फक्त हसा

हास्य कविता सम्मेलनात
 मला बोलवल. धन्यवाद.
पण आठवण करून देतो
वेगळेपणाच्या नादात फासतो
कधी कधी  हेतुलाच हरताळ.
फक्त हसा, मोकळं व्हा, 
चिंता नको, टीपं गाळू नका
हा ठरला हेतू, मला प्रश्न पडला
यात बेगडीपणा तर नाही ना?
खरच हास्य कविता
मनापासून हवी ना
कि उथळ पाण्याचा खळखळाट 
लाफ्टर शो सारखा.
हसून हसून पोट फुटले,
हसून हसून बेजार झाले,
हसून हसून डोळ्यात पाणी आले
सगळी विशेषणे दु:खी अशी
मग फक्त हसा ही बतावणी कशी?
दु:खात तर टीपं गाळतोच 
आनंदाचा पराकोटही
डोळ्यात पाणी आणतो
मग हसवा पेक्षा आसवं
अधिक अस्सल
तरी हास्यालाच मान्यता
आसवांना स्थान पदराआड
नाहीतर फिरवलेल्या मुखड्या आड.
हासु खर होत, डोळे पाणवल्यावर,
नाही तर नुसताच मुखवटा ठरतो.
हास्य कवि सम्मेलन खर तेंव्हाच
जेंव्हा हसून हसून रडाल तेंव्हा.
म्हणून बेगडी नको, मुखवटा
इतके हसू की, झरतील डोळे टपाटपा.

सुनील देशपांडे
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन