रंगा हरीजी गेले

*संवादासाठी भाषा सहकार्य करते,अडचण नाही*

रंगा हरीजी त्यावेळी रा स्व संघाचे अखिल भारतीय बौध्दिक प्रमुख होते. त्यावेळी नाशिक धुळे जळगाव येथे त्यांच्याकडून संघ समजून घेता आला हे माझे भाग्यच. पहाटे उठून ३/४ वाजता एक टाकी पत्रव्यवहार सुरू व्हायचा. घरातले उठले की चहाच्या वेळी गृहिणीशी गप्पा. No RSS  फक्त स्थानिक व कौटुंबिक संक्लपनेचे स्पष्टीकरण होईल अशा गप्पा. 

माझ्या पत्नीला त्यांनी "अतिथी" शब्दाचा अर्थ समजून सांगितला होता.

त्या नाशिक-धुळे-जळगावमधील तीन दिवसांत शाखा मुख्य शिक्षकांचा वर्ग जिल्हाश: होता. थेट संवाद कसा करायचा हे शिकण्यासारखं होत. मुख्य शिक्षक हा लहान, संघ अनुभव नसलेला, हिंदी न समजणारा, त्यामुळे थेट संवाद कसा साधणार हा प्रश्नच होता. त्यात त्यांची एकच सूचना, मुख्य शिक्षक सोडून कोणीही बोलायचं नाही.
धुळे प्रवासात जनजातीय मुख्य शिक्षक जास्त, मराठी धड न बोलणारे, यांचे कसे होणार? मी रंगाजींना अडचण सांगितली. ते म्हणाले मी बघतो. व त्या संघ कामाच्या बैठकीतील पहिला प्रश्न होता,"कितने शिक्षकोंके घरमे सुबह जानेके लिए टट्टी है?" सर्वांना उत्तर आले व संवाद सुरू झाला.भाषेमुळे विनोदही झाले पण संवाद झाला.
मला म्हणाले,"संवादासाठी भाषा सहकार्य करते, अडचण नाही."
..... ....व स्नेहभाव वाढतच गेला.

आजची श्रध्दांजली या एकाच बिंदूवर थांबवतो.

*सुनील देशपांडे*
https://www.facebook.com/100001070919178/posts/pfbid02M5KCHNSShhctHW6p9dv3Sizi25t3wo3Z5cuEeQ6A9PN7C3CKB1R6oPP5mQ8muZR8l/?mibextid=Nif5oz

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन