१२ सप्टेंबर

११ सप्टेंबर 
आज ११ सप्टेंबर आहे. स्वामी विवेकानंदांचा जागतिक व्यासपीठावरून अर्वाचीन काळातील हिंदू वैश्विक चिंतनाचा वैश्विक एल्गार. आजच्या भयग्रस्त, संघर्षमय जगाला आधार देऊ शकणा-या चिंतनाचा इस १८९३ वर्षी याच दिवशी एल्गार झाला. हिंदू धर्म, हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू संस्कृती, हिंदू संस्कार, हिंदू नर नारी, व भारत देश हा या भयग्रस्त जगाला अश्वस्त करत आहे. वैश्विक समंजस सहजीवन हे कसे निर्माण होऊ शकते व त्यासाठी कोणती अट आहे? व ती अट हिंदू शब्द कशी पूर्ण करतो याचे अर्वाचीन काळातील मार्गदर्शन म्हणजेच आजचा दिवस. परमत फक्त सहिष्णुता नाही तर आदरयुक्त स्विकार हाच तो मार्ग. पण त्यासाठी अपराधी भावना नाही तर आत्मविश्वास या दिवशी दिसला. सारखेपणा नाही तर वेगळेपणातील एकात्म सूत्रे सांगितली तो दिवस. यहुदी व पारशी समाजाला भारत देश, हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदू संस्कार हिंदू तत्वज्ञान व हिंदू नरनारी यांनी ज्या पध्दतीने आश्रय व आलिंगन दिले त्याची सार्थ आठवण करुन दिली तो दिवस. सर्वांप्रति एकात्मभाव दर्शवणारे हिंदू तत्वज्ञान सांगितले तो दिवस. अब्राहामिक पंथ हे या प्रश्नाचे उत्तर नाही हेही सांगितले.
तो हा दिवस आहे. आगामी काळ हा भारत मातेचा जगन्माता म्हणून स्विकारण्याचा कालखंड आहे, ते सांगण्याचा हा दिवस आहे.
म्हणून हा वैश्विक हिंदू चिंतनाशी अभिमानाने जगाला सांगण्याचा दिवस आहे.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन