल पडते. भयाचा पहिला भयाण अनुभव घेतला जातो. दुसरा मेंढपाळ खुनी असेल म्हणून तेथे जातात व कुत्र्यांकडून क्रौर्याचे पहिले दर्शन होते व एक winter sheep लिलीला वाचवताना मरतो. मृत्यूचा पहिला अनुभव काटा आणतो. मरण सत्य आहे हे समजते. यात संशयितसुध्दा वाईट नाहीत तर सामान्य आहेत. यातील पोलिसही मुर्ख आहे. म्हणून तर तो मेंढरांवर विश्वास ठेवतो. अशी सकस पात्र रचना आहे. एक अजून कडी म्हणजे येशू ख्रिस्त हे मेंढपाळापोटी जन्मलेले. त्याचा उपयोग करुन चर्च कथेत इतके सुंदर गुंफले आहे की कथा उपकथानकांमुळे भरकटत नाही. तसे तर लिली कोण?, खूनी कोण?
अभिनय, प्रत्येक फ्रेम पहात रहावे अशी आहे. सिनेमा बुध्दीला पटवून देतो की असे घडू शकेल. म्हणूनच हा सर्वांगसुंदर सिनेमा जरुर बघा.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment